It

चाकू हल्ल्यात परळीतील पत्रकार,
त्यांचा मुलगा, पत्नी गंभीर जखमी

परळी येथील पत्रकार संभाजी मुंडे यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांवर एका टोळक्याने चाकूनं हल्ला केला.. त्यात ते स्वतः, त्यांच्या पत्नी, मुलगा गंभीर जखमी झाले आहेत.. त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.. आज एका टोळक्याने त्यांच्या घरात घुसून धुडगूस घातला.. तिघांवरही चाकुने वार केले..
पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती, मराठी पत्रकार परिषदेने या हल्ल्याचा तीव्र शब्दात धिक्कार केला आहे.. हल्लेखोरांना त्वरित अटक करावी अशी मागणी पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे एस.एम.देशमुख यांनी दूरध्वनीवरून केली आहे..हल्ल्याचे कारण अजून स्पष्ट झाले नसले तरी हा हल्ला राजकीय वादातून झाला नसल्याची माहिती समोर आली आहे..
दरम्यान या हल्ल्याची पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी गंभीर दखल घेतली असून हल्लेखोर कोणीही असले तरी त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असेही धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले आहे..
अर्णब गोस्वामी यांच्यावरील हल्ला असेल किंवा सुधीर चौधरी यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्याच्या वेळेस हा माधयमांवरील हल्ला असल्याचे ढोल काही मंडळींनी पिटले.. संभाजी मुंडे यांच्यावरील हल्ला किती जणांना माधयमांवरील हल्ला आहे असे वाटते ते बघायचे..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here