पाणीदार गावासाठी
सत्कार भाऊंचा..

दुष्काळाच्या घनदाट छायेत वावरणारं देवडी गाव पुन्हा पाणीदार व्हावं, गावातील पाणी समस्या कायम स्वरूपी हद्दपार व्हावी ही आमचे वडील माणिकराव देशमुख यांची जुनी इच्छा.. ते सरपंच असताना त्यांनी तसाठी सरकार दरबारी पाठपुरावा देखील केला..गावातील दोन नद्यांच्या संगमावर केटी पध्दतीचा बंधारा त्यांनी मंजूरही देखील करून आणला.ते करताना तत्कालिन जलसंधारण मंत्री सुनील तटकरे यांना देवडी गावात आणून एक काय॓क़म देखील घेतला.. पण काही कारणांनी तेव्हा बंधारयाचं काम होऊ शकलं नाही.. ही खंत गेली पंधरा वीस वर्षे त्यांच्या मनात होती.. त्यामुळं तुम्हाला गावासाठी काही करायचं असेल तर आडी बंधारा प्रकल्प मार्गी लावा असं त्याचं मला आणि आमचे धाकटे बंधू दिलीप देशमुख यांना सांगणं असायचं. त्यानुसार दिलीप यांनी सकाळचे श्री. प्रतापराव पवार यांच्याकडे शब्द टाकला आणि वडिलांच्या पुण्याई मुळे त्यांनी देखील होकार देत सकाळ रिलीफ फंडाच्या माध्यमातून बंधारा बांधून देण्याचा शब्द दिला.. त्यानंतर बंधारयाचं कामही सुरू झालं.. नदीचं खोलीकरण करून ८६ मिटर लांबीचा हा बंधारा आता पूर्ण झाला आहे.. ८०० मिटर लांबीच्या या बंधारयात ८ कोटी लिटर पाणी साठणार असल्याने गावची पाणी टंचाई तर दूर होणारच आहे त्याचबरोबर देवडी गावची दुष्काळाच्या फेरयातून कायमची सुटका होणार आहे..गाव पुन्हा पाणीदार होणार आहे.. आमच्या वडिलांचा सततचा पाठपुरावा, जिद्द, आणि गावाच्या विकासाच्या प़ामाणिक तळमळीतून हे शक्य झालं आहे. त्याबद्दल वडवणी येथील पत्रकार मेळाव्यात सकाळचे संपादक संजय वरकड आणि केशवराव आंधळे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, आणि स्मृतीचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.. बंधारयाचया कामात भाऊंच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे बाबासाहेब झाटे, तुळशीराम राऊत यावेळी उपस्थित होते.. 90 वषा॓चे भाऊ आजही गावच्या विकासासाठी प़यतन करीत असतात. पाणी टंचाई मुक्त देवडीचे वडिलांचे स्वप्न आम्हाला साकार करता आले याचा नक्कीच आनंद आहे..बंधारा वेळेत पूर्ण व्हावा आणि कामही दर्जेदार व्हावं यासाठी सकाळच्या औरंगाबाद आवृत्तीचे संपादक संजय वरकड, आणि बीड जिल्हा प़तिनिधी दत्ता देशमुख यांनी जातीनं लक्ष दिले.. त्यांचेही आभार..

LEAVE A REPLY