संरक्षण कायद्याचं युनेस्कोत कौतूक

0
600
महाराष्ट्रतील तमाम पत्रकारांचे अभिनंदन केले पाहिजे.कारण पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या नेतृत्वाखाली सलग बारा वर्षे लढा देऊन राज्यातील पत्रकारानी महाराष्ट्र सरकारला जो पत्रकार संरक्षण कायदा करायला भाग पाडले त्या कायद्याची दखल थेट युनोस्कोनं घेतली असून भारतात केवळ महाराष्ट्रातच हा कायदा असल्याबद्दल कौतूक केले आहे.
 
नवी दिल्ली, २ : भारत देशात केवळ महाराष्ट्रातच ‘पत्रकार हल्ला विरोधी कायदा’ असून ही कौतुकास्पद बाब आहे, अशी प्रशंसा संयुक्त राष्ट्र संघाच्या शिक्षण, विज्ञान आणि सांस्कृतिक संघटनेच्या (युनेस्को) कार्यक्रमात करण्यात आली .
फ्रान्स मध्ये २ नोव्हेंबर २०१३ रोजी पत्रकारांवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पत्रकारांच्या स्मरनार्थ येथील एक सन्मित्र मार्गावरील युनेस्कोच्या सभागृहात आज पत्रकारांवरील अन्याय विरोधी आंतरराष्ट्रीय दिन साजरा करण्यात आला. दिवसभर चार सत्रांमध्ये चाललेल्या या कार्यक्रमात विविध मान्यवरांची भाषणे झाली. युनेस्कोच्या आय एफ जे प्रेस फ्रिडम रिपोर्टच्या (दक्षिण आशिया विभाग ) संपादक लक्ष्मी मूर्थी यांनी पत्रकारांवरील हल्ल्या विरोधात कारवाई करण्यासाठी केवळ महाराष्ट्रात कायदा असून राज्यशासनाचे हे कार्य कौतुकास्पद असल्याचे सांगितले.
मुर्थी यांनी महाराष्ट्राचे कौतुक करतानाचा जागतिक स्तरावरील पत्रकारांच्या सुरक्षिततेवर प्रकाश टाकतांना सांगितले, इतर देशांच्या तुलनेत पाकिस्तानच्या वायव्य सरहद्द भागात पत्रकारांच्या मोठया प्रमाणात हत्या होत असून ही चिंतेची बाब आहे.
युनेस्को माध्यम स्वातंत्र्य समितीच्या सदस्य आणि हुन्टच्या संपादक गीता सेशु यांनी यावेळी आपल्या संबोधनात सांगितले, ‘प्रसार माध्यमांचे मालक आणि पत्रकार यांच्यात संवाद प्रकिया वाढीस लागने गरजेचे आहे’.
यावेळी झालेल्या चर्चासत्रांमध्ये पत्रकार, वकील आणि अन्य सामाज माध्यमात कार्यरत मान्यवरांनी सहभाग भाग घेतला. महाराष्ट्र राज्याने पत्रकार हल्ला विरोधी कायद्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here