दिल्लीच्या पूर्वेकडील अशोकनगर भागात एका महिला पत्रकारावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. मिताली चंदोला असं या पत्रकाराचं नाव आहे. शनिवारी रात्री कामावरून घरी जात असताना मिताली यांच्यावर काही अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या.

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, मिताली या नोएडा येथील एका वृत्तवाहिनीत काम करतात. शनिवारी रात्री 12.30 च्या सुमाराला त्या आपल्या गाडीतून अशोक नगर परिसराला पार करून घरी जात होत्या. त्या दरम्यान मागून आलेल्या एका मारुती स्विफ्ट गाडीने ओव्हरटेक करून त्यांची वाट अडवली. वाट अडवून हल्लेखोरांनी त्यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या. त्यांच्या गाडीच्या काचेवर अंडीही फेकली गेली.

या हल्ल्यात मिताली यांच्या हाताला दुखापत झाली आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून आता त्यांच्या प्रकृतीला धोका नाही अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे. ही घटना कौटुंबिक वादातून झाली असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.


सामनावरून साभार

LEAVE A REPLY