2015 मधील हल्ले (७७)

 

जालना दिनांक 2 जानेवारी 2015

जालना येथील दैनिक गोकुळवार्ताचे संपादक अर्पण गोयल यांच्यावर जानेवारीत हल्ला.बातमी दिल्याच्या रागातून हा हल्ला झाला.तक्रार देऊनही कारवाई झालेली नाही.

६ फेब्रुवारी २०१५- जिंतूर 

महाराष्ट्रात पत्रकारांवर होणाऱ्या हल्ल्लयाच्या घटना नव्या वर्षात देखील थांबायचं नाव घेत नाहीत.जानेवारीत सात पत्रकारांवर हल्ले झाल्यानंतर फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवडयात परभणी जिल्हयातील जिंतूर तालुक्यातील बामणी येथील पत्रकार राजू देशमुख यांच्यासह त्यांच्या पत्नीवर गावगुंडांनी हल्ला चढविला.एका सत्कार समारंभात झालेल्या तुंबळ भांडणाचे नावासह वार्तांकन केल्याच्या रागातून हा हल्ला झाला आहे.शुक्रवारी रात्री काही गावगुंड आठच्या सुमारास राजू देशमुख यांच्या घरात घुसले आणि त्यांनी त्यांच्या पत्नीसहा राजू देशमुख यांच्यावर हल्ला केला.केवळ बातमी दिल्याच्या रागातून हा हल्ला झाला आहे.

————————————————————————————————————

10 फेब्रुवारी २०१५-कळंब

उस्मानाबाद जिल्हयातील कळंब येथील देशभक्त साप्ताहिकाचे संपादकलक्ष्मण दग़डू शिंदे यांच्यावर आज कळंब मध्येच हल्ला करण्यात आला.त्यांनी कळंब पोलिसात तक्रार दाखल केली आहे.शिंदे यांना मुका मार लागला आहे.मात्र पत्रकाराने तक्रार दाखल केल्याचे समजताच आरोपीनेही मारहाण आणि मौल्यवान ऐवज लंपास केल्याची खोटी तक्रार पोलिसात दिली आहे.पत्रकारांवर अशा खोट्या तक्रारी दाखल क़रून त्याचा आवाज बंद कऱण्याचा आणि त्यांना बदनाम करण्याच्या घटना राज्यात सातत्ताने घडत आहेत.

————————————————————————————————————

11 फेब्रुवारी २०१५-घाटकोपर

घाटकोपर महापालिकेच्या मुक्ताबाई हॉस्पिटल मधे पेशंटला सुविधा मिळत नाहीत ज्या आहेत त्या अपुर्या आहेत.याची माहिती घेण्यासाथी झी 24 तास चे प्रतिनिधि प्रशांत अंकुशराव आणि सकाळ या वृत्तपत्राचे प्रतिनिधि प्रशांत बढे हे गेले असता स्थानिक नगरसेवक दीपक हांडे हे आपल्या कार्यकरत्यासह हॉस्पिटल मधे येवून दोनही प्रतिनिधिना शिविगाळ केलि आणि पाहुन घेवू अशी धमकी दिली.हॉस्पिटल मधे सुविधा उपलब्ध करूँन देण्यास स्थानिक नगरसेवक कमी पडत आहे आपले बिंग फुटू नए म्हणूनच केला कांगवा.

————————————————————————————————————

16 फेब्रुवारी 2015 – माहूर 

पत्रकारांचे आवाज बंद करण्याचा एक सोपा मार्ग महाराष्ट्रात सध्या सर्रास वापरला जात आहे.पुण्य नगरीचे माहूर येथील प्रतिनिधी सरफराज कादर दोसानी यांच्या बाबतीतही हेच घडलेले आहे.एका गॅस एजन्सीकडू अवैध सिलेंडर विक्री होत असल्याची तक्रार मनसेने दिली.त्याबाबतची बातमी 1 फेब्रुवारीच्या पुण्यनगरीत प्रसिध्द झाली.त्यामुळे चिडलेल्या गॅस एजन्सीच्या चालकाने दोसानी यांच्या विरोधात 6 फेब्रुवारी रोजी खंडणी आणि जिवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार पोलिसात दिली आहे

———————————————————————————————————

18 फेब्रुवारी 2015 -माणगाव जिल्हा रायगड  

माणगाव येथील पत्रकार नितीन देशमुख यांचे अपहरण कऱण्यात आले आहे.त्यांच्याकडील मोबाईलचा ट्रेस घेतला तेव्हा ते गुजरातमध्ये असल्याचे दिसून आले आहे.या बाबतची तक्रार त्यांच्या पत्नीने माणगाव पोलिसात दिली आहे.रायगड प्रेस क्लबने माणगाव येथे जाऊन पोलिसाची भेट घेतली

———————————————————————————————————-       20 फेब्रुवारी 2015 – अहमदनगर 

अहमदनगर येथील सकाळचे निवासी संपादक श्री.बाळ बोठे यांना रस्त्यावर अडवून काही समाजकंटकांनी अर्वाच्य शिविगाळ आणि जिवे मारण्याची धमकी दिली आहे.त्यांनी याबाबतची रितसर तक्रार पोलिसात दाखल केली आहे.सकाळच्या नगर आवृत्तीत गेली पंधरा दिवस तालुकानिहावय जिल्हयात सुरू असलेल्या अवैध धंध्याच्या विरोधात लेखमाला प्रसिध्द होत आहे.त्यामुळे काही लोकांचे आर्थिक हितसंबंध दुखावले गेले.त्यांनीच बोठे यांना धमकी दिली आहे.काल रात्री आपले काम आटोपून बोठे घरी जात असताना त्याना काही लोकांनी अडवून तुम्ही सुरू केलेली लेखमाला बंद करा अन्यथा त्याचे वाईट परिणाम होतील अशी धमकी दिली.जिल्हा पोलिस अधिक्षक तसेच डीवायएसपी हे चांगले अधिकारी असून त्यांच्याविरोधात छापून आलेले अवाक्षरही आम्ही खपवून घेणार नाही असेही हे गुंड बोठेंना सांगत होते.आज बाळ बोठे यांनी पोलिसात तक्रार दाखल केली   आहे.

————————————————————————————————————

23 फेब्रुवारी 2015 –  माणगाव रायगड

रायगड जिल्हयातील माणगाव येथील पत्रकार  कमलाकर होवाळ यांना आज भाल येथे काही गुंडांनी मारहाण केली.मुंबई-दिल्ली औद्योगिक कॅरिडोरसाठी 21 गावातील जमिन संपादन कऱण्यात येत आहे.ज्या जमिनी अगोदरच दलालानी घेऊन ठेवल्या आहेत त्या दलालांचा प्रकल्पाला पाठिंबा असला तरी जे मूळ शेतकरी आहेत ते मात्र आपल्या जमिनी प्रकल्पाला देण्यासाठी तयार नाहीत.कमलाकर होवाळ असतील किंवा रायगडमधील बहुसंख्य पत्रकारांनी नेहमीच स्थानिक शेतकऱ्यांच्याच हिताची भूमिका घेतली आहे.हे या दलालांना माहिती आहे.आज भाल आणि परिसरात जमिनी मोजण्याचे काम सुरू होते.तेथे होवाळ वृत्तसंकलनासाठी गेले असता तेथे अचानक दोन-तीनजण आले आणि त्यांनी “याला येथून हाकला” म्हणत लाथा-बुक्क्यांनी मारहाण करायला सुरूवात केली.त्यांना बेदम मुकामार लागला आहे.

————————————————————————————————————————-

 25 फेब्रुवारी 2015 –  मगळवेढा 

मगळवेढा तालुक्यातील रड्डे गावचे पत्रकार दत्ता काबळे यांना अवैद्य दारू धद्याची बातमी छापली म्हणून दारू विक्रेत्याकडून मारहाण.तक्रार दाखल

————————————————————————————————————————–

26 फेब्रुवारी 2015 – सातारा

समाधान काळसकर यांच्यावर हल्ला.हल्लेखोऱ मोहन ना.निंबाळकर. तक्रार दाखल 

————————————————————————————————————————–

27 फेब्रुवारी 2015 – मिरज

मिरज येथील केबलचे रिपोर्टर संजय देसाई यांच्यावर हल्ला.महानगरपालिका आवारात गोळीबार केला गेला.त्यात ते जखमी.व्यावसायिक वादातून हा हल्ला झाल्याचे पोलिसांचे म्

——————————————————————-

6 मार्च 2015,सोनपेठ ( परभणी) 

परभणी जिल्हयातील सोनपेठ येथील पत्रकार हनुमान आवाड यांच्यावर 6 मार्च रोजी मटका बुकी चालकाच्या मुलगा सचिन घोडके याने आपल्या साथीदारांसह हल्ला केला.त्यांच्या खिश्यातले एक हजार रूपये देखील काढून घेतले.पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतल्याने सोनपेठच्या पत्रकारांनी तहसिलदारांची भेट घेतली

——————————————————————————————————————————–

12  मार्च 2015, जालना     

जालना येथील टीव्ही-9चे प्रतिनिधी गणेश जाधव यांच्यावर आज वालूमाफियांनी जीवघेणा हल्ला केला.जिल्हयातील तीर्थपुरूजवळ ही घटना घडली.तीर्थपुरी येथे बेकायदेशीर रेती उत्खनन होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर छावा संघटनेच्या काही पदाधिकाऱ्यांबरोबर गणेश जाधव तीर्थपुरीला गेले.उत्खननाची बातमी कव्हर करीत असताना ही पत्रकारावर हल्ला केला गेला.नव्या वर्षात पत्रकारावर झालेला हा 21 वा हल्ला आहे.

————————————————————————————————————————–


 23 मार्च 2015  नाशिक

नाशिक येथील एका स्थानिक वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधी वसिम शेख यांच्यावर  तीन नामचिन गुंडांनी हल्ला केला.23 तारखेला काही पत्रकारांसह वसिम शेख भद्रकाली पोलिसात बातमी घेण्यासाठी गेले असता मुस्ताक कोकणी,यासिन कोकणी,मोहम्मद कोकणी या गुडांनी त्याच्यावर हल्ला केला.तलवारीची मुठ त्यांच्या डोक्यावर लागली आहे.इतर पत्रकारांनी हल्लेखोरांना आवरले.एकास पोलिसांनी अटक केली आङे.

—————————————————————————————————————————

एप्रिल 2015 अकोला

अकोला जिल्हयातील बोरगाव मंजू येथील देशोन्नतीचे पत्रकार देवानंद मोहोड यांच्यावर नुकताच प्राणघातक  हल्ला केला गेला.आरोपीनं त्यांच्या पोटात चाकू भोसकून त्यांना गंभीर जखमी केले.बातमीच्या कारणावरून हा हल्ले ा झाल्याचे सांगण्यात येतंय.या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आलीय.८ एप्रिल रोजी ही घटना घडली

————————————————————————————————————————–


करमळा ( सोलापूर )18 एप्रिल 2015 

पंढरपूर येथील दूरदर्शनचे पत्रकार अभिराज उबाळे हे करमळा येथे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंढे यांच्या कार्यक्रमाची बातमी संकलीत कऱण्यासाठी गेले असता त्यांना पोलिसांनी धक्का बुक्की केली.याची तक्रार पत्रकारांनी ग्रामीण पोलीस अधीक्षक दत्तात्रय मंडलिक यांच्याकडं केल्यानंतर त्या पोलिसाना निलंबित कऱण्यात आलं.

————————————————————————————————————————–

 20 एप्रिल 2015     नंदूरबार  

पोलिसांच्या विरोधात बातमी छापल्याबद्दल तापीकाठ दैनिकाचे संपादक आणि मराठी पत्रकार परिषदेचे कार्याध्यक्ष चंद्रशेखऱ बेहेरे यांना पोलिसांनी अटक केली.त्यांच्या विरोधात 153खाली गुन्हा दाखल केला.

—————————————————————————————————————————

Mumbai  30 एप्रिल 2015

एबीपी माझाच्या प्रतिनिधी रश्मी पुराणिक यांच्या बाबतीत आज घडलेली घटना जेवढी संतापजनक तेवढीच निषेधार्ह आह,पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती तसेच मराठी पत्रकार परिषद या घटनेचा स्पष्ट शब्दात निषेध करीत आहे.

सरकारनं गोवंश बंदीचा कायदा केल्यानं स्वामी नारायण मंदिरात मुख्यमंत्री देवेद्रं फडणवीस यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित कऱण्यात आला होता.या कार्यक्रमसाठी पहिल्या तीन रांगा पत्रकारांसाठी राखीव ठेवण्यात आल्या होत्या.त्यानुसार पहिल्या रांगेत एबीपी माझाच्या प्रतिनिधी रश्मी पुराणिक बसल्या होत्या.मात्र त्या पत्रकार असल्या तरी महिला असल्यानं त्यांना पहिल्या रांगेत बसता येणार नाही असं आयोजकांच्यावतीनं त्यांना सांगण्यात आलं.महिलाच्या बाबतीतली ही भावना चीड आणणारी आणि निषेधार्ह आहे.

————————————————————————————————————

नांदेड 

विरोधात बातम्या छापल्यामुळे नांदडे नगरपालिकेचे आयुक्त सुशील खोरवेकर यांनी प्रजावाणीच्या जाहिराती बंद केल्या.तसे पत्रच प्रजावाणीला पाठविले आहे.

————————————————————————————————————

1 मे 2015 पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड येथील आय़बीएन लोकमतचे वार्ताहर गोविंद काकडे यांनी बाटली बंद पाण्याचे काळे सत्य उघडकीस आणणारी बातमी दिल्याबद्दल मिनरल ड्रिकींक वॉटर प्लांट चालविणाऱ्या मालकाने त्याना जिवे मारण्याची धमकी दिली.याची तक्रार पिंपरी पोलिसात दाखल कऱण्यात आली आहे.

————————————————————————————————————

बारामती 5 मे 2015

टंचाई निवारण बैठकीतून अजित पवार यांनी पत्रकारांना बाहेर हाकलले.बारामतीतील पत्रकारांकडून पवारांचा निषेध

———————————————————————————————————–

कळंब( उस्मानाबाद) 17 मे 2015

उस्मानाबाद जिल्हयाच्या कळंब तालुक्यातील खामसवाडी येथील दैनिक जनप्रवासचे प्रतिनिधी सुशीलकुमार पाटील यांना शिरढोण येथील पोलिसांनी मारहाण करून गंभीर जखमी केले.पोलिस अधिक्षकांकंडं तक्रार दाखल करण्यात आली.


————————————————————————————————————————–


सासवड (पुणे ) दिनांक 19 मे 2015 

पुणे जिल्हयातील सासवड नजिकच्या गराडे येथील म्हस्कू खवले यांच्यावर रेती माफियांनी हल्ला करून जबर जखमी केले.त्यांच्या हाताला मार लागला आहे.सासवड येथील पोलिसात तक्रार दाखल कऱण्यात आली आहे.

—————————————————————————————————————


औरंगाबाद. 09 june 2015 


.औरंगाबादचे एनडी टीव्हीचे पत्रकार पप्पु गिते यांच्यावर काल रात्री संत तुकाराम नाट्यगृहात 15 ते 20 गुंडांनी भ्याड हल्ला करून गंभीर जखमी केले आहे. त्यांच्यावर घाटीत उपचार सुरू आहेत. स्व. मुंडे स्मृतीप्रित्यर्थ आयोजित कार्यक्रमाचे वृतसंकलन करत असतांना हा प्रकार घडला. याप्रकरणात पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी लक्ष घातले आहे. त्यामुळे आरोपींना लवकरच अटक होईल, अशी अपेक्षा आहे.

या घटनेचा तीव्र निषेध..!!!

——————–——–———————————————————————————————————————————-

नाशिक 14 june 2015

महाराष्ट्रात आज दोन पत्रकारांवर हल्ले झाले.पहिली घटना नाशिकमध्ये घडली.नाशिक येथील दीव्य मराठीचे पत्रकार संदीप जाधव यांनी अवैदय धंद्याच्या विरोधात बातम्या दिल्यामुळे दीव्य मराठीच्या कायार्लयावर हल्ला करून संदीप जाधव यांना बेदम मारहाण केली गेली.त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आङे.पोलिस हवालदाराने अवैदय धंद्यावाल्यांना संदीपची माहिती दिली अशी माहिती मिळाली आहे.या घटनेची सरकारनं गंभीर दखल घेतल्याचे गृहराज्या मंत्री यांनी जाहिर केले आहे.

———————————————————————————जळगाव 14 june 2015

दुसरी घटना जळगावची.साप्ताहिक पोलीस व्हिजनचे पत्रकार गोपाल मांद्रे यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला.त्यात मांद्रे गंभीर जखमी झाले आहेत.त्यांनाही रूग्णालायत दाखल केले गेले आहे.या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल कऱण्यात आली आहे.या दोन्ही हल्ल्याचा पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती निषेध करीत असून सरकारनं पत्रकारांना संरक्षण देणारा कायदा करावा अशी मागणी करीत आहे.महाराष्ट्रात पत्रकारांवर सातत्यानं हल्ले वाढले असून गेल्या सहा महिन्यातील वरच्या दोन घटना धरून ४१ पत्रकारांवर हल्ले झाले आहेत.

——————————————————————————————————————————————————————-महान जि अकोला 19 june 2015

महान जि अकोला येथील सीटी न्यूज़ सुपरफ़ास्ट प्रतिनिधि मोबिन शेख यांना 5 ते 7 कसायांनी बेदम मारहाण केलि तसेच हवेत गोळी बार केला

————————————————————————————————————————————————————–

लोणार 20 june

लोणार तालुक्यात अवैद्य धंदे जोरात या मथळ्याखाली 20 जूनच्या लोकमतमध्ये वृत्त प्रसिध्द झाल्यानंतर लोकमतचे तालुका प्रतिनिधी मयूर गोलेच्छा यांना शिविगाळ आणि धमकी देण्यात आली आहे.याबाबतचे निवेदन पोलिसांना देण्यात आले असू न येत्या 27 तारखेला एकनाथ खडसे लोणारला येणार आहेत तेव्हा त्यांनाही निवदेन दिले जाणार आहे.

  तलवडा, गेवराई 21-06-2915


बीड जिल्हयातील गेवराई तालुक्यातील तलवडा येथील पोलिस ठाण्याचे पालीस उपनिरिक्षक राजीव तळेकर यांनी त्यांच्या विरोधात हिंदजागृती वर्तमानपत्रात बातमी दिल्याबद्दल पत्रकार ओमराजे कांबिलकर यांना मारहाण केली.मी रावसाहेब दानवे यांचा नातेवाईक आहे,माझे कोणीच काही करू शकत नाही अशी अरेरावीचीही भाषा त्यांनी वापरली

_________________________________________________________________________________



अहमदनगर,कोपरगाव दिनांक 22 जून 2015


कोपरगाव तालुक्यातील सार्वमतचे पत्रकार काका खर्डे यांना पोलिस निरिक्षक जगदीश मुलगीर यांनी बेदम मारहाण केली.वाळूचे डंपर व जेसीबी पकडल्यावर पैश्याची तडजोड करतानाचे फोटो काढले या गोष्टीचा राग आला यातून पीएसआयने हातातील दंडुक्यानं मारहाण केली.मायगाव देवी ता.कोपरगाव येथे हा प्रखार घडला.

—____________________________________________________________________________________________


गोरेगाव,रायगड दिनांक 24 जून 2015– 


गोरेगाव येथील पत्रकार भारत गोरेगावकर यांच्या पत्नी स्नेहल गोरेगावकर यांच्या घरात घुसून मारहाण करण्यात आली    

——————————————————————————————————————————————————————

झरी , जिंतुर  .27 जुन 2015 


 दि.27 जुन 2015 रोजी जिंतुर तालुक्यातील झरी येथिल दै.सामना चे पत्रकार डी के इनामदार यांच्या वर राशन तस्कर बाबा नामक व्यक्तीने राशन काळ्या बाजाराची बातमी का लावली म्हणुन हल्ला केला इमामदार यांना थापड बुक्यांनी जबर मारहान करण्यात आली या निंदनीय घटनेचा व दहशतवादी प्रवृत्तीचा तिव्र निषेध घटनेच्यानिषेधार्थ सायं..5;00 वाजता परभणी जि.पो.अधिक्षका श्रीमती नियती ठाकर यांना भेटुन परभणी येथिल सर्व पञकार निवेदन देऊन हल्लेखोर राशन माफिया वर कठोर कारवाही करण्याची मागणी करणार आहेत……


_________________________________________________________________________________.                                     

तुंगारेश्वर-  वसई विरार .27 जुन 2015 

मी मराठी चे कैमेरामन संदीप लोखंडे याला दिनांक 27 जूनला, तुंगारेश्वर येथे बातमी करताना 7 ते 8 गावगुंडांनी जबरण मारहाण केली. कैमेराची मोड़तोड़ केली. मोबाईल हिसकावून घेतलं. गाडीची हवा काढून घेतली. या घटनेचा द प्रेस क्लब ऑफ़ वसई विरार कडून जाहिर निषेध….सर्व लोक सिल्वर कलरच्या इनोवा गाडीत होते. गाडीचा नंबर 99 असा आहे

पत्रकारावरील हल्ल्यची गेल्या साडेसहा महिन्यातली ही 43 वी घटना आहे.पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती या हल्लयाचा तीव्र शब्दात निषेध करीत आहे.

_______________________________________________________________________

सांताक्रुझमध्ये मिडियावर हल्ला  16-jully 2015


मुंबईच्या सांताक्रुझ भागातील गोळीबार नगरात झालेल्या सिलेंडर स्फोटाचे कव्हरेज करण्यासाठी गेलेल्या मिडिया प्रतिनिधींवर स्थानिक गुंडांनी हल्ला केल्याने काही महिला पत्रकारांसह तीन ते चार पत्रकार जखमी झाले आहेत.स्फोटाचे वृत्त समजल्यानंतर एबापी माझा,टीव्ही-9 तसेच अन्य वाहिन्यांचे प्रतिनिधी तसेच प्रिन्ट मिडियाचे पत्रकार आणि छायाचित्रकार घटनास्थळी जमा झाले.आणि शांतपणे घटनेचे कव्हरेज करू लागले .तेव्हा तेथे उपस्थित असलेल्या पाच-ते सहा जणांच्या एका टोळक्याने महिला पत्रकारांना अश्‍लिल शिविगाळ करायला सुरूवात केली.महिला कॅमेरामनचवळचे कॅमेरे हिसकावून घेतले.उपस्थित पत्रकारांनी त्यासा आक्षेप घेतला असता त्यांच्यावर हल्ला करण्यात आला.यामध्ये टीव्ही-9चे पत्रकार श्रीकांत शंखपाळ गंभीर जखमी झआले आहेत.तसेच टीव्ही -9च्या महिला कॅमेरामन तसेच एबीपीमाझाच्या महिला रिपोर्टरलाही मारहाण करण्यात आली आहे.या प्रकरणाची तक्रार निर्मळ पोलिसात देण्यात आली असून गुन्हे नोंदणीचं काम तेथे सुरू आहे.

मनुश्री पाठक – मारहाण एबीपी माझा

कविता        – टीव्ही-9

श्रीकांत शंखपाळ– टीव्ही-9

______________________________________________________________________________________

मुंबई :१७-०७-२०१५

मुंबई : सांताक्रूझमध्ये पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याची घटना ताजी असतानाच, आता  मीरा रोड परिसरात तीन पत्रकारांवर जीवघेणा हल्ला झाला आहे. यामध्ये एका पत्रकाराचा मृत्यू झाला असून, त्याचा मृतदेह मीरा रोड परिसरात आढळला आहे. तर अन्य दोन पत्रकार जखमी झाले आहेत.

राघवेंद्र दुबे असं मृत्यू झालेल्या पत्रकाराचं नाव आहे. दुबे हे मीरा-भाईंदरमधील एका साप्ताहिकाचे संपादक होते.शशी शर्मा आणि संतोष मिश्रा जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर पोलिसांनी एका बारवर टाकलेल्या धाडीची बातमी कव्हर करण्यासाठी हे पत्रकार गेले होते. त्यावेळी त्यांच्यावर हा जीवघेणा हल्ला झाला.

मीरा भाईंदर रोडवर असलेल्या व्हाइट हाऊस बिअर बारवर पोलिसांनी काल रात्री छापा टाकला. रात्री 1 वाजता पोलिसांनी ही छापेमारी केली. यामध्ये पोलिसांनी 15 मुलींना ताब्यात घेतलं होतं.

यावेळी शशी शर्मा आणि संतोष मिश्रा हे पत्रकार बारवरील धाडीच्या वार्तांकनासाठी गेले होते. मात्र त्यावेळी दोघांवरही हल्ला झाला.  या दोघांवर हल्ला झाल्याची तक्रार देण्यासाठी पत्रकार राघवेंद्र दुबे हे मीरा रोड पोलिस स्टेशनमध्ये गेले. त्यावेळी पोलिस स्टेशनमध्ये अनेक बारमालक उपस्थित होते. त्यावेळी पोलिस, बारमालक आणि दुबे यांच्यात बाचाबाची झाल्याचं सांगण्यात येतंय.

यानंतर पहाटे पाचच्या सुमारास राघवेंद्र दुबे यांचा मृतदेहच आढळून आला. एस.के. स्टोन चौकीजवळ राघवेंद्र मृतावस्थेत आढळले. त्यांच्या डोक्याला दुखापत झाली होती.

आजच्या घटनेचा निषेध कऱण्यासाठी विधीमंडळात काम करणार्‍या पत्रकारांनी दंडाला काळ्या फिती लावून काम केले.तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना पत्रकाराची हत्त्या करणार्‍या गुंडांना अटक करण्याची पत्रकार सुरक्षा कायदा कण्याची मागणी केली.पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीने या घटनेचा निषेध केला आहे.

राघवेंद्र दुबे — हत्त्या

शशी शर्मा   — अपहरण,हल्ला

संतोष मिश्रा — गंभीर जखमी

—————————————————————————————————————————मुंब्रा १७=-०७-२०१५

ठाण्याच्या मुंब्रा येथे  सरिता मिश्रा नावाच्या महिला पत्रकारावर हल्ला करण्यात आला.व्यक्तीगत वादातून हा हल्ला झाल्याचे सांगितले जाते.

————————————————————————————————————————–

सांगली दिनांक 17 जुलै 2015

आयबीएन-लोकमतचे सांगली जिल्हा प्रतिनिधी असिफ मुरसल यांना अज्ञात व्यक्तीकडून जिवे मारण्याची धमकी दिली गेली.या प्रकऱणी संजयनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

————————————————————————————————————————–

कल्याण 19 जुलै2015

कल्याण येथील दबंग दुनियाचे पत्रकार संदीप तिवारी यांनी एक बातमी प्रसिध्द केल्याने शिवसेना पदाधिकारी राजाराम पावसे यांनी जिवेमारण्याची धमकी दिली.याची तक्रार कोळसेवाडी पोलिसात करण्यात आली आहे.

———————————————————————————————————————–

 सई 22 जुलै2015

मुंबईच्या वसई रोड स्टेशनजवळ मुंबईतील एका मराठी वाहिनीचे पत्रकार आशीष सिंह यांच्यावर लोकलमध्ये हल्ला कऱण्यात आला.हल्लेखोर दोन होते.नंतर आशिषसिंहने आपल्या काही सहकार्‍यांमुळे आरोपींना पोलिसांच्या हवाली केले.

————————————————————————————————————————–

 बुलढाणा 21 जुलै 2015

बुलढाणा येथील पत्रकार साबिर अली यांच्यावर दिनांक 21 जुलै रोजी एका संस्था चालकाच्या वाहन चालकाने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले.बिना नंबर प्लेट असलेल्या गाडीचे छायाचित्र काढताना त्यांच्यावर हा हल्ला केला गेला.बुलढाणा शहरातील पत्रकारांनी या घटनेचा निषेध केला असून पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रत्नागिरी 4 ऑगस्ट 2015

– रत्नागिरी येथील झी-24 तासचे प्रतिनिधी प्रणव पोळेकर यांना एका खासगी कंपनीच्या केबल टाकणार्‍या व्यक्तीने धमकी देत धक्काबुक्की केली आहे. पत्रकारांनी पोलिस अधीक्षक संजय शिंदे यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे,

कामशेत पुणे 4 ऑगस्ट 2015-

पुणे जिल्हयातील कामशेत येथील मनसे प्रमुख बंटी वाळूंज यांची हत्त्या झाल्यानंतर त्याची बातमी घेण्यासाठी गेलेल्या पाच पत्रकारांवर हल्ला. हल्ला झालेले पत्रकार असे.1) गणेश दुडम ( जय महाराष्ट्र  )2) चैत्राली राजापूरकर ( टीव्ही-9) तसेच अन्य दोन पत्रकार आहेत .काही पत्रकारांचे कॅमेरे हिसकावून घेण्याचा प्रयत्न.दुडम यांचा टी शर्टही फाडला.

मुंबई १८  ऑगस्ट 2015-

दबंग दुनिया या हिंदी दैनिकाचे संपादक सत्यनारायण तिवारी यांना  18 ऑगस्ट रोजी रात्री दहा वाजता जिवे मारण्याची धमकी देणारा फोन आला होता.’तुम्ही सरकार आणि मंत्र्यांच्या विरोधात बातम्या देण्याचे थांबविले नाही तर तुमच्यासह संपूर्ण स्टाफला  कार्यालयात  येऊन गोळ्या घालून ठार करण्यात येईल अशी धमकी दिली आहे.तुम्ही किती वाजता कार्यालयात येता आणि परत जाता याची पूर्ण खबर आम्हाला आहे’ असेही फोन कर्त्याने म्हटले आहे.या धमकीच्या फोनची तक्रार कफ परेड पोलिसांत नोंदविण्यात आली आहे.

चंद्रपूर दिनांक 23 ऑगस्ट 2015 

विरोधात बातमी आल्याने संतापलेल्या चंद्रपूर जिल्हयातील श्रमिक एल्गारच्या संस्थापिका परोमिता गोस्वामी यांनी सावली येथील पत्रकाराच्या विरोधात एकाच वेळी सहा पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत.पत्रकाराचा गुन्हा एकच होता,त्यानं परोमिता मॅडम कुठे आहेत तुमचे पंचवीस हजार कार्यकर्ते या मथळ्याखाली बातमी देऊन खोटे आकडे दणार्‍या संघटनेची पोलखोल केली होती.या घटनेच्या निषेधार्थ पत्रकार संघटनांनी 25 ऑगस्ट 2015 रोजी चंद्रपुरमध्ये मोर्चा काढला होता.

लातूर दिनांक 31 आगस्ट 2014

लातूर येथील झी-24 तासचे प्रतिनिधी शशिकांत घोणसे पाटील यांना आज धक्काबुक्की कऱण्यात आली.कव्हेकर यांच्या संस्थेच्या मुलांचे वसतीगृहात राहणार्‍या मुलांना शौचालय साफ करायला लावले जाते याची माहिती कळल्यानंतर शशिकांत पाटील तेथे गेले.बातमीचे छायांकन करताना सुरक्षा रक्षकांनी शशिकांत पाटील यांना धक्काबुक्की केली तसेच त्यांच्यावर बंदुक रोखून बाहेर हाकलून लावले याचा निषेध होत आहे.


जळगाव 10 आगस्ट 2014

येथील देशोन्नतीच्या कार्यालयावर समाजकंटकांनी हल्ला केला.एक बातमी विरोधात छापली म्हणून हा हल्ला झाला. या हल्ल्यात कार्यालयाची मोडतोड तर केली गेलीच,त्याच बरोबर पत्रकारांनाही मारहाण झाली.हल्लेखोरांमध्ये महिलाही होत्या.त्यांनी आमचे विनयभंग झाले म्हणून पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.


मुंबई- 20 सप्टेंबर 2015

ज्येष्ठ पत्रकार निखील वागळे तसेच श्यामसुंदर सोन्नर यांना सनातन कडून धमकी.वागळेंनी दिला दुजोरा.


मुंबई – 27 सप्टेंबर 2015

लालबाग राजाच्या ठिकाणी वृत्तसंकलन करताना महिला पत्रकार पुनम अपराज यांना पोलिसांकडून मारहाण.पुनमला रात्रभर पोलिस चौकीत बसवून ठेवले.1200 रूपये दंड वसूल केल्यानंतर सुटका.गणपतीचे फोटो काढताना ही घटना घडली.


नागपूर,पुणे आणि मुंबई दिनांक 30 स्पेटंबर आणि 1 ऑक्टोबर

नागपूर जिल्हयातील पारशिवनी येथील पत्रकार देवानंद शेंडे,पुणे जिल्हायातील मुळशी येथील पुढारीचे प्रतिनिधी किसन बाणेकरी आणि पुण्यनगरीचे संपादक संजय मलमे यांना बातम्या छापल्या बद्दल जिवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या आहेत.


दौड,पुणे दिनांक ०३-10-२०१५

दौड तालुक्यातील पाटस येथील पत्रकार आणि दौड तालुका मराठी पत्रकार संघाचे सहसचिव संजय सोनवणे आज दुपारी पाटस येथील बातमी कव्हर करण्यासाठी गेले असता तेथे उपस्थित पोलिसांपैकी एका महिला कॉन्स्टेबलने त्यांना घटनेचे फोटो काढण्यास मज्जाव केला आणि त्यांच्याकडील मोबाईल काढून घेत त्यांना धक्काबुक्की केली.या घटनेचा दौड तालुका पत्रकार संघाने निषेध केला असून संबंधित महिला पोलिस कॉन्स्टेबलवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

मुंबई दिनांक 3 ऑक्टोबर 2015

मुंबई येथील न्यूज-24 चे ब्युरो चीफ विनोद जगदाळे हे आज जेजे हॉस्पिटलमध्ये इंद्राणी मुखर्जीचे फोटो काढत असताना पोलिसांनी अचानक त्यांना ताब्यात घेऊन त्यांना दोन तास अडवून ठेवले.डॉ.तात्यासाहेब लहाने यांच्या मध्यस्थीनंतर त्यांची सुटका कऱण्यात आली.


परभणी दिनांक 6 ऑक्टोबर 2015 परभणी जिल्हयातील असोला येथील दैनिक देशोन्नतीचे प्रतिनिधी गोपीराज जावळे यांना नवा मोढा पोलिस ठाण्यातील एका कर्मचार्‍याने सार्वजनिक ठिकाणी मारहाण केली.या संबंधीची तक्रार जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याकडे करण्यात आली आहे.

मुंबई 10 ऑक्टोबर 2015

एबीपी माझाच्या कार्यालयाजवळ बाईकवरून आलेल्या तिघांनी इंडिया टीव्ही न्यूज चॅनलचे कॅमेरामन पोटले यांना कारण नसताना जबरदस्त मारहाण केली.ही मारहाण बेल्टनं केली गेली.गाडीचा नंबर होता,एमएच-01 बीझेड 7426


पनवेल: दिनांक 11 ऑक्टोबर 2015

पनवेल: पनवेल येथील दैनिक कर्नाळा या दैनिकाच्या पत्रकाराला मारहाण करण्याचा प्रकार पनवेल तालुक्यातील शिरढोण गावात घडला आहे.शनिवारी रात्री १० च्या सुमारास शिरढोण गावातील तीन युवकांनी योगेश मुकादम या २६ वर्षीय पत्रकाराला मारहाण केली.व जीवे मारण्याची धमकी दिली.वर्तमान पत्रात बातमी दिल्याचा राग मनात ठेऊन या तिघांनी योगेश मुकादम यास मारहाण केली.


वसई-विरार 11 ऑक्टोबर 2015

विरारमध्ये घडली.द प्रेस क्लब अ‍ॅाफ वसईचे पदाधिकारी आणि आयबीएन लोकमतचे पत्रकार जीत इंगळे आणि त्यांच्या दोन भावांवर हल्ला कऱण्यात आला.बातमीच्या रागातून हा हल्ला झाला असून आरोपींवर कडक कारवाई करावी अशी मागणी पत्रकारांनी केलेली आहे.

मावळ दिनांक 12 ऑक्टोबर 2015 मावळ येथील वाढती गुन्हेगारी आणि अवैद्य धंद्याचय विरोधात बातम्या दिल्याबद्दल आणि स्वतंत्र पोलिस ठाण्याच्या निर्मितीसाठी सतत पाठपुरावा केल्याबद्दल  कामशेत येथील सकाळचे पत्रकार विजय सुराणा,लोकमतचे महादेव वाघमारे आणि पुढारीचे किशोर ढोरे या पत्रकारांना वडगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विजय जाधव आणि हवालदार बाब शिंदे यांनी जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या आहेत

.

पुणे दिनांक 16 ऑक्टोबर 2015 पुणे येथील जंगली महाराज रस्त्यावर पुणे महापालिकेची अतिक्रमण विरोधी कारवाई सुरू असताना तेथे बातमी कव्हर करायला गेलेल्या पत्रकार विवेक तायडे यांना काही गुंडांनी मारहाण करून त्याना जिवे मारण्याची धमकी दिली आहे.या विरोधात शिवाजी नगर पोलिसात निवेदन देण्यात आले आहे.


मुंबई दिनांक 21 ऑक्टोबर 2015 नवभारत टाइम्सचे प्रतिनिधी अनुराग त्रिपाठी यांना मंत्रालयात जाण्यापासून रोखण्यात आले तेव्हा त्यांनी पोलिसांना त्याबाबत विचारणा केली असता त्यांना पोलिसांनी एखादया गुन्हेगारासारखे मरिन ड्राइव्ह पोलिसांत नेले.गिरीष बापट यांना हे कळल्यावर ते तेथे थेट गेले आणि त्यांची सोडवणूक केली.


 रेवदंडा दिनांक 21 ऑक्टोबर 2015

रायगड जिल्हयातील रेवदंडा येथील आगरकोट किल्ल्याच्या झालेल्या दुरावस्थेचे छायांकन कऱण्यासाठी किल्ल्यात गेलेले पत्रकार महेंद्र खैरे यांना काल मारहाण करण्यात आली.याची तक्रार रेवदंडा पोलिसात करण्यात आली आहे. किल्ल्याला गेलेले तडे आणि किल्ल्यात वाढलेले जंगलाचे सांमा्रज्य याचे वृतांकन आणि फोटो घेण्यासाठी महेंद्र खैरे तेथे गेले असता त्यांच्यावर गुंडांनी हल्ला केला.त्यांच्याकडील कॅमेरा हिसकावून घेत त्याचीही मोडतोड करण्यात आली आहे.रेवदंडा किल्ल्यात अनेक गैरप्रकार सुरू असतात.प्रेमी युगुलांनाही त्रास दिला जातो अशा गुंडांनीच पत्रकारावर हल्ला केला असावा .

जालना  दिनांक 21 ऑक्टोबर 2015

जालना येथील मत्सोदरी दैनिकाचे प्रतिनिधी अच्युत दगडोजी मोरे यांच्यावर काही गावगुंडांनी लाठ्या,काठया आणि लोखंडी गजांनी हल्ला केला आहे.या हल्ल्यात मोरे गंभीर जखमी झाले असून त्यांच्या एका हातालाही फॅक्चर झाले आहे.त्यांच्यावर जालना येथील एका खासगी रूग्णालायात उपचार कऱण्यात येत आहेत.

अच्युत मोरे आपले काम आटोपून गावी जात असताना रानगर (कारखाना) येथे त्यांच्यावर हा भ्याड हल्ला केला गेला.या हल्ल्यात त्यांच्या समवेत असलेले आनंद म्हस्के आणि प्रेमानंद मगरे हे देखील जखमी झाले आहे.बातमीच्या रागातून आणि पत्रकाराला अद्यल घडवायचीच या इर्षेतून हा हल्ला झाला आहे

 श्रीगोंदा दिनांक 31 ऑक्टोबर2015

श्रीगोंदा येथील मटका आणि जुगार धंद्याची बातमी छापल्याच्या रागातून पोलीस निरीक्षक  शामकांत सोमवंशी यांनी पत्रकार सुजित गायकवाड यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे.या विरोधात प्रांतांकडे निवेदन देण्यात आले आहे.-


04-11-2015     अचलपूर 

अमरावती जिल्हयातील अचलपूर तालुक्यातील शिंदी येथील पत्रकार सुनील रोडे यांच्यावर चार ते पाच गुंडानी बुधवारी रात्री हल्ला चढविला.या प्राणघात  हल्ल्यात ते गंभीर जखमी झालेत.याची पोलिसात तक्रार नोंदविण्यात  आली आहे.अचलापूर प्रेस क्लबने या घटनेचा निषेध केला आहे.

दिनांक 4 नोव्हेंबर 2015 खामगाव ( जि.बुलढाणा) बुलढाणा जिल्हयातील खामगाव येथील पत्रकार काका रूपारेल यांच्या घरावर अज्ञात इसमांनी हल्ला केला.त्यात घराचे मोठे नुकसान झाले आहे.फटाक्याच्या एका दुकानाच्या संदर्भात त्यांच्या दैनिकात एक बातमी छापली होती त्या रागातून हा हल्ला केला गेला असावा असा रूपारेल यांचा अंदात आहे.

नाशिक – दिनांक 21 नोव्हेंबर 2015 

येथील सकाळचे बातमीदार महेंद्र महाजन यांना पोलिस उपायुक्त अविनाश बारगळकर यांनी बेदम मारहाण केली.नाशिकमध्ये पालकमंत्री गिरीश महाजन यांना शेतकर्‍यांनी अडविले याचा राग आलेल्या बारगळकडून मारहाण केली गेली.महेंद्र महाजन यांना नाशिक येथील सुयश इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.त्यांच्या हातपायाना आणि बरगडयांना जबर मार लागला आहे.विकास गामन  आणि किरण कवडे या दोन पत्रकारांनाही मारहाण झाली आहे.

पुणे 26 नोव्हेंबर 2015

पत्रकाराचा आत्महत्येचा प्रयत्न

पुणे येथील लाईट ऑफ पुणे या साप्ताहिकाचा संपादक रूबेन म्युनियल याने दिनांक 26 नोव्हेंबर 2015 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगावर रॉकूल ओतून घेत स्वतःला पेटवून दिले आणि आत्महत्येचा प्रयत्न केला.त्यात तो 60 टक्के भाजला आहे.रूबेन यांच्यांवर खंडणीचे विविध गुन्हे दाखल असल्याने पोलिसांनी त्यांच्याविरोधात तडीपारीची नोटीस बजावली आहे.यामुळे नैराश्य आलेल्या रूबेनने आत्महत्याच करण्याचा प्रयत्न केला.कॅम्प परिसराताली फॅशन स्ट्रीटवर अनाधिकृत लावण्यात येणार्‍या हातगाडीवाल्यांच्या विरधात रूबेनेने पोलिसांत तक्रार केली होती.त्यामुळे चिडलेल्या हातगाडीचालाकंनी त्यांच्या विरोधात खंडणीच्या तक्रारी दाखल केल्या आहेत असं रूबेन यांचं म्हणणं आहे.या संदर्भात पोलिसांकडे अनेकदा चकरा मारूनही उपयोग झाला नसल्याने त्यांनी हे टोकाचे पाऊल उचललले आहे.राज्यात अनेक पत्रकारांवर असे खोटे गुन्हे दाखल झालेले आहेत.

जळगाव 26 नोव्हेंबर 2015

जळगावच्या लोकमत कार्यालयावर हल्ला

दैनिक लोकमतमधील आजच्या मंथन पुरवणीत धार्मिक भावना दुखावणारा मजकूर प्रसिध्द झाल्याचा आरोप करीत एका टोळक्यानं आज दुपारी जळगाव मधील लोकमतच्या कार्यालयावर हल्ला चढविला.या हल्ल्यात लोकमतच्या सेक्युरिटी ऑफिसचे नुकसान झाले असून मजकुराबद्दल संपादकांनी माफी मागावी अशी मागणी हे लोक करीत होते.या संदर्भात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात येणार असल्याचे जळगाव लोकमतचे संपादक मिलिंद कुलकर्णी यांनी सांगितले.यावेली जमाव जोरात घोषणाबाजी करीत होता.जळगावमधील घडलेला हा प्रकार लक्षात घेऊन परभणी आणि अन्य काही जिल्हयात लोकमत कार्यालयावर बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.उद्याच्या अंकात दिलगिरी व्यक्त करण्याचे लोकमतने ठरविले असल्याचे समजते.इंटरनेट आवृत्तीतील मंथन पुरवणी काढून घेण्यात आली आहे.

मुंबई दिनांक 4 डिसेंबर 2015

ज्येष्ठ पत्रकार बालाकृष्णन यांना छोटा शकीलने धमकी दिली आहे.

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची मालमत्ता 9 डिसेंबर रोजी लिलावात काढली जात आहे.ती प्रॉपर्टी खरेदी करण्यात स्वारस्य दाखविणार्‍या बालाकृष्णन यांना छोटा शकिलने धमकी दिली आहे असा दावा त्यांनी केला आहे.

स्मानाबाद दिनांक 8 डिसेंबर 2015

उस्मानाबाद लाइव्हचे संपादक सुनील ढेपे यांना राष्ट्रवादीचे नगरसेवक संपत डोके यांनी अर्वाच्च भाषेत शिविगाळ केली.त्यांनी आपल्या गोफणगुंडा या कॉलममध्ये उस्मानाबाद नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसंदर्भात भाष्य कऱणारा मजकूर लिहिला होता.त्यात डोकेचे नाव नव्हते.

पुणे दिनांक ९ डिसेंबर 2015

पुण्यातील शिवाजीनगर भागात राहणारे सिध्दान्त समाचार या वृत्तपत्राचे वार्ताङर राज पांडे यांचे घर पेटवून देण्याचा आज प्रयत्न झाला.पांडे दाम्पत्य आणि त्यांची छोटी मुलगी सुखरूप आहेत.सहाय्यक पोलिस आयुक्तांनी लगेच घटनास्थळास भेट दिली आहे.घराचे आणि दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे.- पुण्यात पत्रकाराचे घर पेटविले

वर्धा दिनांक ९ डिसेंबर 2015

वर्धा येथील सकाळचे बातमीदार किशोर कारंजीकर याना राष्ट्रवादीचे पंचायत समिती उपसभापती संदेश थिटे यांनी बेदम मारहाण केली आहे.ग्रामपंचायत निवडणुकीच्या बातमीवरून हा प्रकार घडला आहे.या विरोधात सेवाग्राम पोलिसात तक्रार दाखल झाली असून आरोपीच्या विरोधात 323,506 कलमाखाली गुन्हा दाखल झाला आहे.काल वर्ध्यातील पत्रकारांनी पोलिस अधीक्षकांची भेट धेऊन त्यांना निवेदन दिले आहे

उस्मानाबाद 31 डिसेंबर 2015ः


महेश मोतेवार याच्या अटकेचे रिपोर्टिंग करणारे झी-24 तासचे महेश पोतदार आणि टीव्ही-9चे रिपोर्टर संतोष जाधव यांना महेश मोतेवारच्या बॉडीगार्ड आणि ड्रायव्हरे धक्काबुक्की करून त्यांचा कॅमेरा हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला.बॉडीगार्ड आणि ड्रायव्हरच्या विरोधात उस्मानाबाद पोलिसात गुन्हा दाखल

पुणे 31 डिसेंबर 2015ः

पोलिसांच्या जाचाला कंटाळून अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतलेले लाईट ऑफ पुणे चे संपादक रूबेन सॅम्युअल यांचे निधन

२०१४ मधील हल्ले  (६६)

————————————

3 जानेवारी –

 पौड-मुळशी येथील पुढारीचे पत्रकार किसन बाणेकर  यांना स्थानिक पोलिस निरिक्षक मोरे यांना बेकायेशीरपणे डाबले अजित पवार यांना मोरे यांच्या विरोधात निवेदन देण्याचा प्रयत्न केला असता त्याला वेडा ठरवून सहा तास डांबून ठेवले.

4  जानेवारी- नादेड जिल्हयातील मालेगाव येथील लावणी महोत्सवात पत्रकारासाठी राखीव ठेवलेल्या जागांवर पुढारी बसले.त्याला पत्रकारांनी आक्षेप घेतल्यावर जि.प.अध्यक्षांचे पीए मिलिंद व्यवहारे आणि मोकल शेळके यांनी पत्रकाराशी असभ्य वागणूक.धक्काबुक्की.

7 जानेवारी– माजलगाव येथील पत्रकार जहागिरदार यांनी रस्तयातील कामात झालेल्या गैरकारभाराची बातमी छापल्याबद्दल स्थानिक आमदार प्रकाश सोळंके यांच्या पीएची जिवे मारण्याची धमकी.

8 फेब्रुवारी– नवी मुंबई येेथील पत्रकार सागर मेघे याच्यावर हल्ला

9 फेब्रुवारी- लातूर येथील पत्रकार रवींद्र जगताप  यांच्यावर मेडिकलच्या विद्यार्थ्यांा ल्ल्ला,जगताप गंभीर जखमी.

13 फेब्रुवारी- अलिबाग येथील पुढारीचे पत्रकार रमेश कांबळे यांच्यावर महिला कार्यकर्त्यांकूडन हल्ला.एका कार्यकमात काही महिलांनी डान्स केला.त्याची बातमी छापल्यामुळे हा हल्ला झाला

17 फेब्रुवारी- खोपोली येथील समाज वैबव साप्ताहिकाचे संपादक गोकुळदास येशीकर यांना कॉग्रेस पुढारी अय्युब पटेल यांची मारहाण

18 फेब्रुवारी- मुंबई येथील परळ भागात असलेल्या आदिती हॉटेलमध्ये जेवायला गेलेल्या मिड-डेच्या चार महिला पत्रकारांबरोबर असभ्यवर्तन.सहा आरोपींना अटक.

23 फेब्रुवारी – नांदेड जिल्हयातील सावभैौम जनता चे संपादक विवेक केरूरकर यांना पोलिसांची बेदम मारहाण.पोलिसांच्या विरोधातील बातम्यांच्या कारणांवरून ही मारहाण झाली.

1 मार्च– पिंपरी येथील साप्ताहिक मर्द महाराष्ट्रचे संपादक राम गायकवाड यांना संजय चव्हाण याकडू मारहाण

2 मार्च- इंदापूर येथील प्रभातचे पत्रकार निळकंठ मोहिते यांना कॉग्रेसवाल्यांक डून मारहाण.यात्रेची बातमी दिल्यामुळे ही मारहाण झाली.आरोपी वकिलाला अटक नाही.

2 मार्च- शिरूर येथील पत्रकार मुकुंद मनोहर ढोबळे यांच्यावर पोलिसांकडून एका महिलेचा विनयभंग केल्याचा खोट्या आरोपाखाली ्र354 चा गुन्हा दाखल.

3 मार्च- सागली येथील पत्रकार रवींद्र कांबळे यांच्या जय महाराष्ट्र वाहिनीचा लाईव्ह शो बंद पाडला.कांबळे यांना धक्काबुक्की.दमदाटी

17 मार्च- मुंबई येथील जिया न्यूजची महिला पत्रकाराची होळीच्या दिवशी झेडछाड.कॅमेरामनला मारहाण.चार अटकेत.अंधेरीत घडली घटना.

19 मार्च- परभणी जिल्हयातील सोनपेठ येथील पत्रकार भागवत शंकराप्पा पोपडे यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण.एका कार्यक्रमाची सेना उमेदवाराची बातमी दिल्याने ही मारहाण झाली.

30 मार्च 

नगर जिल्हयातील जामखेड येथील पत्रकार सांताराम सुळ आणि राहता येथील पत्रकार अशोक सदाफळे यांना बातम्या दिल्यामुळे जिवे मारण्याच्या धमक्या.

3 एप्रिल 

मुंबई येथील जय महाराष्ट्र वाहिनीचे कॅमेरामन दिलीप राय यांना शिवसेना-मनसे दंगलीच्या वेळेस मारहाण त्यांच्या डोक्यात सोडा वॉटरच्या बाटल्या फोडल्या.ते गंभीर जखमी झाले.

१३ एप्रिल २०१४

पनवेल येथील साप्ताहिक आदिवासी सम्राटचे संपादक गणपत जाणू वरगडा यांनी वनविभागाच्या भ्रष्टाचाराची बातमी छापल्याबद्दल वनपाल ठाकूर यांची पत्नी आणि मुलाने संपादकांना जिवे मारण्याची धमकी दिली तसेच जातीयवाचक शिविगाळ केली.याची तक्रार पनवेल पोलिसात दिली गेली आहे.

15 एप्रिल 2014

मुर्तीजापूर येथील पत्रकार निलेश पिंजरकर आणि अन्वरखान यांना संस्थाचालक डॉ.राजेश कांबे यांनी जिवे मारण्याची धमकी दिली.कांबे यांच्या पॉलिटिकल कॉलेजमधील एका विद्यार्थ्यानं आत्महत्या केल्याची बातमी छापल्याबद्दल ही धमकी दिली गेली.तक्रार दाखल.गुन्हा नोंदविलाय

17 एप्रिल 2014

 सकाळचे पत्रकार तुषार खरात यांना आमदार जयकुम गोरे यांचे बंधू शेखर गोरे यांनी माण तालुक्यातील पांढरवाडी येथील मतदान केंद्रात 17 एप्रिल रोजी मारहाण केली.गोरे आपल्या पन्नास कार्यकर्त्यासह मतदान केंद्रात घुसले आणि मुलाणी नावाच्या ग्रामपंचायत सदस्यांच्या पतीला मारहाण करू लागले.त्यावेळी तेथे कव्हरेजसाठी उपस्थित असलेल्या तुषार खरात यांनी मध्यस्थी करण्याचा प्रय़त्न केला असता त्यांनाही बेदम मारहाण केली गेल


२५ एप्रिल २०१4  

 पुणे जिल्हयातील वालचंदनगर येथील सकाळचे बातमीदार सचिन लोंढे यांच्यावर आज एका मटका चालकाने हल्ला केला आहे.त्यात ते आणि त्यांचा भाऊ जखमी  झाले असून त्यांना रूग्णालयात दाखल कऱण्यात आले आहे. मारहाणीत सचिन लोढे यांचा हात फ्र्रक्चर झाला आहे. मटका आणि अन्य बेकायदा धंद्याच्धा  त सचिन लोंढे बातम्या देत असल्याच्या रागातून यापूर्वी देखील त्यांच्यावर हल्ला केला गेला होता.

27 एप्रिल 2014

मुंबई येथील एका वाहिनीचे पत्रकार संजय प्रसाद यांना मालाड भागात काही गुंडांनी मारहाण केली.संजय प्रसाद आपल्या पत्नी सोबत बाजारात गेले असता गुंडांनी पत्रकाराच्या पत्नीची छेड काढली.संजय प्रसाद यांनी जाब विचारला असता पाच-सहा गुंडांनी त्यांना बेदम मारहाण केली.सहा जणाच्या विरोधात विनयभंग आणि मारहाणीचा गुन्हा दाखल केले आहे.


30 एप्रिल 2014

कर्जत येथील पत्रकार आशिष बोरा यांना काल सायंकाळी दोन युवकांनी बस स्थानकावर बेदम मारहाण केली त्यात बोरा यांचे डोके फुटले आहे.बोरा हे पुण्यनगरी तसेच एका वृत्तवाहिनीचे काम करतात.बोरा.त् डोके फुटले असून त्यांच्या तोंडाला,छातीला मार लागला आहे.त्यांच्यावर उपजिल्हा रूग्णालयात उपचार करण्यात आले.


30   April 2014            

30 एप्रिल रोजी मलकापूर नगरपालिकेवर नेण्यात आलेल्या तोडफोड मार्चाची बातमी देताना खबरे शामतक या दैनिकाने आमदार संचेती यांचे बंधू सुरेश संचेती यांचे नाव मनसे   कार्यकर्त्यांच्या   नंतर छापले होते.त्यामुळे चिडलेल्या सुरेश संचेती यांनी फोन करून पत्रकार विरसिंह राजपूत यांना जिवे मारण्याची धमकी दिली.या घटनेचा शहर आणि तालुका पत्रकार संघाने   निषेध केला   आहे.तसेच एक निवेदन प्रांताधिकारी यांना देण्यात आले आहे


7 may 2014

सातारा जिल्हयातील फलटण येथील एेक्य आणि सकाळच्या कायार्लयावर हिंदुस्थान प्रजा पक्षाच्या 

गुंडांनी हल्ला केला,तोंडाला रूमाल बांधून आलेल्या या गुंडांनी लोखंडी सळयांनी दारे,खुच्यार् टेबल तोडले.त्यांची बातमी दिली नाही असा त्यांचा आक्षेप होता.त्यामुळं हा हल्ला झाल्याचं सागणयात येतंं


18 मे 2014                    

जळगाव येथील गणपती हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी निष्काळजीपणा केल्यानं एका अपघातात जखमी झालेले सकाळचे बातमीदार गणेश खाबेटे यांचा मृत्यू झाल्याची तक्रार त्यांच्या नातेवाईकांनी  पोलिसात केली आहे.


19 मे 2014       

बीड जिल्हयातील अंबाजोगाई येथील दैनिक विविकसिंधूचे संपादक नानासाहेब गाठाळ यांना आमदार पृथ्वीराज साठे यांनी अवार्च्चा शिविगाळ करून धमक्या दिल्या आहेत.तुमच्या मुलाला रस्त्यावर फिरू देणार नाही तुम्ही कसे वतर्मानपत्र चालवता ते बघतो अशीही धमकी त्यांनी गाठाळ यांना दिली आहे.विविकसिंधूचे वृत्तसंपादक अभिजित गाठाळ यांनी निवडणूक निकालाचे विशलण करणारा एक लेख लिहिला होता.त्यात साठे यांच्यावर कसलीही व्यक्तीगत टीका केलेली नव्हती.तरीही त्यांनी धमक्या दिल्या आहेत.या प्रकरणी नानासाहेब गाठाळ यांनी पोलिसात तक्रार दिली


22 मे 2014

जालना येथील साप्ताहिक विश्वप्रतापचे संपादक विठ्ठलसिंग गुलाबसिंग राजपूत ( वय 35) यांची 22 मे 2014 रोजी निर्घृण हत्त्या करण्यात आली.पाच तरूणांनी ही हत्त्या केल्याचे समोर आले असून ते सर्व 19 ते21 वयोगटातील आहेत.पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.


30 मे 2014

भंडारा येथील आमदार अनिल बावनकर यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजपचे नवनिर्वाचित खासदार नाना पटोले यांच्यावर काही आरोप केले होते.तसेच नाना पटोले खोटारडे आहेत असा शब्दप्रयोगही त्यांनी केला होता.यासंबंधिची बातमी आणि वृत्तविश्लेषण देशोन्नतीच्या 30 मे च्या  भंडारा आवृत्तीत प्रसिध्द झाले होते.त्यामुळे संतापलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी 30 मे रोजी देशोन्नतीच्या भंडारा जिल्हा कार्यालयावर हल्ला चढवत जिल्हा प्रतिनिधी चेतन भैराव यांच्या नावाने शिविगाळ केली.भाजप कार्यकर्त्यांनी कार्यालयावर मोठ्या प्रमाणात दगडफेक करून कार्यालयाचे नुकसान केले.तसेच देशोन्नतीच्या अंकाची होळी केली


11 जून 2014

सामनाच्या 11 जून 2014च्या अंकात शरद पवारांवर टीका कऱणारा बेताल बडबड या शिर्षकाखाली अग्रलेख प्रसिध्द झाला आहे.त्याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादीच्या लोकांनी सामनावर मोर्चा काढला,दगडफेक केली,अंकाच्या प्रती जाळल्या.यावेळी शिवसेना- राष्ट्रवादी कार्यकर्त्यात मोठा राडा झाला


16 june 2014

दैनिक देशोन्नतीचे पत्रकार विनोद कळस्कर यांच्यावर अकोला तालुक्यातील वडद बुद्रूक येथे शनिवारी रात्री ११ वाजता वाळूमाफियांनी प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. दहिहांडा पोलिसांनी एका आरोपीस अटक केली असून, इतर दहा ते बारा हल्लेखोर फरार झाले आहेत


26 june 2014

चिकणघर / म्हारळ : ‘लोकमत’चे अंशकालीन वार्ताहर शिवसिंह बाबुलाल ठाकूर (४४) यांची काल राहत्या घरी निर्घृण हत्या झाली. ठाकूर यांचा खून केल्यानंतर त्यांचा मृतदेह उघड्यावर जाळून व खून झाला त्या खोलीची फरशी धुऊन पुरावा नष्ट करण्याचाही प्रयत्न झाला असून, या प्रकरणी ठाकूर यांची भावजय आणि पुतण्या यांना टिटवाळा पोलिसांनी ताब्यात घेतले

26 जून 2014

माजलगाव येथील दैनिक सुराज्यचे प्रतिनिधी उमेश जेथलिया यांच्यावर गुरूवारी ( दिनांक 26-06-14 रोजी ) हल्ला कऱण्यात आला.यापुर्वी देखील जेथलिया यांच्यावर हल्ला करण्यात आला होता.जेथलिया यांनी याची तक्रार माजलगाव पोलिसात दाखल केली आहे.


28जून2014

पुणे जिल्हयातील देवगाव येथील घोडनदीच्या पात्रात वाळू उपसा कऱणाऱ्या वाळूमाफियाकडून झी-24 तासचे साईदीप ढोबळे यांना मारहाण,धक्काबुक्की 


10 जुलै 2014

अभिनेता सलमानखान याच्या किक चित्रपटाच्या निमित्तानं आयोजित एका कार्यक्रमात सलमानच्या बॉडीगार्डची छायाचित्रकारांना धक्काबुक्की.सलमानवर छाय़ाचित्रकारांचा बहिष्कार.त्यानंतर सलमानची नोकरी घालविण्याची धमकी.



25 जुलै 2014

साहसिकचे संपादक रवी कोटंबकर यांच्यावर एका मंत्र्यांचे पीए पवन गोसेवाडे यांनी हल्ला केला.संपादक जखमी झाली आहेत.


27 जुलै 2014

शेगाव ( टीम बातमीदार ) अकोला जिल्हयातील शेगाव येथील मातृभूमीचे वातार्हर देवानंद उमाले ायंच्यावर काल शेगाव येथे जीवघेणा हल्ला झाला.काही दिवसांपूवीर् उमाले यांनी स्थानिक काही पुढाऱ्यांच्या विरोधात बातमी छापली होती.त्यातून हा हल्ला झाल्याचा आरोप उमाले यांनी केला आहे.सात-आठ हल्लेखोऱ आले आणि त्यांनी अचानक हल्ला केला.हा हल्ला झाला तेव्हा स्थानिक पत्रकार कृष्णा म्हस्के,दिनशे महाजन,मंगेश ढोले आदि पत्रकार होते.हल्ल्यात उमाले यांच्या डोक्याला .मानेला मार लागला असून त्यांच्यावर रूगण्लायत उपचार करण्यात आले आहेत.


18 August 2014

वर्तमानपत्रात दिलेल्या जाहिरातीच्या बिलाची वारंवार मागणी करूनही ती न देणाऱ्या कॉग्रेसच्या एका माजी पदाधिकाऱ्याने वैजापूर तालुक्यातील गारज येथील पत्रकार बाबासाहेब पवार यांना यांना मोबाईलवरून जीवे मारण्याची धमकी दिली आहे.धमकी देणाऱ्या पुढाऱ्याचं नाव निवृत्ती मच्छिंद्र बारसे असे असून तो कॉग्रेस सेवा दलाचा माजी अध्यक्ष होता


22 August

पनवेल येथील दैनिक कर्नाळा मध्ये बातमी छापल्याच्या आरोपावरून संपादक प्रफुल्ल फडके यांच्या विरोधात ऍट्रासिटीचा गुन्हा दाखल कऱण्यात आला.स्थानिक कॉग्रेस नेते प्रकाश बिनेदार यांनी ही तक्रार केली होती.


24 August

शेगाव येथील स्थानिक जेष्ठ पत्रकार विजय मिश्रा यांना काल ( २१ ऑगस्ट ) एका पोलिस कर्मचाऱ्याच्या मुलाने मारहाण केली. प्रवीण बोदडे आणि एका युवकाने मिश्र यांना विनाकारण मारहाण केली आहे. एका महिन्यात पत्रकारांना मारहाण होण्याची दुसरी घटना आहे. काही दिवसापूर्वी शेगावच्या पत्रकार देवानंद उमाले आणि एकाला मारहाण करण्यात आली होती. या प्रकरणाची पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे. 


30 August14

धानोरा येथील पत्रकार अल्लऊद्दीन लालानी यांना पोलिस निरिक्षक वैभव माळी यांनी बेदम मारहाण करीत जनावारांसारखे गाडीत कोंबले आणि त्यानां पोलिस ठाण्यात घेऊन गेले.एका मुख्याध्यापकाने लालानी यांनी आपल्या विरोधात वर्तमानपत्रात बदनामी करून पैश्याचा तगादा लावला अशी तक्रार केली होती.या तक्रारीनंतर माळी लालानी यांच्या दुकानात गेले.त्यांना गाडीत कोंबले.याचा विरोध करण्यासाठी मग जनता रस्तयावर आली.त्यामुळं त्यांची बदली केली गेली.


09 0ct 2014

डियन एक्प्रेसचे छायाचित्रकार प्रशांत नाडकर यांना काल पोलिसांनी धक्काबुक्की केली.सोनिया गांधी यांच्या सभेच्या वेळेस कोल्हापुरात ही घटना घडली.पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती या घटनेचा निषेध करीत आहे


12 ऑक्टोबर 2014

लोणी काळभोर येथील पत्रकार सीताराम लांडगे यांना पोलिस निरिक्षक अभिमान पवार यांनी अऱेरावीची भाषा करून खुनाची धमकी दिली.


7nov2014

पनवेलमध्ये महिला पत्रकारावर प्राणघातक हल्ला 

पनवेल येथील कर्नाळा टीव्हीच्या महिला पत्रकार चेतना वावेकर यांयावर आज सकाळी पनवेल येथे काही गुंडांनी प्राणघातक हल्ला केला.त्यात वावेकर यांना गंभीर दुखापत झाली असून एका खासगी इस्पितळात त्यांच्यावर उपचार करण्यात आले. या संबंधिची तक्रार  पोलिसात नोंदविण्यात आली असून पोलिसांनी एका आरोपीस ताब्यात घेतल्याचे समजते.


8 Novembr 2014

पनवेल येथील महिला पत्रकार चेतना वावेकर याच्यावर झालेल्या हल्ल्याने महाराष्टा्रातील मिडिया जगत संतप्त असतानाच काल रात्री पुणे येथील पुण्यनगरीच्या पत्रकार अश्विनी सातव-डोके यांच्या घरावर काही समाजकंटकांनी हल्ला क रून दङशत निर्माण करण्याचा प्रय़त्न केला आहे.या हल्ल्यात अश्विनीच्या आई आणि 75 वर्षांच्या आजींना धक्काबुक्की  झाल्याचे सांगितले जाते.हल्ला झाला तेव्हा या दोघीच घरात होत्या.या प्रकरणी तक्रारीत आरोपींची नावे दिली असली तरी अद्याप कोणाला अटक झालेली नाही.घरगुती वादातून हा हल्ला झाला असला तरी सभ्य समाजात अशा हल्ल्यानंा स्थान नसल्याने पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती या घटनेचा निषेध करीत  आहे.


8 नोव्हेंबर 2014

कोल्हापूरमधील पत्रकार सुखदेव श्यामराव गिरी,बाळासाहेब मारोती पाटोळे,शशी बिडकर,आणि अमोल माळी यांना पल्स पॉलिसीच्या संदर्भात बातमी दिल्यामुळे एजंटांची जिवेमारण्याची धमकी.अजामिनपात्र गुन्हा दाखल


12 नोव्हेंबर 2014 

नागपूर येथील हिंदी दैनिक भास्करच्या कार्यालयावर दिनांक 12 नोव्हेबंर 14 रोजी हल्ला करण्यात आला.ख्रिश्चन समाजाच्या 50-60 जणांच्या टोळक्यानं हा हल्ला केल्याचे सांगितले जात आहे.या हल्ल्यात कार्यालयातील साहित्याची मोठी हानी झाली तसेच पत्रकारांना मारहाण केली गेली.


17नोव्हेंबर 2014 

खामगा-बुलढाणा जिल्हयातील खामगाव येथील दैनिक  लोकोपचारचे संपादक काका रूपारेल यांच्याघरावर  17च्या रात्री अज्ञात इसमांनी हल्ला करून त्यांच्या हत्येचा प्रय़त्न्‌ केला.

काका रूपारेल यांनी याबाबतची तक्रार शहर पोलिसात दिली असून अवैध्य धंद्यावाले किंवा कॉग्रेसच्या कार्यकत्यार्ंनी आपल्या घरावर हल्ला केला असल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे.रूपारेल यांनी अवैद्य धंद्याचय विरोधात सातत्यानं लिखाण केल्याने त्यांच्यावर यापुर्वी देखील हल्ला झाला होता.


18 नोव्हेंबर2014 

परभणी येथील गावकरीचे प्रतिनिधी मोहसिन खान यांच्यावर अज्ञात गुडांनी हल्ला केला.पोलिसाच्या प्रेस नोटच्या आधारे तडीपार केल्या गेलेल्या गुडांची नावं छापली गेल्याच्या रागातून हा हल्ला केला गेला आहे.मोहसिन खान याच्या पायाला,डोक्याला मार लागला आहे.



21 नोव्हेंबर 2014

नंादेड जिल्हयातील लोहा -कुंडलवाडी येथील पत्रकार आणि कुंडलवाडी अखिल भारतीय पत्रकार संघाचे अध्यक्ष,लोकमत समाचार या हिंदी दैनिकाचे प्रथिनिधी संतोष मेहकर यांच्यावर 20 रोजी हल्ला केला गेला.

29-11-2014

जीवन न्यूज वाहिनीचे श्रीगोंदा येथील प्रतिनिधी संतोष भागवत यांच्यावर राष्ट्रीय समाज पक्षाचा अध्यक्ष बाळासाहेब नाहाटा यांनी हल्ला केला.भागवत जाहिरातीचे पैसे मागायला गेले असता हा हल्ला केला गेला.पोलिसांत तक्रार दाखल केली गेली आहे.


29-11-2014

मेरा भारत समाचार या वाहिनीच्या रत्नागिरी येथील ब्युरो चीफ मयुरी सुपल यांच्या घरावर हल्ला.रत्नागिरी जवळच्या नाचणे गावातील ग्रामपंचायतीने त्यांचा गडगा तोडला होता.त्याची तक्रार त्यांनी पोलिस अधीक्षकांकडे केल्यामुळे संतापून काही हितसंबंंधियांनी हा हल्ला केला आहे.तक्रार दाखल 


अपहरण  29-11-14

मुंबई येथील पत्रकार अनिल जोशी यांचे अपहरण.49 हजार लुटून चेंबुरला निर्जन टिकाणी सोडला.दोघांंंंंना अटक .माटुंगा पोलिसात तक्रार

30 Nov 2014

ABP माझा चे प्रतिनिधी सागर वैद्य यांच्या वर प्राणघातक हल्ला ..मुजोर रिक्षाचालका सह मद्यपींचा भरचौकात धुडगूस,वाहातुक पोलिसला धक्का बुक्की..मध्यस्थी करणाऱ्या IBN लोकसमतचे कँमरामन हेमंत बागुल यांनाही मारहाण करीत त्याच्या हातातील सोन्याचे ब्रेसलेट घेऊन टोळक्याने हिसकावू पलायन केले .


05-12-14

बीड येथील पत्रकार दिनेश लिंबकर यांना पोलिसांची मारहाण


08-12-14

आज आणखी एका पत्रकारावर राज्यात हल्ला झाला तर अन्य एका ठिकाणी पोलिसांनी पत्रकाराला धक्काबुक्की केली.पहिली घटना रायगड जिल्हयातील खोपोलीतली आहे.पत्री सरकार या साप्ताहिकाचे संपादक सचिन यादव यांना सुरभी ज्वेलर्स चे मालक महेंद्र थोरवे आणि ज्वेलर्स असोसिएशनच्या अध्यक्षांनी मारहाण केली


08-12-14

दुसरा प्रकार बीड जिल्हयातील वडवणीत घडला.पत्रकार भैय्यासाहेब तागडे अतिक्रमण विरोधी मोहिमेची छायाचित्रं काढत असताना त्यांना पोलिसांनी दमदाटी केली.त्यांना धक्काबुक्कीही करण्यात आली.


12-12-14

पवईतील आयआयटीच्या कार्यक्रमाच्या वेळेस आयोजक आणि विद्यार्थ्यांची माध्यमांच्या प्रतिनिधीना धक्काबुक्की.या कार्यक्रमास सचिन तेंडूलकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होता.

१३-१२-१२

बीड जिल्हयातील पाटोदा येथील पुण्यनगरीचे प्रतिनिधी अमिर शेख यांच्यावर गावगुंडानं भ्याड हल्ला केला आहे.त्यात शेख गंभीर जखमी झाले आहेत.हल्लेखोर राष्ट्रवादीशी संबंधित असल्याचं समजतं.

13-12-14

औरंगाबाद येथील आयबीएन-लोकमतचे सिध्दार्थ गोदाम यांच्यावर सिद्दीकी नावाच्या पीएसआयने शासकीय कामात अडथळा आणला या कलमाखाली खोटा गुन्हा दाखल करून त्यांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न केल.

13-12-14

मिड-डे चे पत्रकार शिरीष वाकटानिया यांच्यावर काल रात्री काही समाजकंटकांनी हल्ला केला.शिरीष आपल्या कुटुंबासमवेत गाडीतून जात असताना एक गाडी अचानक त्याच्या गाडीसमोर लावली गेली.आणि त्यांना शिविगाळ करीत त्यांच्यावर हल्ला केला गेला.तसेच जिवे मारण्याची धमकी दिली आहे.या संदर्भात कांदिवली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

17 डिसेंबर 2014

बीड जिल्हयातील पाटोदा येथील पुण्यनगरीचे वार्ताहर अमिर शेख यांच्यावर प्राणघातक हल्ला.पाटोद्यावरून जामखेडकडे दुचाकीवरून जात असताना विक्रम गर्जे यांनी हा हल्ला केला.बातम्या देतोस काय भडव्या अशा शिव्या देत हा हल्ला झाल्याचे शेख यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

24 डिसेंबर 2014

सोलापूर जिल्हयातील टेंभुर्णीत घडली.टेंभुर्णीचे एकमतचे वार्ताहर प्रवीण तुपसौंदर यांच्यावर आज गावातील एका जुगार किंगने भरचौकात हल्ला केला.या घटनेची तक्रार पोलिसांत देण्यात आली असून आरोपी फरारी आहेत.

24 डिसेंबर 2014

गोकुळनीती दैनिकाचे संपादक अर्पण गोयल यांच्यावर काल रात्री तीन व्यक्तिंनी हॉकीस्टिकने हल्ला केला.त्यात ते गंभीर जखमी झाले असून या प्रकराणाची फिर्याद कदीम पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.आरोपी फरार आहेत.गेल्या दोन दिवसातला हा दुसरा हल्ला असून भाजप युती सरकार सत्तेवर आल्यानंतरचा 23 वा हल्ला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here