अलिबागः 1993 च्या बॉम्बस्फोटातील आरोपी फारूक टकला याच्या पासपोर्टचे नूतनीकरण कसे झाले याची चौकशी करण्यासाठी सीबीआयचे पथक म्हसळा तालुक्यातील आंबेत येथे येऊन गेल्याचे स्पष्ट झाल्याने जिल्हयात खळबळ उडाली आहे.आंबेत येथील एका शिक्षकाच्या नावावर फारूक टकलाच्या पासपोर्टचे नूतनीकरण झाल्याचे समोर आल्यानंतर या शिक्षकाची चौकशी करण्यासाठी हे पथक 17 तारखेला आंबेतला आले होते अशी माहिती आङे.मात्र महंमद मियॉ या शिक्षकाच्या नावे पासपोर्ट नूतनीकरण झाले त्या नावाचा शिक्षकच शाळेत नसल्याने ही बनावट कागदपत्रे तयार केली गेली काय या अंगानेही चौकशी सुरू आहे.आंबेतनजिक संदेरी जेट्टी येथे 1993 मध्ये संशयित वस्तू उतरविल्या गेल्या होत्या असेही स्पष्ट होत असल्याने या प्रकरणात आता काणा कोणाची चौकशी होणार याची चर्चा जिल्हयात सुरू आहे.–

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here