पत्रकारांसाठी खरंच वेगळ्या संरक्षण कायद्याची गरजंय?

0
764

महाराष्ट्रातील पत्रकारांवर सातत्यानं हल्ले होत आहेत.साधारणतः दर पाच दिवसाला एका पत्रकारावर राज्यात कोठे ना कोठे हल्ला होत असतो. संतापाची गोष्ट अशी की,ज्या पत्रकारांवर हल्ले झाले आहेत त्या हल्ल्यातील एकाही आरोपीला आतापर्यत शिक्षा झालेली नाही.पत्रकारांवरील हल्ला हा जामिनपात्र गुन्हा असल्यानं हल्लेखोर हल्ले करूनही मोकाट सुटतात.हल्लेखोरांवर जरब बसावी आणि पत्रकारांना निर्भय़पणे आपले काम करता यावे यासाठी पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्यावतीनं पत्रकार संरक्षण कायद्याची मागणी केली जात आहे.त्यासाठी लढा सुरू आहे.दुसरा एक गट असा आहे की,त्यांना पत्रकारासाठी वेगळा कायदा करण्याची गरज नाही असं वाटतं,अशा स्थितीत या बाबीवर दोन्ही बाजुंनी सांगोपांग चर्चा होणं गरजेच आहे.त्यामुळंच मराठी पत्रकार परिषदेच्या 6 आणि 7 जून रोजी पिंपरी-चिचवड येथे होणाऱ्या अधिवेशनात पत्रकार संरक्षण कायद्याची खरोखरच गरज आहे काय? या विषयावर परिसंवादाचे आयोजन कऱण्यात आलं आहे.त्यात अनेक मान्यवर सहभागी होत आहेत.ते असे – ऍड.उज्जवल निकम,ज्येष्ठ पत्रकार भरतकुमार राऊत,ज्येष्ठ पत्रकार अनंत दीक्षित,टाइम्स ऑफ इंडियेचे ज्येष्ठ प्रफुल्ल मारपकवार,दिल्ली येथील ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे , एनडीटीव्हीचे प्रकाश काथे,विजय भोसले आणि या कायद्यासाठी गेली आठ वर्षे लढा देणारे एस.एम.देशमुख
स्थळ- अंकुशराव लांडगे सभागृह भोसरी.वेळ 6 जून सायंकाळी 4 ते 6
आपली संस्था—मराठी पत्रकार परिषद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here