unity5मराठी पत्रकार परिषद आणि पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्यावतीने 23 आणि 24 डिसेंबर रोजी पुणे ते नांदेड पत्रकार एकता महारॅली काढली जाणार आहे.त्यासंबंधीची  बातमी

पुणे ते नांदेड पत्रकार एकता महारॅलीचे आयोजन 

मुंबई दिनांक १० ( प्रतिनिधी ) 25 डिसेंबर 2016 नांदेड येथे होणार्‍या मराठी पत्रकार परिषदेच्या तालुका अध्यक्षांच्या मेळाव्याच्या निमित्तानं मराठी पत्रकार परिषद आणि पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्यावतीने  पुणे ते नांदेड अशी पत्रकार एकता रॅली  २३ डिसेंबर  रोजी काढली जाणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेचे अध्यक्ष एस.एम.देशमुख यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे.या रॅलीत किमान पन्नास गाडया आणि २०० च्या वर पत्रकार  सहभागी होतील असेही पत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.

एकदा रॅली २३ डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजता पुणे येथून निघेल.या रॅलीला हिरवा झेंडा दाखविण्यासाठी पालकमंत्री गिरीश बापट यांनी उपस्थित राहावे अशी  त्याना विनंती  केली  जाणार आहे.एका पाठोपाठ एक अशा किमान पन्नास गाड्यांचा हा ताफा शिस्तीने ,वाहतुकीला अडथळा न करता मार्गस्थ होईल.रस्त्यात जी शहरे , तालुके आणि जिल्ह्याची  ठिकाणं आहेत तेथे काही काळ स्थानिक पत्रकारांशी संवाद साधून रॅली पुढे मार्गस्थ होईल.त्यानुसार पहिला संवाद शिरूर येथील पत्रकारांबरोबर सकाळी साडेदहा वाजता होईल.दुपारी साडेबारा वाजता रॅली नगरला पोहोचेल.तेथे स्थानिक पत्रकारांशी संवाद आणि भोजण झाल्यानंतर रॅली पुढील प्रवासासाठी निघेल.रात्री रॅलीचा मुक्काम औरंगाबाद येथे असेल तेथीही स्थानिक पत्रकारांशी संवाद होईल.पत्रकार परिषद घेऊन एकता रॅली आणि एकूणच पत्रकार चळवळीची माहिती पत्रकारांना दिली जाणार आहे..२४ ला सकाळी जालना येथे पत्रकारांशी संवाद झाल्यानंतर दुपारी रॅली परभणीत पोहोचेल.नंतर वसमत नगर आणि पुढे रॅली सायंकाळच्या सुमारास नांदेडला पोहोचेल.नांदेड शहरातून ही रॅली मुक्कामाच्या ठिकाणी येईल.तेथे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी रॅलीचे स्वागत करावे असा प्रयत्न केला जाणार आहे.दुसर्‍या दिवशी म्हणजे पंचवीसला तालुका अध्यक्ष,तालुका पदाधिकारी  तसेच जिल्हासंधांच्या पदाधिकार्‍यांचा मेळावा होणार असून या मेळाव्यास मुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस, यांनी मार्गदर्शन करावे अशी विनंती त्याना करण्यात आली आहे.कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनाही निमंत्रित करण्यात येत आहे.ज्येष्ठ पत्रकार आणि ग्रामीण भागाचे अभ्यासक पी.साईनाथ यांनीही मेळाव्यास मार्गदर्शन करावे अशी विनंती त्यांना करण्यात आली आहे.

रॅलीमध्ये  मुंबई,पुणे,रायगड,ठाणे,पालघर,नवी मुंबई, रत्नागिरी , सातारा येथील पत्रकारांनी पुणे येथेच रॅलीत सामिल व्हायचं आहे.नाशिकच्या पत्रकारांनी नगरला रॅलीत सहभागी व्हावे.बुलढाणा येथील पत्रकारांनी जालन्यात ,बीडच्या पत्रकारांनी मानवत  किंवा परभणीत ,लातूर,उस्मानाबाद,हिंगोली,वाशिम येथील पत्रकारांनी परभणी येथे रॅलीत सामिल व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.अन्य जिल्हयातील पत्रकारांनी परस्पर नांदेडला पोहोचवायचे आहे.रॅली पुढे जात असताना नगर,औरंगाबाद,जालना,परभणी येथील पत्रकारही रॅलीबरोबर असणार आहेत.

समोर एक उघडी जीप असणार आहे.त्यावर स्पीकरची व्यवस्था केली जाईल.तसेच प्रत्येक गाडयावर बॅनर्स लावले जाणार आहेत.परिषद आपला स्वतःचा ध्वज लवकरच तयार करणार असल्याने तो ध्वजही प्रत्येक गाडीवर असणार आहे.रॅलीच्या मार्गावरील प्रत्येक शहरात स्थानिक नेतृत्वानं रॅलीचं स्वागत करावं अशी विनंती केला जाणार आहे.पत्रकारांची अशी माहारॅली प्रथमच निघणार असल्याने या रॅलीत जास्तीत जास्त पत्रकारांनी सहभागी व्हावे असे आवाहन मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष एस.एम.देशमुख,विश्‍वस्त किरण नाईक, माजी अध्यक्ष संजीव कुलकर्णी ,कार्याध्यक्ष सिध्दार्थ शर्मा,सरचिटणीस यशवंत पवार,कोषाध्यक्ष मिलिंद अष्टीवकर तसेच विभागीय चिटणीस हेमंत बिर्जे,शरद पाबळे,मीनाताई मुनोत अनिल महाजन,विजय जोशी,समीर देशपांडे,हेमंत डोर्लिकर,राजेद्र काळे, धनश्री पालांडे आणि परिषद कार्यकारिणीने  केले आहे ..मेळाव्याचे आयोजन नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्यावतीने केले जात आहे.मेळाव्यास जास्तीत जास्त पत्रकार पदिधिकार्‍यांनी उपस्थित राहावे असे आवाहन नांदेड जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रकाश कांबळे,परिषद प्रतिनिधी राजू नागापूरकर तसेच परिषद कार्यकारिणी सदस्य श्रीराम शेवडीकर यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here