पत्रकारांसाठी महत्वाच्या सूचना

0
1071
विधिमंडळाचे कामकाज पाहण्यासाठी
येणार्‍या पत्रकारांसाठी महत्वाच्या सूचना
 
मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने आयोजित विधिमंडळ कामकाज अभ्यास वर्गासाठी राज्यातील ज्या पत्रकारांनी नाव नोंदणी केली आहे त्यांना सूचित करण्यात येत आहे की,त्यांनी सोबत येताना आपण ज्या वर्तमानपत्राचे प्रतिनिधीत्व करीत आहात त्या दैनिकाचे ओळखपत्र आणावे तसेच स्वतःचा एक फोटो सोबत ठेवावा.सर्व सदस्यांनी सकाळी 9 वाजता मंत्रालयासमोरील विधान भवनाच्या गेटसमोर जमायचे आहे.तेथून सर्व पत्रकारांना एकत्र आत जाता येईल.शिबिरार्थींना सकाळी दोन्ही सभागृहाचे कामकाज दाखविले जाईल त्यानंतर सभागृहाचे कामकाज तसेच पत्रकारांसाठी आवश्यक असलेल्या अन्य बाबींवर मान्यवर वक्त्यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.दुपारच्या भोजणाची व्यवस्था वि.स.पागे अध्यासनातर्फे केली जाणार आहे.केवळ पन्नास पत्रकारांसाठीच हा अभ्यासवर्ग आहे.पासेससाठी उद्या सर्व नावे विधान भवन अधिकार्‍यांकडे पाठविली जाणार आहेत .त्यामुळं आमच्या जिल्हयातूल पाच पत्रकार येतील वगैरे मोघम आकडे सांगितलेल्या जिल्हा अध्यक्षांनी आपल्या सदस्यांची नावे उशिरात उशिरा आज सायंकाळी 6 वाजेपर्यंत कळवावीत.त्यानंतर आलेल्या नावांचा विचार करता येणार नाही.
कोणत्याही परिस्थितीत ऐनवेळी आलेल्या पत्रकारांना प्रवेश देता येणार नाही.ऐनवेळी कोणी आले आणि त्यांना प्रवेश मिळाला नाही तर त्याची जबाबदारी परिषदेवर असणार नाही किंवा त्यासंबंधीची कोणतीही तक्रार ऐकून घेतली जाणार नाही याची नोंद घ्यावी.
ग्रामीण भागातील पत्रकारंसाठी महत्वाच्या तसेच आवश्यक अशा या उपक्रमात सहभागी होत असलेल्या सर्व पत्रकार मित्रांचे मनःपूर्वक स्वागत.सर्वांकडून सहकार्य मिळेल ही अपेक्षा-
एस.एम.देशमुख,किरण नाईक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here