भाजपच्या काळात विविध पक्षांचे नेते, सामाजिक कार्यकर्ते, काही पत्रकार यांचे फोन टॅप होत होते अशी तक्रार आहे.. काही अधिकारी इस्त्रायलच्या दौऱ्यावर गेले आणि त्यांनी तेथून फोन टॅपिंगचे आधुनिक सॉफ्टवेअर आणले असाही आरोप होत आहे..फोन टॅपिंग बरोबरच व्हॉटसअॅप, मेसेज आणि टि्वटर वाचण्याची व्यवस्था या तंत्रात आहे.. याची चौकशी करण्याचे आदेश आता गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहेत..त्याचे स्वागत केले पाहिजे.. कारण कोणाच्याही व्यक्तिगत आयुष्यात लुडबूड करण्याचा अधिकार कोणत्याही सरकारला नाही.. त्यामुळे विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे..
माहिती आणि जनसंपर्क विभागाचे काही अधिकारी मध्यंतरी “माध्यमातील आधुनिक तंत्रज्ञान” शिकण्यासाठी म्हणून इस्त्रायलला गेले होते..खरं तर हे तंत्रज्ञान शिकायचे तर इंग्लंडला जाणे अपेक्षित होते.. तिकडे न जाता हे अधिकारी इस्त्रायललाच का गेले? तेथून काय नविन शिकून आले? हे गूढ आहे .. त्यासाठी” ठराविक” अधिरारयांचीच निवड का केली गेली होती? यावरही प़काश झोत पडणे अपेक्षित आहे.. अधिकरयांचया या इस्त्रायल दौरयाला आम्ही तेव्हाच लेखी विरोध केला होता.. तरीही हा दौरा झाला.. या दौरयाचा फोन टॅपिंग प्रकरणाशी काही संबंध आहे का? याचीही चौकशी होणार आहे..त्यातून माहिती आणि जनसंपर्क विभागातील त्या काळातली अनेक प्रकरणं बाहेर येऊ शकतात..
या काळात माझाही फोन टॅप होत असावा असा मला दाट संशय आहे.. कारण माहिती आणि जनसंपर्कचया तत्कालिन एका वरिष्ठ अधिकारयाने मला “आमचा तुमच्यावर वॉच” असल्याची धमकीच दिली होती.. याचीही चौकशी व्हावी अशी मागणीही मी अनिल देशमुख यांच्याकडे करीत आहे..पत्रकारांच्या हककासाठीची आमची चळवळ म्हणजे सरकार विरोधी चळवळ असल्याचा वरिष्ठांचा समज करून दिला गेल्याने आमच्यावरही पाळत ठेवली गेली असावी असं मला वाटतं.. चौकशीतून खरं काय ते निष्पण्ण होईलच..संबंधित अधिकारयांना निलंबित करून या सर्व् प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी केली आहे..