Saturday, May 15, 2021

पुणे जिल्हा पत्रकार संघांच्या निवडणुका

मराठी पत्रकार परिषद,पुणे जिल्हा पत्रकार संघ आणि पुणे महानगर पत्रकार संघ या तीनही संस्थांची निवडणूक प्रक्रिया सध्या सुरू झालेली आहे.पुणे जिल्हा पत्रकार संघ आणि महनगर पत्रकार संघ परिषदेशी संलग्न असून या दोन्ही संस्थांच्या विद्यमान कार्यकारिणीची मुदत संपल्याने या निवडणुका होत आहेत.तसेच परिषदेच्या निवडणुकांचा कार्यक्रम देखील जाहीर झाला असून या तीनही निवडणुका ऑनलाईन पध्दतीनं होत आहेत.म्हणजे आपणास मोबाईलवरून आपल्या आवडत्या उमेदवाराला मतदान करता येणार आहे.मराठी पत्रकार परिषद ही देशातील पहिली आणि एकमेव अशी संस्था आहे की,ज्या संस्थेच्या निवडणुका ऑनलाईन पध्दतीनं पार पडत आहेत..–

मराठी पत्रकार परिषद—–
व्दैवार्षिक निवडणूक २०१७ ते २०१९
————————————————
** सभासद यादी कार्यालयात उपलब्ध करून देणे :   बुधवार दिनांक ४ ऑक्टोबर २०१७
                                                            सकाळी ११: ३० ते दुपारी २:३०
**   नामनिर्देशन पत्र मिळण्याची तारीख व वेळ   :  गुरूवार दिनांक ५ ऑक्टोबर ते मंगळवार १० ऑक्टोबर २०१७
                                                            सकाळी ११:३ ते दुपारी २:३०
** नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची तारीख व वेळ                     ११ ऑक्टोबर  २०१७
                                                                              वेळ  सकाळी ११:३० ते २:३०
** नामनिर्देशन पत्रांची छाननी तारीख व वेळ   बुधवार             दि.११ ऑक्टोबर–  दुपारी ३ ते ५
** उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख व वेळ             : शुक्रवार दिनांक १३ ऑक्टोब २०१७
                                                                   वेळ  सकाळी ११.३० ते      दुपारी३वाजेपर्यंत
** उमेदवारांची अंतिम यादी  प्रसिद्ध करणे. (त्याच दिवशी)
                                                                        शुक्रवार दि.१३ ऑक्टोबर, सायं ५ वा.
निवडणूक घेणे आवश्यक वाटल्यास ऑनलाईन :   शनिवार दिनांक १४ ऑक्टोबर ते ३० ऑक्टोबर २०१७
निवडणूक प्रक्रिया पूर्ण करणे…
** ऑनलाईन मतदानाची तारीख                                         मंगळवार दि.  ३१ऑक्टोबर १७
                                                                              सकाळी  १०ते दुपारी ४ वाजेपर्यंत
निकाल जाहीर करणे.                  ः                             ३१ ऑक्टोबर२०१७ रोजी सायंकाळी ५:३०नंतर
निवडणुकीसाठी नियम व अटी
1 पत्रकारितेव्यतिरिक्त अन्य कारणांसाठी गुन्हे दाखल असलेल्या सदस्यांना कोणत्याही पदासाठी अर्ज भरता येणार नाही
2  कार्याध्यक्ष आणि सरचिटणीस या दोन पदांसाठी ही निवडणूक ऑनलाईन पध्दतीनं होईल.
3 निवडणूक अधिकारी म्हणून सातारा येथील पत्रकार शरद काटकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.कर्जत येथील पत्रकार संतोष पेरणे हे सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहतील.
—————————————————————————————————–
*पुणे महानगर पत्रकार संघाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर*
*प्रथमच होणार ऑनलाईन पध्दतीने निवडणूक *
नागपूर येथे झालेल्या मराठी पत्रकार परिषदेच्या विशेष सर्वसाधारण सभेत राज्यातील महानगर पत्रकार संघांना थेट मराठी पत्रकार परिषदेशी जोडून घेण्याचा निर्णय झालेला आहे.तशी घोषणा शेगाव येथील अधिवेशनात करण्यात आली आहे.त्यामुळं 1 सप्टेंबरपासून राज्यातील ज्या शहरात महापालिका आहेत तेथील पत्रकार संघ  थेट परिषदेशी जोडले गेले आहेत.हे पत्रकार संघ आता जिल्हा पत्रकार संघाशी संलग्न नसले तरी या दोन्ही संघांनी परस्पर पूरक काम करावे अशी अपेक्षा आहे.परिषदेचा विस्तार व्हावा,परिषदेचे काम वाढावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.या निर्णयामुळे आता पुणे महानगर पत्रकार संघ थेट परिषदेशी जोडला गेलेला आहे.तव्दतच पिंपरी-चिंचवड महानगर पत्रकार संघही यापुढे थेट परिषदेला जोडला गेलेला आहे.
महानगर पत्रकार संघ परिषदेशी जोडले जाण्याअगोदरच पुणे शहर पत्रकार संघांची कार्यकारिणी बरखास्त करण्याचा निर्णय पुणे जिल्हा पत्रकार संघाने घेतलेला होता.त्या संदर्भातले अपिल मराठी पत्रकार परिषदेकडे कऱण्यात आले होते.मात्र परिषदेच्या 25 जुलै रोजी मुंबईत झालेल्या बैठकीत जिल्हा पत्रकार संघाचा निर्णय कायम ठेवण्याचा निर्णय झाल्याने पुणे शहर पत्रकार संघांची कार्यकारिणी आता अस्तित्वात नाही.त्यामुळं येथे नव्याने निवडणुका घेण्याचा निर्णय जिल्हा संघ आणि परिषदेच्या 16 सप्टेंबर रोजी पुण्यात झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे.त्याचा निवडणूक कार्यक्रम जाहीर कऱण्यात येत आहे.कार्यकारिणी बरखास्त झालेली असल्याने यावेळेस अध्यक्षांसह, कार्याध्यक्ष, उपाध्यक्ष, सरचिटणीस आणि कोषाध्यक्ष अशा पाच पदांसाठी निवडणुका होतील. नवे पदाधिकारी परिषदेच्या सल्ल्यानुसार  कार्यकारिणीची सात पदे निवडतील. त्यातील एकजण परिषद प्रतिनिधी म्हणून नियुक्त केला जाईल. एक निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त केला जाईल. तसेच निवडणुका निःपक्ष वातावरणात पार पडाव्यात यासाठी परिषदेकडून एक निरिक्षक पाठविला जाईल.
या कार्यक्रमासाठी 5 जणांची अस्थायी समिती नेमण्यात आली आहे. समितीतील कोणालाही निवडणूकीत उमेदवार म्हणून भाग घेता येणार नाही. किंवा कोणा उमेदवाराच्या बाजूने प्रचार करता येणार नाही. सभासद नोंदणीसाठी खालील सदस्यांशी संपर्क करावा. यापुर्वी सदस्य झालेल्या सदस्यांना देखील वार्षिक वर्गणी भरून सदस्य व्हावे लागेल.निवडणुका प्रथमच ऑनलाईन पध्दतीनं होत असल्यानं सर्व मतदारांना फोन नंबर्स नोंदविणे आवश्यक आहे.सभासद अर्ज अस्थायी समितीच्या सदस्यांकडं उपलब्ध करून दिले जात आहेत. वर्गणी भरल्यानंतर त्याची रितसर पावती घेतली जावी.निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर त्याचे ठिकाण जाहीर कऱण्यात येईल.
*अस्थायी समिती सदस्य ः *
1) बाबासाहेब तारे : 9420162728
2) सुनील वाळुंज ः 9822195297
3) दिगम्बर माने :9970032511
4) जितेंद्र मैड ः 9960369199
5) रामचंद्र कुंभार  : 9665108492
निवडणूक कार्यक्रम
1) *सभासद नोंदणी व अर्ज विक्री  ः*
21  सप्टें. 2017 सकाळी 10.00  वा. पासून 29 सप्टें. 2017 सायं. 5.00 पर्यंत
2) *सभासद अर्ज छानणी  ः*
3  आॅक्टो. 2017
3) *मतदार यादी जाहीर करणे ः*
4  आॅक्टो. 2017 सकाळी 11.00 वा.
4) *उमेदवारी अर्ज वाटप व स्विकारणे ः* 5  व 6  आॅक्टो. 2017
5) *उमेदवारी अर्ज छानणी ः*
7  आॅक्टो. 2017 सकाळी 11.00  ते दुपारी 1.00  वा. पर्यंत.
6) *उमेदवारी अर्ज माघार ः*
7 आॅक्टो. दुपारी 1 ते सायं. 5 वा. पर्यंत.
7) *उमेदवार अंतिम यादी जाहीर करणे  ः*   7 आॅक्टो. सायं 5.30  वा.
8) *मतदान              ः*
रविवार दि. 15  सकाळी 10.00  ते 3.00  वा. पर्यंत
9) *मत मोजणी           ः*
रविवार दि. 15  दुपारी 3.00  वा.
10) *निवडणूक निकाल     ः*
रविवार दि. 15  दुपारी 4.00  वा.
*अध्यक्ष*
*मराठी पत्रकार परिषद*
—————————————————————————————————–
पुणे जिल्हा पत्रकार संघ
द्वैवार्षिक निवडणूक कार्यक्रम – सन 2017-19
प्रथमच होणार आँनलाईन निवडणूक
पुणे जिल्हा पत्रकार संघाच्या शनिवार दि. 16 सप्टें. 2017 रोजी झालेल्या मासिक सभेत जिल्हा पत्रकार संघाची निवडणूक घेण्याबाबतचा ठराव झाला आहे. त्यानुसार खालील प्रमाणे निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
 1) सभासद नोंदणी  ः 20 सप्टें. 2017 सकाळी 10.00 वा. पासून 5 आँक्टो. 2017 सायं. 5.00 पर्यंत
2) सभासद अर्ज छानणी  ः 6 व 7 आँक्टो. 2017
3) मतदार यादी जाहीर करणे ः 9 आँक्टो. 2017 सायं. 5.00 वा.
4) उमेदवारी अर्ज वाटप व स्विकारणे ः 10 व 11 आँक्टो. 2017
5) उमेदवारी अर्ज छानणी ः 12 आँक्टो. 2017
6) उमेदवारी अर्ज माघार ः 13 आँक्टो. सकाळी 11.00 ते दुपारी 4.00 वा. पर्यंत.
7) उमेदवारी जाहीर करणे  ः 13 आँक्टो. दुपारी 4.00 वा.
8) मतदान     ः रविवार दि. 29 आँक्टो. सकाळी 10.00 ते 3.00 वा. पर्यंत
9) मत मोजणी         ः रविवार दि. 29 आँक्टो. दुपारी 3.00 ते 4.00 वा.
10) निवडणूक निकाल     ः रविवार दि. 29 आँक्टो. दुपारी 4.00 वा.
कृष्णकांत कोबल
अध्यक्ष
पुणे जिल्हा पत्रकार संघ
(टीप ः नागपूर येथे झालेल्या मराठी पत्रकार परिषदेच्या विशेष सर्वसाधारण सभेत राज्यातील महानगर पत्रकार संघांना थेट मराठी पत्रकार परिषदेशी जोडून घेण्याचा निर्णय झालेला आहे. 1 सप्टेंबर 2017 पासून राज्यातील महापालिका क्षेत्रातील शहर पत्रकार संघ थेट परिषदेशी जोडले गेले आहेत. या निर्णयामुळे आता पुणे महानगर पत्रकार संघ थेट परिषदेशी जोडला गेलेला आहे. तव्दतच पिंपरी-चिंचवड महानगर पत्रकार संघही यापुढे थेट परिषदेला जोडला गेलेला आहे. त्यामुळे या दोन्हीही संघांना जिल्हा पत्रकार संघाच्या निवडणूकीत मतदाता अथवा उमेदवार म्हणून सहभागी होता येणार नाही. )

Related Articles

उध्दवजी आता तरी हट्ट सोडा

मध्य प्रदेश सरकार घेणार कोराना बाधित पत्रकारांची काळजीमहाराष्ट्र सरकार आपला हट्ट कधी सोडणार : एस.एम.देशमुख मुंबई : मध्य प्रदेशमधील शिवराज सिंह चौहान सरकार राज्यातील कोरोना...

कुबेरांची कुरबूर

कुबेरांची कुरबूर अग्रलेख मागे घेण्याचा जागतिक विक्रम लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांच्या नावावर नोंदविला गेलेला आहे.. तत्त्वांची आणि नितीमूल्यांची कुबेरांना एवढीच चाड असती तर त्यांनी...

पत्रकारांच्या प्रश्नांवर भाजप गप्प का?

पत्रकारांच्या प्रश्नावर भाजप गप्प का? :एस.एम.देशमुख मुंबई : महाराष्ट्र सरकार पत्रकारांना फ़न्टलाईन वॉरियर्स म्हणून घोषित करीत नसल्याबद्दल राज्यातील पत्रकारांमध्ये मोठा असंतोष असला तरी विरोधी पक्ष...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

21,960FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles

उध्दवजी आता तरी हट्ट सोडा

मध्य प्रदेश सरकार घेणार कोराना बाधित पत्रकारांची काळजीमहाराष्ट्र सरकार आपला हट्ट कधी सोडणार : एस.एम.देशमुख मुंबई : मध्य प्रदेशमधील शिवराज सिंह चौहान सरकार राज्यातील कोरोना...

कुबेरांची कुरबूर

कुबेरांची कुरबूर अग्रलेख मागे घेण्याचा जागतिक विक्रम लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांच्या नावावर नोंदविला गेलेला आहे.. तत्त्वांची आणि नितीमूल्यांची कुबेरांना एवढीच चाड असती तर त्यांनी...

पत्रकारांच्या प्रश्नांवर भाजप गप्प का?

पत्रकारांच्या प्रश्नावर भाजप गप्प का? :एस.एम.देशमुख मुंबई : महाराष्ट्र सरकार पत्रकारांना फ़न्टलाईन वॉरियर्स म्हणून घोषित करीत नसल्याबद्दल राज्यातील पत्रकारांमध्ये मोठा असंतोष असला तरी विरोधी पक्ष...

वेदनेचा हुंकार

वेदनेचा हुंकार एक मे हा दिवस प्रचंड तणावात गेला.. तणाव उपोषणाचा किंवा आत्मक्लेषाचा नव्हताच.. मोठ्या हिंमतीनं, निर्धारानं अशी शेकड्यांनी आंदोलनं केलीत आपण.. ती यशस्वीही केलीत.....

पुन्हा तोंडाला पाने पुसली

सरकारने पत्रकारांच्या तोंडाला पुन्हा पुसली मुंबई : महाराष्ट्रातील पत्रकारांना फ़न्टलाईन वर्कर म्हणून जाहीर करण्याचा निर्णय आजच्या कॅबिनेटमध्ये होईल अशी जोरदार चर्चा मुंबईत होती पण...
error: Content is protected !!