पाशा पटेल यांचा तोळ ढळला,पत्रकाराला अर्वाच्च शिविगाळ

0
2926

जनतेच्यावतीने प्रश्‍न नेत्यांना प्रश्‍न विचारणे हे पत्रकारांचे काम असते.हे प्रश्‍न त्यांना रूचणारेच असले पाहिजेत असं नाही.बहुतेक वेळा न आवडणार्‍या प्रश्‍नांनाही संयतपणे सामोरे जाणे हे नेत्याचं कर्तव्य आहे.मात्र सत्तेची नशा डोक्यात गेलेल्या अनेकांना हे भान राहात नाही.कृषी मूल्या आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांची अवस्था आज लातूरमध्ये अशीच झाली.सरकारने शेतकर्‍यांची वाट लावली आहे काय असा प्रश्‍न महाराष्ट्र वनचे प्रतिनिधी विष्णू बुगेर्र् यांनी विचारला असता.या प्रश्‍नांचे उत्तर एका शब्दात ‘नाही’ असे देऊन पाशा पटेल मोकळे होऊ शकले असते.किंवा सरकार शेतकरी हिताची भूमिका घेतंय असंही एका वाक्यात सांगू शकले असते मात्र त्यांनी असं केलं नाही.त्यांनी संबंधित वाहिनीच्या पत्रकाराला ऐकाव्या वाटणार नाही अशा अश्‍लिल शिव्या घालायला सुरूवात केली.पाशा पटेल यांचा पारा एवढा चढला होता की,अजूबाजूचे लोक त्यांना शांत करीत असतानाही ते शांत व्हायला तयार नव्हते.( सोबत पाशा पटेल यांच्या प्रतापाची क्लीप देत आहे.) पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती तसेच मराठी पत्रकार परिषद पाशा पटेल यांच्या या अरेरावीचा तीव्र शब्दात धिक्कार करीत असून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे..–

पत्रकार एकता झिंदाबाद

महाराष्ट्र वन वाहिनीचे पत्रकार विष्णू बिरगे यांनी अडचणीचा प्रश्‍न विचारला म्हणून पाशा पटेल यांनी त्यांना अर्वाच्च शिविगाळ केली.याविरोधात लातूरमधील बहुसंख्य पत्रकार विष्णू बुरगेच्या पाठिशी उभे राहिले आणि त्यांनी भक्कम एकजूट दाखविली.पत्रकारांमधील ही एकजूटच पाशा पटेल यांच्यासाऱख्या मस्तवाल नेत्यांना सरळ करू शकेल.लातूरमधील पत्रकारांना मनापासून धन्यवाद.

https://www.facebook.com/vinodjire2311/videos/1927508970902878/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here