*मराठी पत्रकार परिषदेच्या पाठपुरावा*
मदत परिषदेच्या पाठपुराव्याचं फलित
*बीड जिल्हा मराठी पत्रकार परिषदेचे तत्कालीन* जिल्हासरचिटणीस स्व. भास्कर चोपडे कुंटूबियांना राज्य सरकारच्या शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधीतून एक लाख रुपयांची मदत नुकतीच त्यांचे बँक खात्यात वर्ग करण्यात आली असून स्व शंकरराव चव्हाण पञकार कल्यान निधी तून जास्ती जास्त निधी मिळाव या साठी मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त एस एम देशमुख, अध्यक्ष सिध्दार्थ शर्मा, राज्य सरचिटणीस अनिल महाजन, जिल्हाध्यक्ष सुभाष चौरे, सरचिटणीस विलास डोळसे, अधिस्वीकृती समितीचे विभागीय सदस्य अनिल वाघमारे यांनी मदत निधी मिळवून देण्यासाठी लागणारी कागदपत्रे तयार करुन प्रस्ताव सादर करण्यात आला होता.
तसेच सतत पाठपुरावा करून शासकीय मदत मिळवून दिली.
सदरील मदतीचा धनादेश चोपडे कुंटूबियांच्या बँक खात्यात जमा झाले आहे.
तसेच माहिती विभागाचे संचालक यशवंत भंडारे, उपसंचालक इगवेसाहेब, जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांनी याकामी विशेष सहकार्य केले.
जिल्ह्यातील व राज्यातील पञकाराना अडचणीचे काळात त्यांना व त्यांचे कुंटूंबीयाना मदतीचा हात देण्याचे काम मराठी पञकार परीषद करत आहे.

LEAVE A REPLY