रायगड जिल्हयातील पहिल्याच पनवेल महापालिकेसाठी 24 मे रोजी होत असलेल्या निवडणुकीच्या रिंगणात 428 उमेदवारांपैकी तब्बल 160 उमेदवार करोडपती असल्याचे वास्तव समोर आले आहे.उर्वरित उमेदवारांची संपत्ती देखील काही लाखात असल्याचे दिसते.पनवेल मनपा मैदानात असलेल्या उमेदवारांमध्ये सर्वाधिक 95 कोटी 47 लाख रूपयांची स्थावर आणि जंगम मालमत्ता माजी खासदार रामशेठ ठाकूर यांचे चिरंजीव परेश ठाकूर यांच्याकडे असल्याचे त्यांनी सादर केलेल्या विवरणपत्रात दाखविली गेली आहे.अन्य उमेदवारांच्या संपत्तीचे आकडेही सामांन्यांना भोवळ आणणारे आहेत.पनवेल परिसरात भविष्यात मोठे प्रकल्प येऊ घातल्यानं ही श्रीमंत मनपा आपल्याच ताब्यात राहावी यासाठी परिसरातील धनाडय मंडळी जिवाचे रान करीत आहे.एकूण उमेदवारांपैकी 227 उमेदवार उद्योगपती आहेत.177 महिला उमदेवारांपैकी 114 महिला गृहिणी आहेत तर 78 जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीत 66 उमेदवार तिशीतले आहेत,तर 161 उमेदवार चाळीशीतले आहेत.–

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here