पत्रकार किशोर मेश्राम यांच्यावर प्राणघातक हल्ला

देसाईगंज तालुक्यातील कुरुड येथील घटना

गडचिरोली : दै. देशोन्नतीचे देसाईगंज तालुका प्रतिनिधी किशोर मेश्राम यांच्यावर ८ जुलै रोजी रात्री ९ वाजताच्या दरम्यान दोन अज्ञात हल्लेखोरांनी देसाईगंजनजिकच्या कुरुड फाट्यावर अंधाराचा फायदा घेऊन जीवघेणा हल्ला केल्याने जिल्ह्यातील पत्रकारांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. 
देसाईगंजवरुन वृत्त संकलन करुन किशोर मेश्राम हे आपल्या स्वगावी कुरुड येथे दुचाकीने जात होते. दरम्यान देसाईगंजपासून दोन अज्ञात इसम मेश्राम यांचा पाठलाग करीत होते. कुरुड फाट्यावर या हल्लेखोरांनी मेश्राम यांची दुचाकी अडवून त्यांच्या दोन्ही पायावर रॉडने हल्ला केला. यामध्ये मेश्राम यांच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली असून त्यांना तत्काळ देसाईगंज येथील रुग्णालयामध्ये हलविण्यात आले.
घटनास्थळावर प्रभारी पोलिस अधिकारी अतुल तवाडे यांनी भेट दिली असून पुढील तपास देसाईगंज पोलिस करीत आहेत.

यापूर्वीदेखील कोरची येथील पत्रकार राष्ट्रपाल नखाते यांच्यावर २७ एप्रिल २०१७ रोजी प्राणघातक हल्ला झाला होता. त्यावेळी पोलिसांनी नविन पत्रकार संरक्षण कायदा कलम ४ अन्वये संबंधिताविरुध्द गुन्हा दाखल केला होता. मात्र चौकशी करण्याच्या नावाखाली पोलिसांनी अद्यापही हल्लेखोरांना अटक केली नाही. याबाबत वारंवार पाठपुरावा करुनदेखील पोलिसांनी पत्रकारांवरील हल्ल्याबाबत गंभीर दखल घेतली नाही. त्यामुळे पोलिसांसाठी पत्रकार संरक्षण कायदा हा केवळ कागदावरच आहे काय, असा प्रश्न जिल्ह्यातील पत्रकारांकडून उपस्थित केला जात आह

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here