उत्तम वक्ता,उमद्या मनाचा कवी,साहित्यिक आणि राजकारणी म्हणून  ओळखल्या जाणार्‍या अटल बिहारी वाजपेयी यांनी आपल्या करिअरची सुरूवात  पत्रकार म्हणून केली होती.पांचजन्य,स्वदेश,वीर,अर्जुन,राष्ट्रधर्म,या दैनिकात त्यांनी पत्रकार म्हणून काम केले होते.1953 मध्ये डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या समवेत वार्ताहर म्हणून ते श्रीनगरला गेले होते.श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा जम्मू-काश्मीर प्रवेशासाठीच्या परमीट सिस्टमला विरोध होता.त्यामुळं परमीट न घेताच ते काश्मीरमध्ये गेले होते.नंतर त्यांना अटक झाली.त्यांना नजरकैदेत ठेवलं गेलं.त्यानंतर थोडयाच काळात त्याचं निधन झालं.या घटनेचा मोठा धक्का पत्रकार अटलजींना बसला.ते या संदर्भात एका मुलाखतीत म्हणतात,’श्यामाप्रसाद मुखर्जी याचं कार्य पुढं नेलं पाहिजे असं मला वाटत’..त्यानंतर ते राजकारणात आले आणि 1957 मध्ये ते प्रथम बलरामपूर मतदार संघातून खासदार म्हणून निवडून आले.त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलंच नाही.पत्रकार ते पंतप्रधान ही अटलजींची जीवन यात्रा मोठीच रोमहर्षक राहिली आहे.आज अटलजी आपल्यामध्ये नाहीत.मात्र पत्रकार,साहित्यिक,कवी,वक्ता आणि राजकारणी म्हणून त्यानी देशात बजावलेली अजोड भूमिका कायम आपल्या स्मरणात राहिल.मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने पत्रकार अटल बिहारी वाजपेयी यांना विनम्र श्रध्दांजली.–

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here