इराकमध्ये झालेल्या अमेरिकी पत्रकाराच्या हत्या प्रकरणात एक नवी माहिती समोर आली आहे. इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांनी पत्रकार जेम्स फॉलीच्या सुटकेसाठी त्यांनी अमेरिकेकडी १० कोटी युरो म्हणजे तब्बल ८ अब्ज रुपये मागितले होते. अमेरिकेने त्यांची मागणी फेटाळून लावली आणि दिसऱ्या बाजूला त्या पत्रकाराला वाचवण्यासाठी एक विशेष मोहीम सुरू केली. मात्र ही मोहीम असफल राहिली.
फोटो पत्रकार जेम्स फॉली यांच्या मृत्यूनंतरही इराकमधील इस्लामिक स्टेटच्या (आयएस) विरोधातील मोहीम थांबवण्यात येणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. इतकेच नाही तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी संकेत दिले आहेत की, ही मोहीम केवळ सुरू ठेवण्यात येणार असे नाही तर लष्करी आणि गुप्तचर विभागाच्या कारवाया आता अधिक वाढवण्यात येतील.
अमेरिका आणि ब्रिटनचे लक्ष आता ‘जॉन- द एक्जिक्यूशनर’ वर आहे, ज्याने निर्घुणपणे फॉलीची हत्या केली. दहशतवाद्यांनी फॉलीच्या हत्ये मागे इस्लामिक स्टेट आणि मुस्लिमांवरील अमेरिकी हल्ले, अशी कारणे दिली होती. दहशतवाद्याच्या बोलीभाषेवरून ती व्यक्ती ब्रिटिश असल्याची शक्यता आहे. तो लंडनच्या ‘ईस्ट एन्ड’चा रहिवासी असण्यातची शक्यताही वर्तवण्यात आहे. (मटावरून साभार )