राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात कसे योग्य उपचार दिले जातायेत. याबाबत राष्ट्रवादी, भाजपचे स्थानिक पदाधिकारी आणि पालिका आयुक्त टेंभा मिरवत होते. तेंव्हाच पवारांनी सर्वांचे कान टोचले. पुण्यात वेळेत सुविधा उपलब्ध न झाल्याने पत्रकार पांडुरंग रायकर यांचा मृत्यू झाला. या बाबीकडे पवारांनी बोट दाखवल आणि पिंपरीतल्या जंबो कोविड सेंटरमध्ये नेमकं कसे उपचार दिले जातायेत हा महत्वाचा प्रश्न असल्याचं म्हटलं. तुम्ही पाहताय पुण्यातील माध्यम प्रतिनिधीचा मृत्यू झाला. पत्रकार असो की सामान्य यात अनेक बिचाऱ्यांचे मृत्यू होतायेत. कोरोनासाठी स्वतंत्र व्यवस्था करूनही अनेक बाबी समोर येतायेत. डॉक्टर्स नाही, नर्स नाही, वेळेवर औषध नाही अशा तक्रारी येतायेत अशी खंत ही पवारांनी व्यक्त केली. काही अति करतात पण असं घडता कामा नये अशी सूचना ही पवारांनी यावेळी दिली.

पत्रकार पांडुरंग रायकर यांच्या मृत्यूनंतर पुण्यातील आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे निघाले. पुण्यातील जंबो कोविड सेंटरचा निष्क्रिय कारभार ही यानिमित्ताने चव्हाट्यावर आला. तर पिंपरी चिंचवडमध्ये मृतांचा आकडा नऊशे घरात पोहचायला लागला असतानाही गेल्या आठवड्यात उद्घाटन झालेलं कोविड हॉस्पिटल अद्याप ही रिकामं असल्याची बाब एबीपी माझाने समोर आणली. तर अण्णा साहेब मगर स्टेडियमवरील 816 बेडस् च्या जंबो कोविड केअर सेंटरमध्ये ही केवळ 66 रुग्ण उपचार घेत असल्याचं समोर आलं.

शहरातील कोरोना रुग्णांनी 50 हजारांचा टप्पा आणि मृतांचा आकडा नऊशेच्या घरात जायची वेळ आली असताना ही तात्पुरती रुग्णालये रिकामी का? असा प्रश्न उपस्थित होताच दस्तुरखुद्द शरद पवार अचानक पालिकेत आले. त्यांनी पालिका आयुक्त, भाजप पदाधिकारी आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून कोरोनाची इत्यंभूत माहिती घेतली. यावेळी सर्वांनी पालिकेच्या वायसीएम रुग्णालयात कोरोना रुग्णांवर कसे यशस्वी उपचार दिले जातायेत, याचा टेंभा मिरवला. तेव्हा पवारांनी सर्वांचे कान टोचले.

कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या रुग्णालयात रुग्णांवर कसे उपचार दिले जातायेत, हा प्रश्न महत्वाचं असल्याचा शालजोडा लगावला. पुण्यात एका पत्रकाराला जीव गमवावा लागला. पत्रकार असो की सामान्य अनेक बिचाऱ्यांचे जीव जातायेत. त्यामुळे कोरोनासाठी स्वतंत्र व्यवस्था उपलब्ध करून ही रुग्ण आणि नातेवाईकांकडून अनेक प्रश्न उपस्थित केले जातायेत. डॉक्टर्स नाहीत, नर्स नाहीत, वेळेत औषधं नाहीत अशा तक्रारी समोर येतायेत, अशी खंत पवारांनी व्यक्त केली. काही अति करत असतीलही पण असे घडता कामा नये अशा सूचना ही पवारांनी दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here