दिलीप कांबळेंच्या दमदाटीला आम्ही घाबरत नाहीत हे दाखवून द्या,

थेट कांबळेंना एसएमएस पाठवून त्यांच्या वक्तव्याचा धिक्कार करा 

पत्रकारांनी आम्हाला हवं तेच आणि तेवढंच छापावं अशी सर्वपक्षीय राजकारण्यांची इच्छा असते.दिलीप कांबळे देखील त्याच विचारांचे.विरोधकांची संघर्ष यात्रा एसी गाडीतून फिरत होती, त्यावर पत्रकारांनी हल्लाबोल केला तेव्हा भाजपला गुदगुल्या होत होत्या,आज शिवार संवाद यात्रेचं ढोंग लोकांसमोर आणलं जाऊ लागताच दिलीप कांबळे यांच्यासाऱख्या बोलभांड मंत्र्यांच्या नाकाला मिर्च्या झोंबू लागल्या आहेत आणि ते पत्रकारांना बुटानं मारण्याची भाषा करू लागले आहेत.एका बाजुला मुख्यमंत्री महाराष्ट्रातील पत्रकारांना संरक्षण देणारा कायदा करतात आणि त्याच वेळेस त्यांच्याच मंत्रीमंडळांतील मंत्री पत्रकारांना जोडयानं मारण्याची भाषा वापरतात

हा विरोधाभास संतापजनक आणि निषेधार्ह आहे..मुखयमंत्र्यांनी दिलीप कांबळे यांच्या वक्तव्याची ंगंभीर दखल घेत त्यांच्यावर कारवाई करावी अशी पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती आणि  मराठी पत्रकार परिषदेची  मागणी आहे.दिलीप कांबळे म्हणतात मी पत्रकारांना घाबरत नाहीत,कारण मी डेंजर माणूस आहे.ते डेंजर असले तरी राज्यातील पत्रकारही त्यांना घाबरत नाहीत हे दाखवून देण्यासाठी आपण उद्या  रविवार,दिनांक 28 मे 2017 रोजी  किमान दहा हजार निषेधाचे एसएमएस दिलीप कांबळे यांच्या मोबाईलवर करणार आहोत.दिलीप कांबळे यांच्या खालील क्रमांकाच्या मोबाईलवर आपण एसएमएस करावा असे आवाहन पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती आणि मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने राज्यातील पत्रकारांना करण्यात येत आहे.

दिलीप कांबळे यांचा मोबाईल नंबर 9850222491

एसएमएसमध्ये साधारणतः खालील मजकूर असावा.

श्री.दिलीप कांबळे,मी तुमच्या वकव्याचा निषेध करतो.आपले वक्तव्य वृत्तपत्र स्वातंत्र्याची गळचेपी करणारे आणि लोकशाहीचा गळा घोटणारे आहे..तुमच्या दमदाटीला,अरेरावीला महाराष्ट्रातील पत्रकार घाबरणार नाहीत, हे लक्षात ठेवा . आपण महाराष्ट्रातील पत्रकारांची माफी मागावी अशी आमची मागणी आहे ( पुढे आपले नाव आणि गावाचे नाव लिहावे )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here