ज्येष्ठ पत्रकार डॉ.रविंद्र रसाळ यांचे निधन
प्रतिनिधी
परभणी, दि.8 डिसेंबर
शहरातील दैनिक गोदातीर समाचारचे संपादक तथ्लृा ज्येष्ठ पत्रकार डॉ. रविंद्र देवीदासराव रसाळ यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने रविवार, 8 रोजी दु.2 वा. खाजगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या पार्थ्लिृवावर सोमवार, 9 डिसेंबर रोजी सकाळी 10 वा.परभणी येथ्लृील वैकुंठधाम स्मशानभूमित अत्यंसंस्कार करण्यात येणार आहे.
रविंद्र रसाळ यांचा जन्म 22 नोव्हेबर 1945 रोजी झाला होता. दै.गोदातीर समाचारचे 1972 ते 1981 या कालावधीत कार्यकारी संपादक म्हणून त्यांनी काम पाहीले, मराठी (ग्रामीण) पत्रकारितेतील डॉक्टरेक्ट मिळवणारे ते पहिले संपादक होते. एमएससी पदार्थ्लृ शास्त्र पदवी त्यांनी संपादन केली होती. बी.जे. प्रथ्लृम श्रेणीत उत्तीण केले होते. महाराष्ट्र शासनाचे जाहीरात विषयक धोरण याबद्दल जिचकर समितीसमोर त्यांनी निवेदन सादर केले होते. अधिस्वीकृती समितीचे सदस्य म्हणून त्यांनी काम पाहीले होते. त्यांच्या वयाला 75 वर्षे पूर्ण झाल्यामुळे येत्या 29 डिसेंबर रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्या कार्यक्रमाची तयारी सुरु असतांनाच त्यांचे निधन झाल्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी हेमा रसाळ, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here