वरिष्ठ पत्रकार पुण्यप्रसून वाजपेयी यांना एबीपी न्यूजची नोकरी का सोडावी लागली हे सर्वांना स्मरत असेलच.छत्तीसगढमधील कांकेर जिल्हयातील कन्हारपुरी येथील चंद्रमणी कौशिक या महिलेचे उत्पन्न दुप्पट झाले असं पंतप्रधानांनी एका कार्यक्रमात सांगितल्यानंतर वाजपेयी यांची टीम कन्हारपुरीला गेली आणि त्यांनी पंतप्रधानांच्या दाब्यातील फोलपणा उजेडात आणला.या बातमीची देशभर जोरदार चर्चा झाली.त्याचा परिणाम असा झाला की,पुण्यप्रसून वाजपेयी यांना एबीपी न्यूजचा राजीनामा द्याावा लागला.
साधारणतः सहा महिन्यानंतर पुण्यप्रसून वाजपेयी सूर्या समाचार या वाहिनीसी जोडले गेले आहेत.त्यांनी शनिवारी ही वाहिनी रिलॉन्च करताना आपला लोकप्रिय शो ग्राऊंड जीरो पुन्हा सुरू केला आहे..आणि ज्या चंद्रमणी कौशिक यांच्यामुळं वाजपेयी यांना एबीपी न्यूज सोडावा लागला होता त्याच स्टोरीपासून त्यांनी आपल्या नव्या इनिंगची सुरूवात केली आहे.प्रिया गोल्ड बिस्किटचे मालक सूर्या समाचारचे मालक आहेत.आता बघायचे वाजपेयींची ही इनिंग किती दिवस चालते ते..

LEAVE A REPLY