परभणीः सेलू येथील पत्रकार दिलीप डासाळकर यांना काल झालेल्या मारहाणीचे तीव्र पडसाद परभणी जिल्हयात आणि राज्यात उमटत आहेत.परभणी जिल्हयातील अनेक तालुक्यात या हल्ल्याचा निषेध करण्यात आला.परभणी जिल्हा पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्यावतीने आज जिल्हा पोलीस प्रमुखांची भेट घेऊन त्यांना या हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली.हल्लेखोरांना त्वरित जेरबंद केले जावे अशी विनंती निवेदनात करण्यात आली आहे.प्रा.नाईकवाडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज एसपींची भेट घेतली.दरम्यान कालच्या घटनेचा गुन्हा सेलू पोलिसात दाखल करण्यात आला आहे.
राज्यातील पत्रकारांनी आज पुन्हा एकजुटीचे दर्शन घडवत कायदा झालाच पाहिजेसाठीचा आपला आवाज अधिक बुलंद केल्याचे दिसले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here