पत्रकार सुरेश कराळे यांना एकनाथराव शिंदे यांच्या आरोग्य कक्षाकडून मदत
मराठी पत्रकार परिषदेने
केला होता पाठपुरावा

मुंबई : सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथराव शिंदे यांच्या आरोग्य कक्षाच्यावतीने स्व. माणिक केंद्रे यांच्या कुटुंबियांना आणखी 3 हजारांची मदत आज मुलीच्या खात्यावर वर्ग करण्यात आली आहे..यापुर्वी माणिक केंद़े यांच्या मुलीच्या खात्यावर 48 हजार रूपये वर्ग करण्यात आले होते त्यामुळे एकनाथराव शिंदे यांच्याकडून केंद्रे कुटुंबियांना 51 हजार रूपयांची मदत मिळाली आहे..
मुंबईतील ज्येष्ठ पत्रकार सुरेश कराळे यांची नुकतीच एन्जोप्लास्टी करण्यात आली.. त्यांनाही एकनाथराव शिंदे यांच्या आरोग्य कक्षाच्यावतीने 50,000 रूपयांची मदत मागील आठवड्यात देण्यात आली.. मराठी पत्रकार परिषदेने यासाठी पाठपुरावा केला होता..
मा. एकनाथराव शिंदे आणि या कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांचे मनापासून आभार 🙏 🙏

LEAVE A REPLY