बायोडिझेलचा पर्याय स्वीकऱण्याचे गडकरींचे आवाहन

0
676

खालापूर- देशातील शेतकरी देखील बायोडिझेल बनवू शकत असल्याने त्यामुळे सद्य स्थितीत होणारी सहा लाख रूपये कोटींची इंधन आयात थांबवून नरेंद्र मोदी यांची मेक इन इंडिया ही संकल्पना खऱ्या अर्थाने साकारली जाईल असा विश्वास केर्दीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला
रायगड जिल्हयातील खालापूर येथे आणि मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाजवळ सुरू कऱण्यात आलेल्या राज्यातील दुसऱ्या बायोडिझेल पंपाचे उद्धघाटन काल नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले तेव्हा गडकरी बोलत होते.बायोडिझेल अन्य डिझेलच्या तुलनेत लिटरमागे चार रूपयांनी स्वस्त,इंजिनची कार्यक्षमता दहा टक्कयांनी वाढविणारे आणि प्रदुषणाचे प्रमाण कमी कऱणारे असल्याने सर्वांनी बायोडिझेलचा पर्याय स्वीकारावा असे आवाहनही गडकरी यांनी केले.
कार्यक्रमास जिल्हयातील लोकप्रततिनिधी अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here