शेतकरी, शेतमजूर, रोजंदारी कामगार, ज्यांचे हातावर पोट आहे असे घटक, गरीब महिला अशा काही समाज घटकांसाठी भारत सरकारने 1.70 लाख कोटींच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली आहे. . कोरोनामुळे अडचणीत आलेल्या सामान्यांना मदत करण्यासाठी काही उद्योगपती देखील पुढे आले आहेत, राष्ट्रवादीच्या आमदार खासदारांनी एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्याचे जाहीर केलेले आहे..विविध पातळ्यांवर सुरू असलेले हे सारे प्रयत्न स्वागतार्ह आणि सामान्यनादे कोरोना विरोधात लढण्याची हिंमत देणारे आहेत.. देश सध्या ज्या संकटातून जात आहे ते पहाता सर्वांनी एकत्र येऊन कोरोनाच्या संकटाशी मुकाबला करण्याची गरज आहे.. ही वेळ आपण देशाला काही देण्याची आहे.. देशाकडे काही मागण्याची ही वेळ नाही असे माझे स्पष्ट मत असल्याने “पत्रकारांसाठी आर्थिक पॅकेज” देण्याची जी मागणी पुढे येत आहे त्याला माझा स्पष्ट आणि सक्त विरोध आहे.. आज दिवसभरात मला किमान पाच सहा मालकांचे, पत्रकारांचे फोन आले..मेसेज ही आले.. तश्या काही पोस्ट देखील व्हायरल झालेल्या आहेत.. सरकार विविध वंचित घटकांसाठी आर्थिक पॅकेज देत आहे तर आपणही आपल्यासाठी तशी मागणी करावी अशा सूचना हे सारे मित्र करीत होते.. सूर “हात धुवून” घ्यावेत असाच होता.. मला वाटतं अशी मागणी करणंच अत्यंत चुकीचं आणि संधीसाधूपणाचं आहे.. बहुसंख्य पत्रकार आर्थिकदृष्ट्या सक्षम नाहीत हे मान्य पण आठ दिवस संचारबंदी लागू झाली म्हणून चूल पेटणार नाही एवढीही काही वाईट स्थिती पत्रकारांची किंवा मालकांची नाही. .. असा एकही पत्रकार महाराष्ट्रात नाही याची मला खात्री आहे.. त्यामुळे सरकार मागास घटकांसाठी काही करतंय म्हणून आपणही हात धुवून घ्यावेत असा हावरटपणा मला मान्य नाही..
पत्रकारांसाठी पेन्शन, पत्रकार आरोग्य योजना आणि इतर तत्सम मागण्या मंजूर करून घेण्यासाठी मी हयात भर लढलो.. त्या मागण्या योग्यही होत्या.. पुढील काळात देखील पत्रकारांच्या न्याय्य मागण्यासाठी मी सततेबरोबर चार हात करीत राहणार आहेच पण वेळ काळाचं भान न ठेवता आपण केवळ मागणयाच करीत राहायचं याला काही अर्थ नाही..
एक गोष्ट खरी की, जे पत्रकार फिल्डवर जाऊन कोरोनाच्या बातम्या कव्हर करीत आहेत त्यांचा किमान पुढील तीन महिन्यांसाठी विमा उतरविला गेला पाहिजे.. आजच्या घडीला हा बोजा देखील सरकारवर टाकणेेयोोग्य नाह .. त्रकारांचा हा विमा संबंधित वृत्तपत्राने, चॅनलने उतरविला पाहिजे
. त्यासाठी आपण सारे मिळून मालकांवर दबाव जरूर आणू यात.. ही माझी वैयक्तिक भूमिका आहे..केवळ काही पत्रकारांना खूष करण्यासाठी मी माझ्या सदसद्विवेकबुधदीला न पटणारया मागण्या करणार नाही.. ज्यांना असे वाटते की, पत्रकारांना आर्थिक पॅकेज मिळाले पाहिजे अशा मित्रांनी त्यासाठी पाठपुरावा करावा, पॅकेज मिळवावे माझं काहीच म्हणणं नाही.. मात्र या सर्वांपासून मी अलिप्त असेल..
राज्यात आज रक्ताचा तुटवडा आहे.. तेव्हा पत्रकार संघांनी पुढाकार घेउन रकदान शिबिरांचं आयोजन करावं असं आवाहन काल मी केलं होतं.. पत्रकारांसाठी आर्थिक पॅकेजची सूचना करणारे माझ्या रक्तदानाच्यआवाहनावर काहीच बोलत नाहीत याचं दुःख आणि आश्चर्य वाटतं.. असो
कोणतीही मागणी करताना वेळ काळाचं भान आपण ठेवलंच पाहिजे.. कारण आपण पत्रकार आहोत..आणि म्हणूनच समाजाचं आपण काही देणं लागतो याचं भान देखील आपल्ययाला ठेवावं लागेल

एस. एम.

LEAVE A REPLY