पाकिस्तानी मिडियाचा हरामखोरपणा

0
1186

इस्लामाबाद-  कुलभूषण जाधव यांच्या मातोश्री आणि त्यांच्या पत्नीला पाकिस्तानी सरकारनं अपमानास्पद वागणूक तर दिलीच त्याचबरोबर पाकिस्तानी मिडियानं जखमेवर मीठ चोळत आपल्या असभ्य संस्कृतीचे दर्शन घडविणारे प्रश्‍न कुलभूषण जाधव यांच्या मातोश्री आणि पत्नीला विचारले.पाकिस्तानी मिडियाचा हा हलकटपणा संतापजनकच आहे.

त्नी कुलभूषण यांची भेट घेतल्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाचे बाहेर थांबले होते. याचदरम्यान, पाकिस्तानी माध्यमांनी त्यांना अपमास्पद प्रश्न विचारले. गुन्हेगार मुलाला भेटून आनंद झाला का? (अपने कातील बेटे से मिलने के बाद आपके क्या जजबात हैं? ) तुमच्या पतीने हजारो निष्पाप पाकिस्तांनी लोकांच्या रक्ताने होळी खेळली आहे, याबद्दल काय सांगालं? (आपके पतिदेव ने हजारों बेगुनाह पाकिस्तानियों के खून से होली खेली है, इसके बारे में क्या कहती हैं आप?’ ), असे प्रश्न पाकिस्तानच्या माध्यमांनी विचारले.

कुलभूषण जाधव यांची आई व पइस्लामाबादमध्ये  पाक उच्चायुक्तालयाच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या शिपिंग कंटेनरमध्ये जाधव आणि त्यांच्या कुटुंबीयांची काचेच्या भिंतीआडून भेट झाली होती. त्यानंतर जाधव यांच्या पत्नी आणि आई शिपिंग कंटेनरमधून बाहेर पडताच पाकिस्तानी मीडियानं त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. पाकिस्तानी पत्रकार त्यांना ओरडून ओरडून प्रश्न विचारत होते. ‘या भेटीवर समाधानी आहात का? तुमच्या पतीने हजारो पाकिस्तानी नागरिकांना ठार मारलं, त्यावर तुमचं काय मत आहे?,’ असे प्रश्न पाकिस्तानी पत्रकारांनी जाधव यांच्या पत्नीला केले. जाधव यांच्या आईलाही असेच अपमानास्पद प्रश्न विचारण्यात आले. त्यामुळे त्यावर कोणतीही प्रतिक्रिया न देता त्या निघून गेल्या. कुलभूषणच्या आई, पत्नीला काढायला लावले मंगळसूत्र, बांगड्या अन् टिकलीही कुलभूषण यांची आई अवंती व पत्नी चेतनकुल यांनी इस्लामाबादहून परत आल्यानंतर मंगळवारी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची भेट घेतली. यावेळी सुरक्षेच्या नावाखाली या दोघींच्या सांस्कृतिक व धार्मिक भावनांचा अनादर केला गेला. यात त्यांना मंगळसूत्र, बांगड्या व कपाळावरील टिकलीही काढून ठेवायला लावली व सुरक्षेच्या दृष्टीने गरजचे नसूनही पेहराव बदलायला लावला. जाधव यांच्या आईची मातृभाषा मराठी असल्याने त्यांनी मुलाशी त्या भाषेत बोलणे स्वाभाविक होते. परंतु त्या मराठीत बोलू लागल्यावर वारंवार त्यांना थांबविले गेले व शेवटी मराठी बोलणे बंद करायला लावले गेले. पत्नी अनवाणी परतली भेटीच्या खोलीत जाण्याआधी जाधव यांच्या पत्नी व आईला त्यांची पादत्राणे बाहेर काढून ठेवायला सांगितले गेले. मात्र भेटीनंतर, वारंवार विनंती करूनही जाधव यांच्या पत्नीला त्यांचे बूट परत दिले गेले नाहीत. असे का केले गेले हे अनाकलनीय आहे.
दैनिक लोकमतच्या आधारे साभार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here