पाच नगरपंचायतीसाठी रायगडात मतदान सुरू
रायगड जिल्हयातील खालापूर,तळा,माणगाव,म्हसळा आणि पोलादपूर या पाच नगरपंचायतीसाठी आज सकाळी मतदानाला सुरूवात झाली.थंडी असली तरी सकाळी अनेक मतदार केंद्रासमोर मतदारांच्या रांगा दिसत होत्या.पाच नगरपंचायतीच्या 82 जागांसाठी 246 उमेदवार रिंगणात आहेत.छोट्या शहरातील या निवडणुका प्रथमच होत असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी आणि नेत्यांनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे.काल रात्री तळा येथे राष्ट्रवादी -शिवसेनेच्या कार्यकर्त्यामध्ये तुफान मारामारी झाल्याने तेथे तणावपूर्ण वातावरणात मतदान होत आहे.या प्रकरणी उभय गटाच्या 14 कार्यकर्त्यांना पोलिसानी अटक केली आहे.तळ्यातील या घटनेमुळे जिल्हयातील पाचही ठिकाणी कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.–