पनवेल होतेय हागणदारीमुक्त 

0
801

मुंबईचे प्रवेशव्दार असलेले पनवेल शहर 15 ऑगस्टपर्यंत हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प नगरपालिकेने सोडला असल्याने त्याचे स्वागत होत आहे.पनवेल शहरातील वाढत्या झोपडपट्टीमुळे बकालपणा आणि अस्वच्छता निर्माण झाली होती,4 हजार 300 जणांकडे स्वतःचे शौचालय नव्हते आणि 2000 हजारांवर लोकांना उघडयावर बसावे लागत होते ही गोष्ट सर्वेक्षणात समोर आल्यानंतर नगरपालिकेने स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहरात स्वच्छता मोहिम आखली.त्यानुसार 696 वैयक्तिक शौचालय बांधून झाले.केंद्र आणि राज्य सरकारच्या अनुदानाबरोबरच पनवेल नगरपालिकेने प्रत्येकी 20 हजारांचे अनुदान दिल्याने मोठ्या प्रमाणात शौचालय बांधले गेले.पालिकेने लगोलग मलनिःसारणाचीही व्यवस्था केल्याने पनवेल शहराची आता हागणदारीमुक्तीकडे वाटचाल सुरू असल्याची माहिती मुख्याधिकारी मंगेश चितळे यांंनी दिली-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here