केरळमधील शबरीमला मंदिर प्रवेशावरून सुरू असलेल्या आंदोलनात पत्रकारांना लक्ष्य केले जात आहे.काल चार महिला पत्रकारांना मारहाण झाल्यानंतर आज न्यूयॉर्क टाइम्सच्या महिला पत्रकार सुहासिनी राज आणि त्यांच्या एका पुरूष सहकार्‍यावर हल्ले करण्यात आले.त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.दगडफेक करून त्यांना परत पाठविले गेले.
सुहासिनी राज आणि त्यांचा एक पुरूष सहकारी पंबा येथील डोंगरावर ट्रेकिंग करीत शबरीमला मंदिरापर्यंत पोहोचले.त्यावेळी त्यांना मोठया विरोधाला सामना करावा लागला.त्यांना आंदोलकांनी रोखले.आम्ही मंदिर प्रवेशासाठी नव्हे तर आमचे काम करण्यासाठी आलो आहोत असे वारंवार सागूंनही आंदोलकांनी त्यांना पुढं जाऊ दिलं नाही.नाईलाजास्तव त्याना माघारी फिरावे लागले

LEAVE A REPLY