114 आमदारांचा पाठिंबा

0
827
पत्रकारांच्या मागण्यांना 114 खासदार,आमदारांचा पाठिंबा,
पत्रकारांचे उद्या एसएमएस भडिमार आंदोलन 
मुंबई दिनांक 14 ( प्रतिनिधी) निवृत्त पत्रकारांना पेन्शन सुरू करावी आणि पत्रकारांना संरक्षण देणारा कायदा करावा अशी मागणी महाराष्ट्रातील सात खासदार आणि 107 आमदारांनी लेखी पत्रांव्दारे मुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीकडे जमा झालेली लोकप्रतिनिधींची  ही पत्रे उध्या मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक तथा मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष एस.एम.देशमुख यांनी दिली आहे.दरम्यान आपल्या मागण्या सरकारच्या कानी घालण्यासाठी राज्यभरातील हजारो पत्रकार उध्या मुख्यमंत्री तसचे दोन्ही विरोधी पक्ष नेत्यांवर एस एम एस चा भडिमार कऱणार आहेत.राज्यभरातून किमान पंधरा हजार एस एम एस मुख्यमंत्र्यांना पाठविले जात आहेत.या दोन्ही अनोख्या आंदोलनाची चर्चा महाराष्ट्रभर सुरू आहे.
पत्रकार पेन्शन आणि पत्रकार सुरक्षा कायद्याच्या मागणीसाठी राज्यातील पत्रकार गेली दहा वर्षे पाठपुरावा करीत आहेत.मात्र सत्तेवरील प्रत्येक सरकारने यासंदर्भात पत्रकारांचा भ्रमनिराश केला आहे.विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याच अधिवेशनात पेन्शनचा विषय मार्गी लावण्याची घोषणा केली असली तरी पत्रकार सुरक्षा कायदाही याच अधिवेशनात मार्गी लागला पाहिजे अशी पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीची भूमिका आहे.त्यासाठी समितीने राज्यातील आमदार,खासदारांना पत्रकारांच्या मागण्यांना लेखी पाठिंबा देण्याचे आवाहन केले होते.या आवाहनास लोकप्रतिनिधींकडून उदंड प्रतिसाद मिळाला.विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील,राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या सह सात खासदार आणि 107 आमदारांनी पत्रकारांच्या मागणीस लेखी समर्थन दिले आहे.यामध्ये दोन राज्यमंत्र्यांचा आणि महामडंळाच्या एका अध्यक्षाचाही समावेश आहे.पत्रकारांच्या मागणीस समर्थन देणारे आमदार सर्वपक्षीय असून गडचिरोली पासून रत्नागिरी आणि धुळ्यापासून कोल्हापूरपर्यंतच्या आमदारांनी पत्रकार पेन्शन आणि पत्रकार सुरक्षा कायदा झाला पाहिजे अशी भूमिका घेतली आहे.पत्रकारांच्या मागणीस पाठिंबा दिल्याबद्दल एस.एम.देशमुख यांनी सर्व लोकप्रतिनिधींचे आभार व्यक्त केले असून उध्याचे एसएमएस पाठवा आंदोलन यशस्वी कऱण्याचे आवाहन राज्यातील पत्रकारांच्या सर्व संघट ना आणि पत्रकारांना केले आहे.

पत्रकारांच्या मागणीस पाठिंबा देणार्‍या आमदार महोदयांची नावे पुढील प्रमाणे आहेत.

राज्य मंत्री 

1) मा . ना . श्री . दादा भुसे

2) मा . ना . श्री  दिलीप कांबळे

३)  मा .आं .  श्री रविकांत तुपकर ( महामंडळ )

खासदार                                                                      

४) मा . खासदार श्री . चंद्रकांत खैरे ( औरंगाबाद)

५) मा . खासदार श्री .  हेमंत गोडसे ( नाशिक)

६) मा . खासदार श्री .  हऱिश्‍चंद्र चव्हाण ( दिंडोरी )                                                                              

 ७) मा . खासदार श्री . दिलीप गांधी ( नगर जिल्हा.

८) मा . खासदार श्री . प्रताप जाधव  ( बुलढाणा )

९) मा . खासदार श्री .  चिंतामण वाणगा  (पालघर )

१०) मा . खासदार श्री . अशोक नेते  (गडचीरोली 

आमदार 

11) मा . आं . श्री . राधाकृष्ण विखे पाटील      ( विरोधी पक्ष नेते                               

12 मा . आं . श्री . सुनिल तटकरे    (राष्ट्रवादी अध्यक्ष )                                       

1३) मा . आं . श्री . छगन भुजबळ                                                                                

१४) मा . आं . श्री . दिलीप वळसे पाटील ( आंबेगाव)                  

१५) मा . आं . श्री . संजय केळकर                                                                      

१६) मा . आं . श्री .प्रशांत ठाकू र ( पनवेल )                                                                      

१७) मा . आं . श्री .सुरेश लाड (कर्जत)

१८) मा . आं . श्री .पांडूरंग महादू बरोरा ( शहापूर )

१९) मा . आं . श्री .शांताराम तुकारा मोऱे ( भिवंडी)

२०) मा . आं . श्री .राहूल कुल ( दौड)

२१) मा . आं . श्री .गोवर्धन शर्मा ( अकोला)

2२) मा . आं . श्री .रणधीर सावरकर ( अकोला पूर्व)

२३)मा . आं . श्री . प्रकाश पाटील भारसाळकर ( अकोट)

२४) मा . आं . श्री .बळीराम सिरसकर ( बाळापूर)

२५) मा . आं . श्री .आमदार गोपीकिसन बजोरिया ( विधान परिषद)

२६) मा . आं . श्री . डी.पी सावंत ( नांदेड)

२७) मा . आं . श्री . हेमंत पाटील ( नांदेड)

२८) मा . आं . श्री . प्रताप पाटील चिखलीकर ( कंधार )

२९) मा . आं . श्री . हर्षवर्धन सपकाळ ( बुलढाणा)

३०) मा . आं . श्री .आनंद राजेंद्र ठाकूर ( डहाणू)

३१) मा . आं . श्री .राजेंद्र साळवी ( राजापूर )

३२) मा . आं . श्री .आ.संजय कदम ( दापोली)

३३) मा . आं . श्री .आमदार देवयाणी फरांदे,

३४) मा . आं . श्री . सदानंद चव्हाण (चिपळूण)

3५)मा . आं . श्री . डॉ.सुधीर भास्कर तांबे

३६)  मा.आ. श्री.  असिफ शेख               ( मालेगाव)  

३७) मा . आं . श्री .बाळासाहेब महादू सानप

३८) मा . आं . श्री .अपूर्व प्रशांत हिरे

३९) मा . आं . श्री . हरिष मारोती अप्पा पिंपळे) मुर्तीजापूर

४०) मा . आं . श्री .सुधीर मेघे ( हिंगणे)

४१) मा . आं . श्री .उदय सामंत ( रत्नागिरी)

४२) मा . आं . श्री . राहूल सिध्दविनायक बोंद्रे ( चिखली)

४३) मा . आं . श्री .रविकांत तुपकर ( बुलढाणा जिल्हा)

४४) मा . आं . श्री . संदीपान पाटील भुमरे ( पैठण)

४५) मा . आं . श्री . हितेंद्र ठाकूर

४६) मा . आं . श्री .जे.पी.गावित ( सुरगणा)

४७) मा . आं . श्री . प्रताप सरनाईक ( ठाणे)

४८) मा . आं . श्री . संग्राम थोपटे

४९) मा . आं . श्री .लक्ष्मण पवार ( गेवराई )

५०) मा . आं . श्री .राजाभाऊ वाजे (सिन्नर )

५१) मा . आं . श्री .हरिश्‍चंद्र पवार ( दिंडोरी)

५२) मा . आं . श्री .योगेश बबन घोलप( देवळाली)

५३) मा . आं . श्री .नरहरी वामन शिरवाळ

५४) मा . आं .      सीमा हिरे (नाशिक )

५५) मा . आं . श्री   राजन साळवी,

५६) मा . आं . श्री . योगेश बबनराव घोलप,

५७) मा . आं . श्री .अमित सुभाषराव झनक,

५८) मा . आं . श्री . राहूल पाटील,

5९) मा . आं . श्री ..विजय भांबळे,

6०) मा . आं . श्री ..मधुसुदन केंद्रे,

६१) मा . आं . श्री ..मोहन फड,

६२) मा . आं . श्री ..बाबाजानी दुराणी

६३) मा . आं . श्री . प्रा.डॉ.अपूर्व प्रशांत हिरे,

६४) मा . आं .       निर्मला रमेश गावित,

६५) मा . आं . श्री .बाबुराव काशीनाथराव पाचर्णे,

६६) मा . आं . श्री . सदानंद नारायण चव्हाण

६७) मा . आं . श्री . अमरसिंह पंडित

६८) मा.  आ.  श्री. अनिल कदम                   ( निफाड )

६९) मा . आं . श्री .उन्मेश पाटील (चाळीसगाव)

70) मा . आं . श्री .उदेसिंह पाडवी ( शहदा)

71) मा . आं . श्री .चंद्रकांत रघुवंशी ( नंदूरबार )

72) मा . आं . श्री .  विलास तरे ( भाईसर)

73) मा . आं . श्री .सुरेश नामदेव गोरे

74) मा . आं . श्री .अमित झनक( रिसोड)

75) मा . आं . श्री .आर.टी.देशमुख ( माजलगाव)

76) मा . आं . श्री .संग्राम पाटील

77) मा . आं . श्री .सुभाष भोईर ( कल्याण)

78)  मा . आं . श्री अमित घोडा ( पालघर )

79) मा . आं . श्री .अऱूण जगताप

 80) मा . आं . श्री . पंकज भुजबळ 

81) मा . आं . श्री .सुभाष गणू भोईर ( कल्याण)

82) मा . आं . श्री .राजेश क्षीरसागर ( कोल्हापूर उत्तर )

83) मा . आं . श्री .पास्कल धनारे ( डहाणू )

84)  मा . आं . श्री .भाऊसाहेब पाटील चिकटगावकर ( वैजापूर)

85) मा . आं . श्री .अमल महादेव महाडिक ( कोल्हापूर दक्षिण)

86) मा . आं .       संगीता ठोंबरे ( केज )

87) मा . आं . श्री .भरत गोगावले ( महाड)

 88) मा . आं . श्री . महेश किसना लांडगे ( पिंपरीःभोसरी)

89) मा . आं . श्री .धैर्यशील पाटील ( पेण)

90) मा . आं . श्री .गौतम चाबुकस्वार 

91) मा . आं . श्री .लक्ष्मण जगताप ( चिंचवड)

92) मा . आं . श्री .संतोष टारफे ( कळमनुरी )

93) मा . आं . श्री .तानाजी  मुटकुळे 

94 ) मा . आं . श्री .तुषार गोविंदराव राठोड (मुखेड-कंधार ) 

95) मा . आं . श्री . देवराव होळी ( गडचिरोली)

 96) मा . आं . श्री .) अमर राजूरकर ( नांदेड)

९७) मा . आं . श्री .संदीपान घुमरे ( पैठण)

 ९८) मा . आं . श्री . क्षितीज ठाकूर
 ९९) मा . आं . श्री .भीमराव तापकीर ( खडकवासला)

१००)  मा.आ.श्री. दत्तात्रय भरणे ( इंदापूर )

१०१) मा.आ. श्री.  मनोहर गजानन भोईर    ( उरण)

१०२) मा.आ.श्री.  वसंत बळवंत चव्हाण      (नायगाव,नांदेड)

१०३) मा.आ.श्री.  जयवंतराव जाधव          (नाशिक )

१०४) मा,आ.श्री. राहूल दौलतराव आहेर     ( चांदवड-देवळा)

१०५) मा.आ.श्री.चैनसुख संचेती ( मलकापूर ) 

 १०७) मा.आ.श्रीमती सुमनताई आर.आर.पाटील (तासगाव)

१०८) मा.आ.श्री.जयकुमार गोरे

१०९) मा.आ.श्री.प्रभाकर देवबा घार्गे

११०) मा.आ.श्री.दीपक प्रल्हाद चव्हाण

१११) मा.आ.जयदेव गायकवाड

११२) मा.आ.श्री। शिवेंद्रसिंह भोसले

११३) मा.आ.श्री.योगेश पुंडलिक टिळेकर ( हडपसर)

———————————————————————–

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here