पत्रकार जेविएर वाल्डेझ यांची मेक्सिकोमध्ये हत्या

0
1332

अमली पदार्थाची तस्करी आणि संघटित गुन्हेगारी याबाबतचे वृत्तांकन करण्यात हातखंडा असलेले ज्येष्ठ पत्रकार जेविएर वाल्डेझ यांची मेक्सिकोतील सिनाओला येथे हत्या करण्यात आली आहे.

गेल्या दोन महिन्यांत हत्या करण्यात आलेले वाल्डेझ हे सहावे आणि रेजिना मार्टिनेझ पेरेझ यांच्यानंतर हत्या करण्यात आलेले दुसरे मोठे पत्रकार आहेत.सिनाओलाची राजधानी क्युलिअ‍ॅकन येथे सोमवारी दुपारी वाल्डेझ यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. वाल्डेझ हे सहसंस्थापक असलेल्या रिओडॉस या प्रकाशनाच्या कार्यालयाजवळच ही हत्या करण्यात आली, असे सिनाओलातील सरकारी अधिकाऱ्याने सांगितले.रिओडॉसने वाल्डेझ यांची हत्या करण्यात आल्याच्या वृत्ताला आपल्या संकेतस्थळावरून दुजोरा दिला आहे. कार्यालयापासून काही अंतरावरच बंदूकधाऱ्यांनी त्यांना अडविले. ला जॉर्नाडा या राष्ट्रीय वृत्तपत्राचे ते प्रतिनिधी होते त्यांना गाडीतून बाहेर खेचून त्यांच्यावर गोळ्यांचा वर्षांव करण्यात आल्याचे वृत्तपत्राने म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here