दिल खूष हुआ…

0
1732
दिल खूष हुआ.. आज रत्नागिरीला जाताना ठिकठिकाणी मुंबई – गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू असल्याचं दिसलं . हा महामार्ग मृत्यूचा सापळा झाला होता. कोणताही राजकीय पक्ष चौपदरीकऱणावर बोलत नव्हता.. कोकणातील पत्रकारांनी हा विषय हाती घेतला.. २००८ पासून रस्त्यावर उतरून आंदोलनं केली, अटका करून घेतल्या, गुन्हे दाखल झाले.. सतत सहा वर्षे अगदी दिल्लीपर्यंत पाठपुरावा केल्यानंतर २०१४ला रस्त्याला मंजुरी मिळाली.. कामही सुरू झालं.. पण गती येत नव्हती.. पुन्हा रस्त्यावर उतरावे लागले.. २६ जानेवारी १८ रोजी कोकणात एकाच वेळी आंदोलन करण्याचं ठरलं होतं पण त्याची गरज भासली नाही.. सव॓त्र काम जोरात सुरू झालं.. पत्रकारांनी एखादा विषय हाती घेतला आणि सलग त्याचा आठ – दहा वर्षे पाठपुरावा करून प़शन मागीॅ लावलयाचं संयुक्त महाराष्ट्र चळवळीनंतरचं हे एकमेव उदाहरण आहे.. मला या लढयात सहभागी होता आलं, लढयातला एक छोटा सैनिक म्हणून मला भूमिका पार पाडता आली.. काम जोरात सुरू असल्याचं पाहून म्हणूनच मोठा आनंद झाला. काम होत असल्यानं आज अनेक जण श्रेयासाठी धडपडत आहेत.. घ्यावे.. ज्याला श्रेय घ्यायचंय त्यानं घ्यावं.. हमे तो खुषी है.. रस्ता हो रहा है! या महामार्गावर दररोज सरासरी दोघांचे बळी जात होते.. आणि चार जण जायबंदी होत होते.. हा रस्ता 2019 मध्ये पूर्ण होईल तेव्हा मृत्यूचं तांडव थांबलेलं असेल.. पत्रकारांना या पेक्षा जास्त काय हवंय..? . सुरू असलेल्या कामासह सेल्फी घेण्याचा मोह आवरता आला नाही..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here