पालघरमध्ये खाकी वर्दीची अरेरावी..

0
440

पालघर ः पोलिसांकडून पत्रकारांवर होणार्‍या हल्ल्यांची संख्या संतापजनक वाढत आहे.मागील वर्षात अशा अनेक घटना घडल्या ..त्यात नगर,वाई येथील घटनांचा समावेश आहे.नव्या वर्षात तिसर्‍याच दिवशी पालघरमध्ये सकाळचे ज्येष्ठ पत्रकार पी.एम.पाटील यांच्याशी काल ट्रॅफिक पोलिसाने गैरवर्तन करीत त्यांची कॉलर पकडली आणि धक्काबुक्की देखील केली.पाटील यांचा गुन्हा काय ? तर टॅ्रफिक पोलिसाला त्याच्या कर्तव्याची जाणीव करून देणे.रस्त्यात प्रचंड वाहतूक कोंडी झालेली असताना टॅफिक पोलीस वसावे बाजुला उभे राहून सारा प्रकार पहात होते.त्यावर ‘वाहतूक कोंडी झालेली असताना आपण बघ्याची भूमिका का घेत आहात’? असा प्रश्‍न विचारला.झालं खाकी वर्दी खवळळी.वसावे यांनी पत्रकार पाटील यांची कॉलर पकडली आणि त्यांनी पाटील यांना एखादया गुन्हेगारासारखे पोलीस ठाण्यात नेले.पालघर जिल्हा मराठी पत्रकार परिषदेने या घटनेचा निषेध केला असून परिषदेचे शिष्टमंडळ आज जिल्हा पोलीस अधीक्षकांना भेटून वसावे यांच्यावर कारवाईची मागणी कऱणार आहे.पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीने देखील या घटनेचा निषेध केला आहे.

LEAVE A REPLY