प्रेस कॉन्सिल ऑफ इंडियाची पुनर्रचना
नवी दिल्ली- प्रेस कॉन्सिल ऑफ इंडियाची पुनर्रचना करण्यात आली असून त्यात संपादक गट,छोटी वृत्तपत्रे,मोठी वृत्तपत्रे गट तसेच श्रमिक पत्रकार गट आणि संघटनांच्या प्रतिनिधीची नेमणूक कऱण्यात आली आहे. .नागपूर येथील ज्येष्ट पत्रकार प्रकाश दुबे यांची महाराष्ट्रातून कॉ न्सिलवर नियुक्ती केली गेली आहे.नव्या समितीचा कार्यकाळ तीन वर्षांसाठी असून चेअरमन न्या.मार्कन्डेय काटजू यांचा देखील कार्यकाळ संपला आहे.नव्या समितीची 27 तारखेला पहिली बैठक होत आहे.
प्रेस कॉन्सिलवर विविध कॅटेगिरीतून 28 सदस्य निवडले जातात.ते पुढील प्रमाणे आहेत.
खासदारांमधून – मीनाक्षी लेखी,राजीव प्रताप रूडी,जी.हरी,प्रभात झा,सत्यभारत चौधरी
संपादकांमधून – रमेश गुप्ता ( वीकली) बिपिन निवार ( छापते,छापते) उत्तमचंद्र शर्मा,( मुझप्फरनगर बुलेटीन ) सुमन गुप्ता (जनमोर्चा) प्रकाश दुबे( भास्कर ग्रुप) कृष्णा प्रसाद ( आउटलूक)
श्रमिक पत्रकार- कौसुरी अमरनाथ,प्रभातकुमार दास,राजीव रंजन नाग,प्रजनंदन चौधरी,एस.एन.सिंग,संदीप शंकर आणि सी.के.नायक
मोठी वृत्तपत्रे- होरमुन्सीजी एन कामा आणि रवींद्र कुमार
मध्यम वृत्तपत्र- कुंद्रा रमन लाल व्यास,गुरींदरसिंग
छोटी वृत्तपत्रे- विजयकुमार चोप्रा,केशवदत्त चंदोला
वृत्तसंस्था- सुधाकर नायर (पीटीआय)
संघटना प्रतिनिधी- पंकज होरा,रामचंद्र राव,के.श्रीनिवास राव