*पत्रकार मेळावा.. असाही*..
बॅ. ए. आर. अंतुले मुख्यमंत्री असताना राज्यातील छोट्या वृत्रपत्रांचे आणि पत्रकारांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी मुखयमंत्री अंतुले मुंबईत एका मेळावा बोलावला होता.. तेव्हा या मेळाव्याची चांगलीच चर्चा झाली होती.. त्यानंतर असा प्रयत्न झाला नाही..
नांदेड जिल्ह्यापुरता का होईन श्री. अशोकराव चव्हाण यांनी आज तसा प्रयत्न केला.. नांदेड जिल्हा पत्रकार संघाकडून जिल्हयातील पत्रकारांची यादी मागवून प्रत्येक पत्रकाराला व्यक्तीगत निमंत्रणं पाठविली गेली.. त्यानुसार ६५० पत्रकार आजच्या मेळाव्यास उपस्थित होते.. मी माझ्या भाषणात माधयांसमोरील प्रश्न मांडताना छोटी व मध्यम वृत्तपत्रे जगली पाहिजेत असे सरकारचे धोरण असावे असा आग्रह धरला.. पत्रकारांवर दाखल करण्यात येणारया खोट्या गुनहयाबाबत सरकारने कठोर भूमिका घ्यावी असे मत मांडले.. अधिस्वीकृती, पेन्शन, शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी आरोग्य योजना, मजेठिया अशा विविध प्रश्नावर चर्चा झाली.. पत्रकारांचे सर्व प्रश्न सुटावेत यासाठी तर आपण प्रयत्न करूच त्याचबरोबर पत्रकारांना निर्भयपणे काम करता येईल असे वातावरण निर्माण केले जाईल असेही अशोकरावांनी स्पष्ट केले… त्याच बरोबर नांदेडमध्ये सुसज्ज पत्रकार भवन उभारणयात येईल आणि त्याचं भूमीपूजन देखील लवकरच करण्यात येईल अशी घोषणा देखील त्यांनी केली..जिल्हयातील एक दीर्घकाळ प्रलंबित प्रश्न मेळाव्याच्या माध्यमातून मार्गी लागला..
पत्रकार आणि राजकारणी हे लोकशाहीचे महत्वाचे अंग आहेत.. या दोन्ही घटकांच्या भूमिका भलेही भिन्न असतील पण त्याच्यात परस्पर समन्वय राहिला तर जनसामान्यांचे अनेक प्रश्न मार्गी लागू शकतात.. त्यामुळे प्रत्येक जिल्हयातील पालकमंत्र्यांनी असा पुढाकार घेऊन जर पत्रकार मेळावे घेतले तर नक्कीच चांगले वातावरण निर्माण होईल. पत्रकारांच्या प़श्नांवर व्यापक चर्चा होईल.. राज्यात अशोकराव चव्हाण यांनी राज्यात सर्वप्रथम अशा प्रयत्न नांदेडमध्ये केला आणि त्याचं फारच छान पध्दतीनं स्वागत झालं
अशोकराव आभारी आहोत…
आमदार अमर राजूरकर यांनी स्वागतपर भाषण केलं.. संतोष पांडागळे यांनी सूत्रसंचालन केलं.. परिषदेचे विभागीय सचिव प्रकाश कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले.. माजी मंत्री डी. पी. सावंत पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रदीप नागापूरकर तसेच जिल्हयातील संपादक, पत्रकार मोठ्या संख्येनं उपस्थित होते..
(SM)
https://www.batmidar.in/पत्रकार-मेळावा-असाही/