पत्रकाराचा आवाज आपोआप बंद होईल … ‘त्याला बदनाम करा’..

माध्यम स्वातंत्र्याच्या बाबतीत भारत जगातील 180 देशांमध्ये 130 व्या स्थानावर आहे.दर वर्षी हा स्तर आणखी घसरत चाललेला आहे.भारतात लोकशाही असली तरी माध्यम स्वातंत्र्याचा संकोच मोठ्या प्रमाणात सुरूय.पत्रकारांवरचे ‘हमले’ ही आम गोष्ट झालीय.धमकी दिली गेली नाही असा पत्रकार सापडणे कठीण आहे.पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल करून त्याला पोलीस स्टेशनच्या आणि कोर्टाच्या चकरा मारायला लावणे ही आम गोष्ट झालेली आहेपत्रकारावर शंभर कोटीचे अब्रुनुकसानीचे दावे दाखल करून त्यांची बोलती बंद करण्याचा प्रयत्न करणे,.पत्रकारांना टॉर्चर करण्याचा आणखी एक जालिम उपाय हितसंबंधियांनी शोधून काढला आहे.फेसबुकवर पत्रकाराच्या प्रत्येक पोस्ट ट्रोल करून त्यावर गलिच्छ भाषा वापरील जात आहे.हे सारं कमी होतं म्हणून की काय आता पत्रकारांना बदनाम करून त्याचं जगणं हराम करण्याची कारस्थानं जोरात सुरू आङेत.गावा-गावातील पत्रकारांना तर दररोज अशा प्रकारांचा सामना करावा लागतोच पण देशपातळीवर काम करणार्‍या दोन पत्रकारांना कश्याप्रकारे या बदनामीच्या मोहिमेला सामोरं जावं लागलं ते पाहणं आवश्यक आहे.

एनडीटीव्हीचे पत्रकार रविशकुमार हे सातत्यानं व्यवस्थेच्या विरोधात,नरेंद्र मोदींच्या विरोधात बोलत असतात.मुलाखती देत असतात,लिहित असतात.एप्रिलच्या शेवटच्या आठवडयापासून त्यांना धमक्या यायला सुरूवात झाली.एप्रिललमध्ये ते आजारी असल्यानं घरीच होते.त्यांच्या् मोबाईलवर देश-विदेशाचे नंबर असलेल्या मोबाईलवरून फोन येऊ लागले.त्यांवरून अश्‍लील भाषेत शिविगाळ केली जाऊ लागली.आई,पत्नी,मुलीच्याबद्दल अत्यंत आक्षेपार्ह भाषा वापरली जाऊ लागली.तू हिंदू विरोधी आहेस ,पाकिस्तानचा दलाल आहेस अशा शब्दात त्याना शिविगाळ होऊ लागली.यापेक्षाही भयंकर बाब पुढं आली ती म्हणजे दिल्लीत झालेल्या एका बलात्काराच्या घटनेचं समर्थन रविशकुमार करीत असल्याची पोस्ट त्यांच्या नावानं व्हायरल केली गेली.त्याची बदनामी करणार्‍या इतरही पोस्ट व्हायरल झाल्या.शिवाय डॅनियल नावाच्या पत्रकाराची जशी हत्त्या आयसीसने केली तशीच तुझी अवस्था होईल असंही त्यांना धमकावलं गेलं.एका बहाद्दरानं तर एनडीटीव्हीत येऊन तुझा काटा काढतो अशी धमकी फोनवरून दिली ते सारं रेकॉर्ड झालंय.रविशकुमारांचे फोन दिवस-रात्र खणखणत असतात.एक ब्लॉक केला तर दुसर्‍या नंबरवरून फोन येतो..पत्रकाराला त्रस्त करून सोडायचं आणि त्यानं आपली भूमिका बदलावी म्हणून त्यावर दबाव आणायचा असा हा प्रकार आहे.

बदनामीच्या या मोहिमेतून महिला पत्रकारही सुटलेल्या नाहीत.राणा अय्युब हे त्याचं ताजं उदाहरण.त्यांच्या विरोधात तर अत्यंत आक्षेपार्ह,संतापजनक आणि निषेधार्ह अशीच बदनामीची मोहिम सुरू आहे.22 एप्रिल रोजी  एक ट्टिव्ट आलं त्यात राणा अय्युब या चाइल्ड रेपिस्टला सपोर्ट करतात असं म्हटलं गेलं. तर दहा हजार लोकांनी हे ट्टिट री ट्टिट केलं.यावरून मग त्यांच्या विरोधात हेट  कॅम्पेन सुरू झालं.त्यांना मग धमक्या येऊ लागल्या..गँगरेप करण्याच्या ..पाकस्तिानात रवानगी करण्याच्या..एवढंच नव्हे तर त्यांच्या छायाचित्राचा गैरवापर करून ते अश्‍लिल बनविले गेले आणि ही अश्‍लिल छायाचित्रं फेसबुक,इन्स्ट्राग्राम,ट्टिटर साऱख्या सोशल मिडियावरून मोठ्या प्रमाणावर व्हायरले केले गेले.त्या चित्रावरून तुझ्यावर बलात्कार केला गेला असल्याच्या पोस्ट सुरू झाल्या एवढंच नव्हे तर ‘राणा अय्युब याचं छायाचित्र टाकून मै अ‍ॅव्हलेबल हू’ अशी पोस्ट व्हायरल केली गेली.त्यावर राणा अय्युब यांचा फोन नंबर दिला गेला.मग त्या फोनवर हजारो कॉल येऊ लागले..’रेट काय’? अशी विचारणा केली जाऊ लागली.त्यामुळं राणा अय्युब याचं जगणं असह्य झालं.हे सारं त्या व्यवस्थेच्या विरोधात बोलतात ,लिहितात म्हणून..राणा यांना ज्या पध्दतीनं टॉर्चर केलं जातंय ते पाहून त्याची युनाटेड नेशनं दखल घेतली असून राणा अय्युब यांना संरक्षण द्यावं अशी सूचना भारत सरकारला करण्यात आली आहे.

या दोन्ही घटना पुरेश्या बोलक्या आहेत.सरकारच्या विरोधात,कोणत्या विचारणसरणीच्या विरोधात आवाज व्यक्त करण्याची मुभा या लोकशाही देशात नाही असाच याचा अर्थ होतो.बदनामीच्या या मोहिमेमुळं लोकांच्या मनात त्या व्यक्तीबद्दल संशय निर्माण होतो,त्याच्या भूमिकेबद्दल आणि विचारांबद्दल शंका वाटायला लागते अशी व्यक्ती आपोआपच समाजाच्या मनातून उतरते.त्यातून आपलं काम सोपं होतं ही या मोहिमेमागची कार्यपध्दती आहे.ती धोकादायक तर आहेच पण त्याचबरोबर ती लोकशाही व्यवस्थेलाही मारक असल्यानं याला विरोध झालाच पाहिजे.मागे एका राजकीय पक्षाच्या नेत्यानं एका मराठी वाहिन्ीीच्या विरोधात अशीच जातीयवाचक बदनामीची मोहिम उघडली होती.महाराष्ट्रातील सूज्ञ प्रेक्षकांनी या मोहिमेकडं लक्ष दिलं नसलं तरी पत्रकारांना नामोहरण करण्याचं नवं हत्यार हितसंबंधियांनी शोधून काढलंय हे स्पष्ट झालं आहे.महाराष्ट्रातही अनेक पत्रकारांच्या विरोधात ते खंडणीखोर आहेत,हाप्ते घेतात,दलाली करतात,ब्लॅकमेल करतात अशा अर्थाच्या पोस्ट व्हायरल केल्या जातात.माध्यमातील व्यक्ती असं करीत असेल तर त्याचं समर्थन कोणीच करणार नाही पण अशा व्यक्तींना मग सरळ पोलिसांच्या हाती का दिलं जात नाही हा प्रश्‍न आहे.मात्र केवळ पत्रकाराची जनमानसातील प्रतिमा मलिन करण्याच्या उद्देशानंच अशा मोहिमा चालविल्या जात आहेत.सर्व पत्रकारांनी एकत्र येत या मोहिमा हाणून पाडल्या पाहिजेत..अशा पोस्टला तेवढ्याच निर्धारानं उत्तरं दिली गेली पाहिजेत.पत्रकारांची ही बदनामी देशाला आणि लोकशाहीला परवडणारी नाही.

3 COMMENTS

 1. या षड़यंत्रात आपल्याच प्रतिस्पर्धी लोकांचा मोठा समावेश आहे व त्याविषयी कोणी बोलत नाही. आपल्याला विचाराने व कृतीने ज्यांचा सामना करता येत नाही, असे आपलेच लोक यात सहभागी होऊन गेम करू लागले आहेत….

  • भांडण पत्रकारांच…
   आणि
   बदनाम सरकार…आग रामेश्वरी… बंब सोमेश्वरी…

 2. रवीश दोषी नसेल तर सुटेलच….कोब्रा ने fake news
  दिल्या हे ही तितकेच खरे आहे

LEAVE A REPLY