मराठी पत्रकार परिषदेच्या कार्याध्यक्षपदी
गजानन नाईक तर
सरचि
टणीसपदी अनिल महाजन


मुंबई : 80 वर्षांची देदीप्यमान परंपरा असलेल्या आणि अखिल भारतीय स्तरावर कार्यरत असलेल्या मराठी पत्रकार परिषदेच्या कार्याध्यक्षपदी सिंधुदुर्ग येथील कोकण साद दैनिकाचे संपादक गजानन नाईक यांची तर सरचिटणीसपदी बीड जिल्हयातील धारूर येथील लोकमतचे प्रतिनिधी अनिल महाजन यांची बिनविरोध निवड झाली आहे. निवडणूक अधिकारी म्हणून शरद काटकर आणि सहाय्यक निवडणूक अधिकारी संतोष पेरणे यांनी काम पाहिले . अकोल्याचे ज्येष्ठ पत्रकार सिध्दार्थ शर्मा यांनी यापुर्वीच परिषदेच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली आहेत.
कार्याध्यक्ष आणि सरचिटणीस पदासाठी अनुक्रमे तीन आणि दोन अर्ज दाखल झाले होते. मात्र उमेदवारी मागे घेण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी अन्य उमेदवारांनी आपली नामांकन पत्रे मागे घेतल्याने नाईक आणि महाजन यांची बिनविरोध निवड झाली आहे. तसे अधिकृत पत्र निवडणूक अधिकार्यानी दोन्ही पदाच्या उमेदवारांना दिले आहे.
कोषाध्यक्ष, उपाध्यक्ष आणि विभागीय सचिव पदाच्या नेमणुका लवकरच घोषित करण्यात येतील. कार्याध्यक्ष व सरचिटणीसपदाचा कार्यकाल दोन वर्षाचा असेल.
गजानन नाईक आणि अनिल महाजन यांचे एस. एम. देशमुख, किरण नाईक सिध्दार्थ शर्मा व शरद काटकर यांनी अभिनंदन केले असून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत. नव्या आणि मावळत्या कार्यकारिणीची संयुक्त सभा लवकरच घेण्यात येणार आहे.