परभणीतही पत्रकारावर हल्ला

0
752

खामगाव येथील संपादकांवरील हल्ल्याची घटना ताजी असतानाच आज परभणी येथे देखील दैनिक गावकरीचे पत्रकार मोहसिन खान यांच्यावर जीवघेणा हल्ला केला गेला.जिल्हयातील काही गुंडांना तडीपार करण्यात आले आहे.त्यासंदर्भात पोलिसांनी एक प्रेस नोट काढली होती.त्याच्या आधारे गावकरी आणि अन्य साऱ्याच दैनिकात बातम्या आलेल्या आहेत.मात्र काही समाजकंटकांनी बातमी का दिलीस असं म्हणत मोहसिनखान यांच्यावर आज भररस्त्यात हल्ला केला.या हल्लयात मोहसिन खान यांच्या पायाला आणि डोक्यााला जबर मार लागला असून त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.हल्ला नेमका कोणी केला हे मात्र स्पष्ट झालेले नाही.
मोहसिनखान यांच्यावरील हल्ल्याच्या घटनेनंतर आज परभणी शहरातील पत्रकारांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्याना निवेदन देत आरोपींवर कारवाई कऱण्याची मागणी केली आहे.जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणी लक्ष घालण्याचे आश्वासन दिले आहे.परभणी जिल्हा पत्रकार संघाने या हल्ल्याचा निषेध केला आहे.पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीनेही या हल्ल्याचा धिक्कार केला आहे.फडणवीस सरकार राज्यात सत्तेवर आल्यानंतर पत्रकारांवर झालेला हा नववा हल्ला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here