बाप्पासमोर आता नव्या अडचणी

0
666
कच्च्या मालाच्या वाढत्या किंमती,गणपती मूर्ती ठेवण्यासाठी जागेची अडचण,आर्थिक कोंडी यातून मार्ग काढत असतानाच पेण तालुक्यातील गणेश मूर्ती कारखान्यांना आता कुशल कामगारांची टंचाई जाणवत असल्याने गणेश मूर्ती कारखाने चालविणारे मेताकुटीस आले आहेत.पेण तालुक्यात पेण शहरासह हमरापूर,वडखळ,दादर,बोरी,शिर्की, आदि गावातही गणेशमूर्ती बनविणारे कारखाने असून अशा काऱखान्यांची संख्या 450च्या वर आहे.या कारखान्यांमधून दरवर्षी विविध 250 प्रकारच्या  30 ते 35 लाख मूर्ती तयार केल्या जातात÷त्यातून तालुक्यात 40 ते 45 कोटी रूपयांची उलाढाल होते.हजारो लोकांना रोजगारही मिळतो.पेण मधील सुबक मूर्तींना जगभरातून मागणी असली तरी मागणीनुसार पुरवठा कऱणे आता अशक्य होताना दिसते आहे.काऱण जे कुशल कामगार होते त्यांनीच स्वतःचे कारखाने उभारले असल्याने नवीन कामगार मिळणे कठीण झाले आहे.परिणामतः पेणे शहरातील काही जुन्या काऱखानदारांनी मूर्ती बनविण्याचे काम कमी केल्याचे चित्र आहे.कामगार टंचाई आणि अन्य वस्तूचां महागाई यामुळे यंदा गणेशमूर्तींच्या किमतीत 20 ते 25 टक्के वाढ झालेली दिसते.गणपती आता दीड महिन्यावर आल्याने गणपतीमूर्ती पाठविण्याच्या कामाला सुरूवात झाली असून पेणमधून ट्रक भरभरून मूर्तींची रवानगी होताना दिसते आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here