पत्रकारावर कोयत्याने हल्ला

सातारा : सातारा जिलहयातील
शिरवळ येथील लोकमत चे पत्रकार मुराद पटेल यांच्यावर काल रात्री उशिरा 6 अज्ञात व्यक्तींनी कोयत्याने हल्ला केला त्यात ते गंभीर जखमी झाले आहेत. ,मुराद याना तातडीने उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे ,या संदर्भात रात्री उशिरा सातारा जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिष पाटणे यांनी सातारा जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली..त्यांनी घटनेच्या चौकशीचे आदेश त्यांनी दिले असून हल्लेखोरांना तातडीने अटक करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीने या हल्लयाचा तीव़ शब्दात धिक्कार केला आहे..

LEAVE A REPLY