पुराचं रिपोर्टिंग करणार्‍या वार्ताहरांचा
माध्यम समुहांनी विमा उतरावा
मराठी पत्रकार परिषदेची मागणी

कोकणात तसेच पश्‍चिम महाराष्ट्रात 2005 च्या प्रलयाची आठवण करून देणारे महापूर आले आहेत.हजारो नागरिकांना याचा फटका बसला आहे..सर्वच ठिकाणी रिपोर्टर आपले जीव धोक्यात घालून पुराचे कव्हरेज करीत आहेत.जेथे शासकीय यंत्रणा पोहोचली नाही अशा ठिकाणी रिपोर्टर आणि फोटोग्राफर पोहचून निसर्गाच्या प्रकोपाची माहिती जगाला देत आहेत.हे आपले कर्तव्यच आहे,ते केलेच पाहिजे.पण हे करताना बर्‍याचदा अतिउत्साह दिसतो तो तर टाळला पाहिजेच त्याचबरोबर आपण स्वतःची देखील काळजी घेतली पाहिजे.कारण आपल्याला काही इजा झाली,किंवा आपण संकटात सापडलो तर आपण ज्या माध्यम समुहासाठी काम करतो आहोत ते आपल्याला वार्‍यावर सोडून देतात हा नेहमीचा अनुभव आहे.आमची माध्यम समुहांकडे विनंती आहे की,जे रिपोर्टर आणि फोटोग्राफर नैसर्गिक आपत्तीचे रिपोर्टिंग करतात त्यांचा विमा वृत्तपत्रांनी किंवा चॅनल्सवाल्यांनी उतरविला पाहिजे जेणे करून वार्ताहरांना अधिक निर्धारानं आपलं कर्तव्य पार पाडता येईल..बघायचं आता असं एखादा माध्यम समुह त्यासाठी समोर येतो का ते…

बातमीत वापरलेले छायाचित्र फाईल पिक्चर आहे.गुगलवरून घेतलेले आहे.

LEAVE A REPLY