रायपूर :निवडणुका आल्यात आता पत्रकारांना बुरे दिन येणार आहेत, याची झलक दाखविणारी घटना छत्तीसगडमधील रायपूर मध्ये घडली.. भाजपच्या पक्ष कायाॅलयातच सुमन पांडे नावाच्या पत्रकारास बेदम मारहाण करण्यात आली.. या प्रकरणी पत्रकाराच्या तक्रारीनंतर भाजपच्या चार स्थानिक नेत्यांना पोलिसांनी अटक केलीय.. या नेत्याचे निलंबन करावे म्हणून काल रात्रभर पत्रकारांनी पाटीॅ कायाॅलयावर धरणे धरली पण त्याचा काही उपयोग झाला नाही.. त्यामुळे पत्रकार आता प्रेस क्लब मध्ये आंदोलन करीत आहेत..
छत्तीसगडमधये भाजपचा पराभव झाला. त्याची कारणमीमांसा करण्यासाठी जिल्हास्तरीय बैठकीचं आयोजन करण्यात आल, होतं.. एका वेबसाईटचे पत्रकार सुमन पांडे वाताॅंकन करण्यासाठी तेथे उपस्थित होते.. बैठक सुरू असतानाच काही कायॅकतेॅ परस्परांना भिडले.. हे दृश्य सुमन पांडे यांनी आपल्या कॅमेरयात कैद केले.. भाजपचे जिल्हाध्यक्ष राजीव अग्रवाल यांच्या ही गोष्ट लक्षात आल्यानंतर त्यांनी फोटो आणि भांडणं डिलीट करण्याचं फमाॅन पांडे यांना सोडलं.. त्यास पांडे यांनी नकार दिल्यानं राजीव अग्रवाल यांनी पत्रकारास मारहाण करण्यास सुरुवात केली.. नंतर काही कायॅकतेॅ धावले आणि त्यांनी पांडे यांचयाकडचा मोबाईल काढून घेतला आणि त्यातील व्हिडिओ डिलीट केला. त्यानंतर जवळपास वीस मिनिटे पांडे यांना त्याच रूममध्ये कोंडून ठेवले गेले..
नंतर पांडे आणि अन्य पत्रकारांनी भाजप कायाॅलयात 
ठिय्या आंदोलन सुरू केले.. पोलिसात तक्रार दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी राजीव अग्रवाल, विजय व्यास, उत्कर्ष त्रिवेदी, आणि दिना डोंगरे यांना अटक केली आहे. पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीने या हल्लयाचा निषेध केला असून हललेखोरांवर भाजपने तातडीने कारवाई करावी अशी मागणी केली आहे

LEAVE A REPLY