अलिबागेत पत्रकारांचा मोर्चा

अलिबाग : लोकसत्ताचे अलिबाग येथील पत्रकार हर्षद कशाळकर यांना शेकाप आमदार जयंत पाटील यांनी केलेल्या मारहाणीचा निषेध करण्यासाठी रायगड जिल्हयातील पत्रकारांनी आज अलिबागमध्ये मोचा॓ काढला होता.. जिल्हयातील बहुसंख्य पत्रकार या मोचा॓त सहभागी झाले होते. पत्रकार भवनापासून निघालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कायाॅलयावर गेला. तेथे एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन आमदार जयंत पाटील यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली..
२३ मे रोजी मतमोजणी कक्षात पत्रकारास मारहाण केल्याबद्दल जयंत पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.. तसेच बेकायदेशीररित्या मतदान कक्षात घुसलषाबददल जयंत पाटील, आमदार पंडित पाटील, आमदार धैर्यशील पाटील, आणि आमदार अनिकेत तटकरे यांच्यावर गुन्हे दाखल झाले असले तरी कारवाई करण्यात आलेली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here