देवमाशावर अंत्यसंस्कार

0
2184

अलिबाग : अलिबागजवळील रेवदंडा समुद्रकिनाऱ्याच्या आसपास काल दिनांक 24 जून रोजी वाहत आलेला 42 फुटी देवमासा आज सकाळी मृत झाल्याने रेवदंडा येथील बीचच्या परिसरात त्याच्यावर जिल्हा प्रशासनाकडून अंत्यसंस्कार करण्यात आले.

काल रोजी रेवदंडा समुद्रकिनारा परिसरात अजस्त्र असा हा देवमासा आढळून आल्याने त्या ठिकाणी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले यांनी तातडीने प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व या देवमाशास परत समुद्रात पाठविण्याबाबत सूचना दिल्या. त्यांच्या मार्गदर्शनात अलिबागचे प्रांत दीपक क्षीरसागर, तहसिलदार व इतर कर्मचारी, तसेच कोस्ट गार्डचे, मत्स्य व्यवसाय विभाग, वन विभाग, पशुवैद्यकीय विभाग, पोलीस विभाग, मेरी टाईम बोर्ड आदी विभागांचे अधिकारी, कर्मचारी यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने क्रेन, मोठे दोरखंड, मोठे जहाज आदींचा वापर करुन या देवमाशाला खोल समुद्रात नेऊन सोडण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. यासाठी उरणच्या नागरी सुरक्षा दलाने विशेष मदत केली. पण हा मासा समुद्रात जाण्यास तयार नव्हता. त्यामुळे हे प्रयत्न अयशस्वी ठरले. शेवटी आज सकाळी हा मासा मृत झाला.

तद्नंतर जिल्हा प्रशासनाच्या वतीने निर्णय घेऊन रेवदंडा बीच परिसरात विशाल असा खड्डा तयार करुन त्यात पशुवैद्यकीय व मत्स्यव्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांच्या सूचनेनूसार रासायनिक पदार्थांचा वापर करुन या माशावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here