पत्रकारांसाठी आता व्हॉल्वो प्रवासही मोफत

0
1063

हरियाणा राज्यातील अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना राज्य मार्ग परिवहण विभागाच्या व्हॉल्वोमधून मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.हरियाणाचे परिवहन मंत्री राम विलास शर्मा यांनी बुधवारी विधानसभेत ही घोषणा केली.शर्मा म्हणाले की,पत्रकारांना बातमीसाठी अनेक ठिकाणी जावे लागते त्यांचा आरामदायक प्रवास करता यावा म्हणून ही सुविधा देण्यात आली आहे.
शेजारच्या पंजाब आणि हिमाचलमध्ये पत्रकारांना ही सुविधा यापुर्वीच दिली गेलेली आहे.मात्र हरिय़ाणात आतापर्यत केवळ साध्या बसेस पुरतीच ही सुविधा सीमित होती.
प्रश्न महाराष्ट्राचा.महाराष्ट्रात व्हॉल्वो सेवा अगोदरच तोट्यात आहे.त्यामुळे मुंबई-पुणे मार्गावरील व्हॉल्वो देखील बंद कऱण्याची घोषणा दिवाकर रावते यांनी केलेली आहे.अशा स्थितीत आपले सरकार असा काही निर्णय़ घेईल अशी अपेक्षा कऱणे व्यर्थच.महाराष्ट्रात राज्य सरकारने पत्रकारांच्या सर्वच प्रश्नांची कमालीची उपेक्षा चालविली आहे.पत्रकारांचे कोणतेच प्रश्न सोडवायचे नाहीत हे अगोदरच्या सरकारचे धोरण फडणवीस सरकारनेही कायम ठेवले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here