पनवेल महापालिकेस बहुसंख्य गावांचा पाठिंबा

0
925

बहुचर्चित पनवेल महापालिकेसाठी शनिवारी झालेल्या पहिल्याच जनसुनावणीत 68 गावांपैकी 80 टक्के गावांनी महापालिकेस पाठिंबा दिला असला तरी खारघर,तळोजा परिसरातील काही नागरिकांनी महापालिकेस विरोध दर्शविल्याने आता अंतिम निर्णय सरकार घेणार आहे.महापालिकेच्या संदर्भात जनतेच्या सूचना आणि हरकती समजून घेण्यासाठी विभागीय आयुक्त व्ही.राधा यांनी काल कोकण भवन येथे जनसुनावणी घेतली.त्यात लोकांनी आपली मंतं मांडली.महापालिकेच्या संदर्भात 3,970 हरकती आणि सूचना सरकारकडे उपलब्ध झाल्या होत्या.आता ‘एक समिती आलेल्या सूचना आणि हरकतीचा अभ्यास करून आपला अहवाल सरकारला सादर केरेल आणि त्यानंतर सरकार मनपाच्या संदर्भात अंतिम निर्णय घेईल असे स्पष्टीकऱण विभागीय आयुक्त व्ही.राधा यांनी दिले आहे.’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here