गेवराईतील एका पत्रकाराच्या कुटुंबाला मिळाला आधार
मराठी पत्रकार परिषदेशी जोडला गेलेला कोणताही पत्रकार किंवा त्याचं कुटुंबं आता एकटं,एकाकी नाही.संपूर्ण मराठी पत्रकार परिषद आणि परिषदेशी संलग्न सर्व जिल्हा आणि तालुका पत्रकार संघ त्यांचे सदस्य पत्रकारांच्या पाठिशी आहेत हे सिध्द कऱणारी आणखी एक सुखद आणि स्वागतार्ह घटना आज बीड जिल्हयातील गेवराईत घडली.गेवराई येथील पत्रकार जगदीश बेंदरे यानी काही दिवसांपुर्वीच आत्महत्त्या केली.तरूणपणीच जगदीश अचानक सोडून गेल्यानं सारं कुटुंब हवालदिल झालं.सर्वसामांन्य शेतकरी कुटुंबातल्या जगदीशच्या पाठीमागे एक मुलगा,एक मुलगी,पत्नी असा परिवार आहे.जगदीश हा एकमेव कमावता मुलगा अशा स्थितीत तोच गेल्यानं मोठं संकंट या कुटुंबावर आलं.मात्र पत्रकारांनी केलेल्या आवाहनानुसार अनेक हात जगदीशच्या कुटुंबाच्या मदतीसाठी पुढे आले.स्थानिक नेते अमरसिंह पंडित यांनी त्यांच्या दोन्ही मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी तर उचलली.आज गेवराईतील पत्रकारानी वर्गणी करून जगदीशच्या पत्नींला सहा वर्षाचा 41,700 रूपयांचा बॉन्ड दिला आहे.साडेसहा वर्षानंतर याचे 84 हजार रूपये मिळणार आहेत जे की,जगदीशच्या मुलांच्या शिक्षणासाठी उपयोगी पडतील.गेवराई येथील सर्व पत्रकारांचा मराठी पत्रकार परिषदेला सार्थ अभिमान आहे . आपला एक सहकारी गेल्यानंतरही त्यांनी आपलं उत्तरदायीत्व पार पाडलं आहे.तुम्ही एकटे नाहीत आहात याची जाणीव जगदीशच्या कुटुंबाला करून दिली आहे.गेवराई तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष मधुकर तौर,जुनेद बागवान आणि अन्य सर्व सहकार्याना मनापासून धन्वयाद
केवळ सभा,संमेलनं घेणं हेच काही पत्रकार संघटनेचं काम असू शकत नाही.आपल्या परिवाराती मंडळी अडचणीत असेल,कोणी आजारी असेल,कोणाचा मृत्यू झाला असेल किंवा कोणावर हल्ला झाला असेल तर त्याला सर्व प्रकारची मदत कऱणं हे संघटनेचं काम आहे.मराठी पत्रकार परिषद तसेच परिषदेशी जोडले गेलेले जिल्हा आणि तालुका संघ हे काम एक मिशन म्हणून करीत आहेत.’दोन पत्रकार भेटले तरी परस्परांचा व्देष करतात’ ही पुर्वीची भावना आता लोप पावत असून परस्परांना सहकार्य केलेच पाहिजे ही जाणीव पत्रकारांमध्ये वाढीस लागत आहे हे पत्रकार चळवळीचे यश आहे.परिषदेच्या माध्यमातून आतापर्यंत राज्यातील 26 गरजू पत्रकारांना 30 लाख रूपयांपेक्षा जास्त मदत केली आहे.परिषद एक मिशन म्हणून करीत असलेलं हे काम डोळ्यात खूपणारे परिषदेच्या विरोधात कोल्हेकुई करीत असतात पण परिषद गुन्हेगारांनी सुरू केलेल्या अशा कोल्हेकुईकडे लक्ष न देता पत्रकार हिताचे आपले काम करीतच राहणार आहे. बीड जिल्हयातील पत्रकारानी एक चांगला पायंडा पाडला आहे याचा सार्थ अभिमान मला आहे.
आपली परिषद,आपली शक्ती