मुंबईः इंग्रजी दैनिकाच्या पत्रकारावर हल्ला करण्याच्या कटात सहभागी असलेल्या गँगस्टर रवी पुजारीच्या टोळीतील चौथ्या गुंडाला क्राइम ब्रँचने अटक केली आहे. अब्दुल करीम अब्दुल लतीफ शेख (३७) असे या गुंडाचे नाव असून त्याने या हल्लेखोरांना गाडी पुरविल्याचे स्पष्ट झाले आहे. पत्रकारावर हल्ला करण्याच्या तयारीत असलेल्या रवी पुजारीच्या तीन गुंडांना क्राइम ब्रँचच्या मालमत्ता विभागाने शनिवारी अटक केली होती. शेखला याआधीही मोक्का अंतर्गत अटक झाली होती.