प्रशांत ठाकूर अडचणीत

0
777

अलिबाग ( प्रतिनिधी) निवडणूक नामनिर्देन पत्रासोबत सादर करावयाच्या प्रतिज्ञापत्रात माहिती लपवून ठेवल्याने भाजपचे पनवेलचे आमदार प्रशांत ठाक ूर यांची आमदारकी रद्द करून त्यांना निवडणूक लढविण्यास अपात्र ठरवावे अशी मागणी करणारी एक याचिका पनवेल विधानसभा मतदार संघातील शेकापचे पराभूत उमेदवार बाळाराम पाटील यांनी उच्च न्यायालाय दाखल केली आहे.
याचिकेत म्हटले आहे की,भाजपचे उमेदवार प्रशांत ठाकूर यांनी उरण तालुक्यातील जासई येथील 11 लाख 57 हजार 275 रूपयांची मिळकत प्रतिज्ञापत्रात दाखविलेली नाही,त्याच प्रमाणे कल्पवृक्ष इन्फा प्रोजेक्ट या भागिदारी संस्थेची पनवेल तालुक्यातील नितळस येथील मिळकतही लपवून ठेवलेली आहे.माहिती लपवून ठेवून प्रशात ठाकूर यांनी निवडणूक आयोगाच्या तल्वांचा भंग केलेेला आहे असेही याचिकेत म्हटले आहे.याशिवाय 12 ऑक्टोबर रोजी खारघर सेक्टर 20 मधील एका सोसायटीच्या दारावर संशयितरित्या उभी असलेली एक जीप पोलिसांनी पकडली होती त्यात अडिच लाखांची रक्कम आणि भाजप उमेदवार प्रशात ठाकूर यांचे प्रचार साहित्य पकडले होते.ही गाडी ठाकूर इन्फ्र प्रोजेक्ट लिमिटेडच्या मालकीची असल्याचेही याचिकेत नमूद कऱण्यात आले आहे.
माहिती लपविल्याच्या आरोपावरून मुरबाडचे राष्ट्रवादीचे आमदार यांची आमदारकी 2009मध्ये रद्द कऱण्यात आली होती.त्यामुळे बाळाराम पाटील यांच्या याचिकेचे काय होते याकडे जिल्हयाचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here