पत्रकारांचे 23 ला “महामार्ग रोको” 

0
568
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचं बंद पडलेलं काम त्वरित सुरू करावं यामागणीसाठी येत्या 23 तारखेला कोकणातील पत्रकार परत एकदा रस्त्यावर उतरत असून त्या दिवशी महामार्ग रोको आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष विजय पवार ,कार्याध्यक्ष संतोष पेरणे आणि सरचिटणीस भारत रांजनकर यांनी दिली आहे.
मुंबई-गोवा महामार्गाच्या बंद पडलेल्या कामाच्या संदर्भात रायगड प्रेस क्लबने कोकणातील  आमदारांना पत्रे पाठवून हा विषय अधिवेशनात उपस्थित करण्याची विनती केली होती.त्यानुसार काल राष्ट्रवादीचे आमदार भास्कर जाधव यांनी सभागृहात हा विषय उपस्थित केला होता.त्यावर बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज बैठक लावली आहे.त्या निमित्तानं मराठी पत्रकार परिषदेचे सरचिटणीस संतोष पवार आणि रायगड प्रेस क्लबचे कार्याध्यक्ष संतोष पेरणे नागपूरला गेले असून ते भास्कर जाधव तसेच बाधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन त्यांना 23 च्या आंदोलनाबाबत अवगत करणार आहेत.
दरम्यान 23 च्या आंदोलनाच्या तयारीसाठी आज प्रेस क्लबचे अध्यक्ष विजय पवार हे पेण येथे जाऊन तेथील पत्रकारांबरोबर बैठक घेणार घेतील .आंदोलन यशस्वी कऱण्यासाठी पत्रकार तसेच अन्य सामाजिक संस्थांनी सहकार्य करावे असे आवाहन कऱण्यात आले आहे.
कोकणातील पत्रकारांनी एस.एम.देशमुख यांंंंंंच्या नेतृत्वाखाली सतत पाच वर्षे पाठपुरावा केल्यानंतर 2011 मध्ये पळस्पे ते इंदापूूर या 84 किलो मिटरच्या पहिल्या ट्‌प्प्याच्या  रूंदीकरणाच्या कामासा आरंभ झाला. खरं तर हे काम जून 2014 पर्यत पूर्ण  होणं अपेक्षित होतं पण आजपर्यत केवळ 30-32 टक्केच काम पूर्ण झालं आहे.महावीर कन्स्टक्शन आणि सुप्रिम इन्फास्ट्रक्चर या कंपन्यानी वेळेत काम पूर्ण न केल्यानं त्यांना पतपुरवठा कऱणाऱ्या संस्थांनी कर्जाचे पुढील हाप्ते देणे बंद केले आहे.त्यामुळं या दोन्ही कंपन्यांनी आता आपला गाशाच गुंडाळल्यात जमा आहे.राज्यात नवं सरकार सत्तेवर आलं आणि महामार्गाचं काम बंद पडलं यामागं काही काळेबेरे आहे की,तो केवळ योगायोग आहे याची चर्चा सध्या कोकणात सुरू आहे.मात्र काम बंद पडल्याने रस्तयाच्या खर्चाचं बजेट कित्येक पटीनं वाढणार आहे,आणि पुढील टप्प्याचं भवितव्य देखील टांगणीला लागलं आहे.मुंबई-गावा महमार्गावर हाोणा़ऱ्या अपघातात दररोज दीड व्यक्ती बळी पडत असतो तसेच किमान चार जण जखमी होऊन कायमचे जायबंदी होतात.महामार्गावर दररोज सांडणारा हा रक्ताचा सडा थांबावा आणि हा महामार्ग कोकणच्या विकासाचा राजमार्ग ठरावा या भूमिकेतून कोकणातील पत्रकारांनी पुढाकार घेत चौपदरीकरणासाठी आंदोलन छेडले होते.आता पुन्हा एकदा पत्रकारांना रस्त्यावर उतरावे लागत असून या आंदोलनास जनतेने पाठिंबा द्यावा तसेच कोकणातील तीनही जिल्हयातील पत्रकारांनी या आदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन रायगड प्रेस क्लबने केले ेआहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here